शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
5
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
6
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
7
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
8
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
9
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
10
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
11
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
12
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
13
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
14
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
15
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
16
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
17
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
18
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
19
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
20
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी

कलंदराच्या पाय:या

By admin | Updated: October 31, 2015 14:15 IST

एक कृष्णवर्णीय गरोदर स्त्री त्याची प्रेरणा होती. तिच्याच मदतीनं, तिच्या प्रतिमा विकून सेलारॉननं पैसे जमवले. लोकांनी त्याची चेष्टा केली. पण तब्बल 20 वर्षे त्याचा रंगांचा महायज्ञ चालू होता. 5000 वर्षाचा इतिहास सांगणा:या त्याच्या पाय:या म्हणजे एक जागतिक चित्रप्रदर्शनच आहे!

- सुलक्षणा व:हाडकर
 
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्याच वर्षी चिली देशात जॉर्ज सेलारॉन ह्या मनस्वी कलाकाराचा जन्म झाला. वयाच्या दहाव्या  वर्षी आजोबांनी वॉटर कलरची रंगपेटी  भेट म्हणून दिली. त्याच वेळी जॉर्ज सेलारॉनने ठरवले आपण चित्रकार होणार. जगात आपले नाव होणार. त्यासाठी त्याने पुढची पावले उचलली. पुढे काही कामानिमित्त अर्जेण्टिनाच्या राजधानीत त्याचे जाणो झाले आणि त्या शहराची  भव्यता त्याला मोठे स्वप्न दाखवू लागली. नक्की काय करायचे माहीत नव्हते. पण चिली सोडून जायचे हे नक्की झाले. वयाच्या सतराव्या वर्षी तो युरोपला जाणा:या एका बोटीत बसला. हातात पैसे नव्हते. टेनिस खेळता येत होते ही जमेची बाजू. व्यक्तिमत्त्व हसरे, मनमिळावू होते. त्यामुळे टेनिसशिक्षकाची नोकरी करून त्याने उदरनिर्वाह चालविला. हे करताना चित्रकार होण्याचे त्याचे स्वप्न होतेच. ती आवड त्याने जोपासली. युरोपमध्ये जागोजागी त्याची चित्रंची प्रदर्शने झालीत. 
तो भारतातही आला. इथेही टेनिस प्रशिक्षक झाला. चित्रप्रदर्शने मांडली. तब्बल 57 देशांत त्याची भटकंती चालू होती. चित्र काढणो, प्रदर्शन भरविणो, त्यातून मिळालेले पैसे पुन्हा चित्रंसाठी, प्रवासासाठी वापरणो. वयाच्या चाळिसाव्या वर्षापर्यंत हेच अव्याहतपणो चालू होते. 
त्याने काढलेले एका ‘गरोदर कृष्णवर्णीय स्त्रीचे चित्र’ जगप्रसिद्ध झाले. हे चित्र आत्मनिवेदनात्मक होते. त्याच्या शब्दात सांगायचे तर ते त्याच्या गतकाळाचे एक रहस्य होते. हे रहस्य त्याने कुणालाही सांगितले नाही. कारण ते जर सांगितले तर अजून काही कहाण्या बाहेर येतील म्हणून त्याने त्याबद्दल कुणालाही सांगितले नाही. हे चित्र विकून त्याने पैसे कमावले.
