शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंब-दाह

By admin | Updated: May 14, 2016 14:07 IST

एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर! बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.

मुलामाणसांची ताटातूट करणारी दुष्काळव्यथा
 
एरवी कुटुंब घडते-बिघडते, चालते-अडते ते त्यातल्या नात्यांच्या भरवशावर!
बदलत्या काळाने माणसे बदलवली, तसे कुटुंबांचे रंगही पालटले.
जुन्या विणी सैल झाल्या, जुन्या सवयीच्या समीकरणांवर हरकती आल्या,
मर्यादा तोडून स्वातंत्र्याचे ङोंडे फडकले, जुने मोडले-तुटले; तसे नवे घडतही गेले!
- पण हे सारे मुख्यत: शहरांच्या आधाराने.
 
गावखेडय़ातल्या कुटुंबांचे जुने काच तुटण्याआधी 
नव्या अडचणींचे काटेच वाटेत आले.
गावेच्या गावे कोरडय़ा वणव्यात लोटणारा दुष्काळ  हे ताजे कारण !
या दुष्काळाने पेकाट मोडलेल्या कुटुंबांतल्या माणसांची ताटातूट केली आहे.
तरणी माणसे मुंबईसारख्या बडय़ा शहरांच्या आस:याला गेली आहेत आणि
गावचे घर सांभाळत मागे राहिलेले म्हातारे-कोतारे 
गोठय़ातल्या जनावरांसह पावसाची वाट पाहत पाण्यापाठी वणवणत मुलांच्या परतण्याकडे डोळे लावून आहेत.
 
एरवी कधी कुणापुढे हात न पसरणा:या मायबापांना
परक्या शहरातल्या अन्नछत्रंच्या रांगेत बसणो भाग पडते आहे,
मालकीच्या शिवारात अधिकाराने राबणा:या शेतक:याच्या घरधनिणी
धुण्या-भांडय़ाची, साफसफाईची कामे मिळवण्यासाठी
शहरांपुढे हतबलतेने वाकत आहेत.
 
कुटुंबे तुटली, पांगली आहेत.
एरवी मुंबईतल्या दुष्काळी छावणीत राहणा:या देवीदासची एकटी आई आम्हाला
नांदेड जिल्ह्यात बापशेटवाडीच्या 
तांडय़ावर भेटती ना!
 
पाऊसपाण्याकडे डोळे लावून ताटातूट सोसणा:या
कुटुंबांच्या या हतबल काफिल्यांची एक खबर
- आजच्या आंतरराष्ट्रीय कुटुंब दिनाच्या निमित्ताने!