4क् व्या वर्षी तो जेव्हा ब्राझीलमध्ये आला तेव्हा बोहेमियन कल्चरसाठी सुप्रसिद्ध असलेल्या लापा ह्या जागी राहणो पसंद केले. एका निम्न वस्तीत पाय:यांच्या बाजूला एका लहानशा घरात तो भाडय़ाने राहू लागला. इथेच त्याने त्याचा स्टुडिओ बनविला आणि जोडीला त्याचे बेडरूम होते. 
त्याच्या घराला लागून ह्या पाय:या जात होत्या. तब्बल 215 पाय:या. 125 मीटर उंच. टेकडीसारख्या जागेवरची ही वास्तू. तपकिरी रंगाच्या ह्या पाय:या थोडय़ा आतल्या बाजूला आडवळणाला होत्या. येणारे-जाणारे ह्याचा उपयोग मुतारीसाठीही करीत होते. तसेही लापा म्हटले की लोक घाबरतात. एकीकडे तिथे लूटमार, चो:या होतात, तर दुसरीकडे आफ्रिकन आणि हिप्पी संस्कृतीचा बोलबाला असलेली ही जागा. 
सेलारॉनमधल्या कलंदराला लापा आवडून गेले. त्याने होते नव्हते ते पैसे देऊन घर भाडय़ाने घेतले. आणि एक झाडूही विकत घेतला. सर्वप्रथम त्याने ह्या पाय:या झाडायला सुरुवात केली. त्याची साफसफाई नियमित चालू होती. 
कुणीतरी भले मोठे सहा बाथटब विकत होते. बातमी कळताच तो ते विकत घ्यायला धावला. पांढ:याशुभ्र रंगाच्या बाथटबमध्ये त्याने लहानशी बाग केली. पाय:यांच्या बाजूला जागोजागी ह्याची सजावट झाली. काही ठिकाणी निळ्या रंगाच्या लाद्या बसविल्या. ‘नमस्ते सदा वत्सले कर्म भूमे’ म्हणत ब्राझील देशाच्या राष्ट्रध्वजावरील रंगांची उधळण पाय:यांवर करावी असा विचार त्याच्या मनात आला. 
तब्बल 215 पाय:या सजवायच्या होत्या. नुसत्या लाद्या बसवायच्या असत्या तर ते सोप्पे होते. परंतु राहत्या, वाहत्या रस्त्यावर; जिथे आर्थिकदृष्टय़ा निम्न स्थरातील लोक राहतात. ज्यांच्या पुढे गरिबी दूर करणो हेच मोठ्ठे आव्हान होते. अशा वस्तीत सेलारॉनच्या रंगांच्या कलेला कुणी कित्ती आपलेसे केले असते? कोणतीही आर्थिक मदत नसताना सेलारॉनने त्याच्या स्वप्नामध्ये रंग भरायला सुरुवात केली. 
ह्यावेळेस तो रिओमधील मोठय़ा हॉटेल्समध्ये गेला. त्याने काढलेली चित्रे विकली. त्याच्या भूतकाळात त्याच्या आयुष्यात समस्येसारखी आलेली ती कृष्णवर्णीय गरोदर स्त्री पुन्हा त्याच्या चित्रत आली. ती चित्रे विकून त्याने पाय:यांना ओळख द्यायला सुरुवात केली. 
ह्या वस्तीत आफ्रिकन स्त्रिया राहत होत्या. त्यांच्यामुळे तो त्याच्या भूतकाळातील त्या स्त्रीशी जोडला जात होता. 
 सुरुवातीला त्याच्याकडे फक्त पाच लाद्या होत्या. चित्रे काढून, पैसे जमवून त्याने पद्य जमविणो सुरू केले. प्रसंगी घरभाडे थकले, फोन कापून गेला पण हा कलंदर थांबला नाही. तो पुन्हा जोमाने चित्रे काढू लागला. लाद्यांवर चित्रे काढली. चिकटवल्या. तब्बल 2क् वर्षे त्याचा हा रंगांचा महायज्ञ चालू होता. जगभरातून तो लाद्या गोळा करीत होता. जणू काही पाय:यांवरील जागतिक चित्र प्रदर्शन! 5क्क्क् वर्षाचा इतिहास सांगणारी चित्रे. एक मिलियन डॉलर किंमत असलेले पिकासोचे एक चित्र ह्या संग्रहात आहे. 13क् हून जास्त देशांतील कला ह्या रूपाने पर्यटकांना पाहायला मिळतेय. 
सुरुवातीला  सेलारॉनने हे काम सुरू केले तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी त्याची चेष्टा केली. तरीही तो थांबला नाही. त्याने सतत लाद्या बदलल्या. म्हणजे त्यांचे क्रम बदलले. नवीन पारंपरिक लाद्या लावल्या. तो म्हणायचा, माङया पाय:या म्हणजे एका स्त्रीचे रूप आहे. स्त्रिया कधीच समाधानी नसतात. त्यांना सतत काहीतरी शोध असतो. समाधानासाठी त्या सतत शोध घेत असतात. त्याच्या पाय:यासुद्धा अशाच. त्याने सतत ह्याचे डिझाइन बदलले. लापामध्ये आलेल्या परदेशी पर्यटकांनी ह्या पाय:या पाहिल्या आणि माउथ पब्लिसिटीने त्याची लोकप्रियता ब्राझीलबाहेर पसरली. येणा:या 5क्क् पर्यटकांमध्ये ब्राझीलचा एकच पर्यटक असायचा. त्याने त्याचे वाईट वाटून घेतले नाही. 2क्क्5 मध्ये ब्राझील सरकारने त्याला मानद नागरिकत्व दिले. 
लहानपणी रंगांची पेटी मिळाली तेव्हा चित्रकार होण्याचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण केले. अमेरिकेतील स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्यापेक्षा उंच असलेल्या ह्या पाय:या आज जगभरात ब्राझीलची ओळख सांगते. 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी करण्यात आलेल्या चित्रीकरणात ह्या पाय:यांचा समावेश केला गेला. 
सेलारॉनला पैशांचा मोह नव्हता. त्याला खूप मोठा आणि सुप्रसिद्ध चित्रकार बनायचे होते. तो नेहमी म्हणायचा, मी मायकेलान्जोलोपेक्षा चांगला आहे. कारण तो फक्त पोपसाठी चित्र काढायचा. त्याच्या विरोधात कुणी लिहू- बोलू शकत नव्हते. त्याने पांढ:या रंगाचा वापर केला आणि मी गडद रंगांचा. माङया कलाकृतीसाठी मी कुणाचे आदेश ऐकले नाही. मी स्वत: तासन्तास काम केले. माझी कला लोकांसाठी होती. त्यासाठी कुणाला तिकिटाचे पैसे भरावे लागत नव्हते. 
मला जर मिलियन डॉलर्स मिळाले तर मी भारत, चीन आणि अफगाणिस्थानात जाऊन तिथल्या पारंपरिक चित्रंच्या लाद्या मिळवीन, असे त्याने त्याच्या एका मुलाखतीत म्हटले होते. त्याच्या अनेक मुलाखतीत तो भारताचा उल्लेख करीत होता. त्याच्या पाय:यांवरसुद्धा त्याने भारतीय देवतांच्या लाद्या लावल्या आहेत. अगदी पाय:या सुरू झाल्यात की भारतीय चित्रे आपले स्वागत करतात. ह्यात तब्बल 300 प्रिंटेड सिरामिक लाद्या आहेत. काही दुर्मीळ लाद्या आहेत. जे पर्यटक ह्या पाय:या पाहायला येतात ते त्यांच्या मायदेशी गेले की सेलारॉनला भेट म्हणून लाद्या पाठवितात. 
सेलारॉनला त्याच्या ह्या आगळ्यावेगळ्या चित्रकारीसाठी मदतनीससुद्धा ठेवावे लागले इतके त्याचे काम वाढून गेले. 
 2012 मध्ये हा कलंदर नैराशेच्या गर्तेत गेला. त्याला पैशांची हाव नव्हती. भरपूर चित्रे काढायची. ती विकायची. त्यातून पैसे जमा करून सिरामिक लाद्या जमवायच्या. त्यावर चित्रे काढायची. चित्रंची अदलाबदल करायची. पर्यटकांबरोबर फोटो काढायचे. मुलाखती द्यायच्या. तो त्याच्या आयुष्यात खूश होता. 
परंतु 2013 मध्ये भर पावसात त्याचा मृतदेह ह्याच पाय:यांवर जळालेल्या स्थितीत मिळाला! वयाच्या 65 व्या वर्षी एका मनस्वी कलाकाराला संपविले गेले. त्याच्या मृत्यूचे कारण अजून कळाले नाही. 
त्याच्या भूतकाळातील ती कुणीतरी अज्ञात कृष्णवर्णीय गरोदर स्त्री, जिने त्याच्या आयुष्यात प्रवेश केला ती निघून गेली आणि त्यानंतरही तिच्याच मदतीने, तिची प्रतिमा विकून, चितारून त्याने पैसे जमविले. त्याने अमर केलेली कलाकृती त्यातही तीच होती जागोजागी. 
जुन्या काळातील सायकलवर फिरून लाद्या गोळ्या करणारा, जवळच्या बेकरीत जाऊन जुजबी काही खाणारा हा तलवारकट मिशीवाला कलंदर जणूकाही त्या गरोदर काळ्यासावळ्या अभिसारिकेला भेटू शकला नाही. कदाचित त्याने तिच्यावर अन्याय केला असेल किंवा ती त्याला सोडून गेली असेल. पण तिच्यासाठी हा चित्रसोपान त्याने सजविला. 
ह्या पाय:या चढताना उतरताना मला एक अपूर्ण प्रेमकहाणी दिसत होती. गडद रंगांच्या आत लपून राहिलेली..
 
(लेखिका ब्राझीलस्थित मुक्त पत्रकार आहेत)
 
sulakshana.varhadkar@gmail.com