शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

जाळरेषेवरचा धगधगता वणवा

By admin | Updated: November 22, 2015 17:17 IST

वन वणवे या मेळघाटातला हा एक जटील प्रश्न आहे. साधारणत: डिसेंबर महिन्यापासून त्याला तुरळक स्वरुपात सुरुवात होते पण फेब्रुवारीच्या मध्यापासुन त्यांची तीव्रता जाणवू लागते. हा काळ मेळघाटामध्ये वनवणवा हंगाम म्हणुन घोषित केला जातो.

प्रकाश ठोसरे

अनुवाद : अरविंद आपटे
 
वन वणवे या मेळघाटातला हा एक जटील प्रश्न आहे. साधारणत: डिसेंबर महिन्यापासून त्याला तुरळक स्वरुपात सुरुवात होते पण फेब्रुवारीच्या मध्यापासुन त्यांची तीव्रता जाणवू लागते. हा काळ मेळघाटामध्ये वनवणवा हंगाम म्हणुन घोषित केला जातो.
मेळघाटात अजूनही पारंपारिक पद्धतीने वणव्यांशी मुकाबला केला जातो. ‘जाळरेषा’ घेऊन जंगलाचे छोटे छोटे भाग पाडले जातात. ‘जाळरेषा’ म्हणजे साधारणत: 3 ते 12 मीटर रूंदीच्या पटय़ातील गवत, पालापाचोळा जाळला जातो. पुढे जर वणवा लागल्यास ह्या मधल्या जळलेल्या पट्टय़ात जळण्याजोगं काही नसल्याने एका भागातील लागलेली आग दुस:या भागात पोचु शकत नाही. दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जाळरेषा घेतल्या जातात. ह्या जाळरेषांवरील पालापाचोळा, गवत, काडीकचरा वरचेवर झाडून काढला जातो. हे काम व आगी विझवण्यासाठी विशेष मजूर लावले जातात. त्यांना ‘अंगारी’ असं म्हटलं जातं. मेळघाटात हिंदीचा चांगलाच प्रभाव असल्याने अंगार ह्या शब्दावरून अंगारी हा शब्द आला आहे.
वनवणव्यांशी मुकाबला करताना आग एका भागातुन दुस:या भागात जाऊ नये म्हणुन आगीला झाडाच्या टहाळ्यांनी झोडपुन विझवलं जातं, कारण जंगलात सहजपणो उपलब्ध होणारं ते एकमेव हत्यार आहे. उन्हाळ्यात पाण्याची तशीही कमतरता असते, त्यामुळे आगीचा बंब वगैरे कल्पनेच्या पलिकडलं आहे. मेळघाटात प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक तंत्रज्ञान वापरून वणव्यांचा मुकाबला करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हेलिकॉप्टरमध्ये पाण्याच्या मोठाल्या बादल्या ठेवल्या गेल्या होत्या. हेलिकॉप्टर पाणवळ्यावर जाऊन बादल्या भरून घेत असे आणि आग लागलेल्या ठिकाणी ओतत असे. त्यामुळे आगदीची तीव्रता कमी होत असे आणि कर्मचारी वर्गास आग नियंत्रणात आणता येत असे. हा उपाय तसा प्रभावी होता पण फारच खर्चिक असल्याने सोडून द्यावा लागला.
महाराष्ट्रातील वनात लागणारे वणवे हे ‘भूतल वणवा’ ह्या प्रकारात मोडतात. आगीची कारणो नैसर्गिक किंवा मानवी असतात. पहिल्या प्रकारात दैवी प्रकोप झाल्याने म्हणजे वीज पडून किंवा झाडांच्या घर्षणाने आगी लागु शकतात. पण आपल्याकडे अशा आगी लागत नाहीत. दुदैवाने आपल्याकडचे बहुतांशी वणवे हे मानवनिर्मित असतात. आगी लावण्याची कारणं वेगळी असतात. काहीवेळा अपघाती, काही वेळा निष्काळजीपणामुळे तर काही वेळा संहेतुक असतात. कुठे पावसाळ्यात येणा:या लुसलुशीत गवताची आस असते तर कुठे जास्तीच्या गोंद, तेंदू पानांची हाव असते. वन्य प्राण्यांच्या शिकारीकरताही वणवे लावले जातात, पण काही वेहा निव्वळ निष्काळजीपणा, निर्हेतुक दुष्टपणा आगीला कारणीभुत ठरतो. 
मेळघाटात मार्चच्या मध्यापासुन ते एप्रिलच्या मध्यार्पयत मोहाच्या फुलांचा बहर असतो. ही फुले दारू बनवण्यासाठी वापरली जातात, त्यामुळे त्याला खूप मागणी असते. झाडाखाली पालापाचोळा पडलेला असल्याने पहाटेच्या वेळी अंधूक प्रकाशात खाली पडलेली फुले गाळा करणं त्रसाचं होतं. पण जर का झाडाखालचा भाग जाळून टाकला तर त्या काळ्या पाश्र्वभूमीवर पिवळसर पांढरी फुलं चटकन उठून दिसतात आणि गोळा करायला सोप्प जातं.           त्यामुळे अशा आगदी लावणं नित्याचं आहे, पण आग लावणा:या व्यक्तीने झाडाभोवती लावलेली ही आग वेळीच न विझवल्यास ती जंगलात पसरू शकते.
उन्हाळ्यात हरिणांची शिगं गळून पडतात.             ही शिंग आयुव्रेदात औषधासाठी वापरली जातात.   खरंतर शिंग गोळा करण्यावर कायद्याने बंदी आहे तरी पण चोरूमारून ती गोळा करण्याचं काम चालूच असतं. जंगलात पाचापाचोळा बराच पडलेला असतो, त्यातुन शिंग शोधुन काढण्याचा त्रस वाचवण्यासाठी पाचापाचोळा जाळून टाकणं हा सोपा उपाय असतो. अशा शुल्लक फायद्यापोटी ह्या आगी मेळघाटात फार घातक ठरतात. काहीवेळा वनकर्मचा:यांकडून काही कारणास्तव दुखावली गेलेली व्यक्ती सुडापोटीही आग लावण्याचा प्रकार करू शकते, काही वेळा अंगारी म्हणुन काम मिळावं म्हणुनही आगी लावल्या जातात.
एकदा मी धारणी वन परिक्षेत्रत रात्रीची गस्त घालत होतो, दहाच्या सुमारास रस्त्याच्या बाजुला छोटीशी आग दिसली. मी आणि 3913 मधल्या माङया कर्मचारी वर्गाने जीपमधुन पटकन उडी करून अध्र्या तासात आग आटोक्यात आणली. आम्ही जीपमध्ये चढणार इतक्यात एक किलोमीटरवर अजून एक आग दिसली, परत आम्ही तत्परतेने तीही आग विझवली. हा प्रकार पहाटे चार्पयत चालूच होता. तसंच एकदा रात्रभर ङिावलेल्या 1क् आगींचा प्रसंग अजूनही मनात ताजा आहे.          एक व्यक्ती आमच्यासमोर आग लावत दोन एक किलोमीटर पुढे चालत होती. त्याचं आग लावण्याच काय कारण असेल. त्याच्या समजूतीनूसार त्या भागात वाघ रहात होता आणि वाघापासून संरक्षण मिळाव ह्या हेतुने तो आगी लावत सुटला होता. माझा तारूबंद्याचा रेंज चार्ज आणि व्याघ्र प्रकल्पाचा संचालक मिळून मी एकंदर सहा उन्हाळे अनुभवले आणि आगींशी मुकाबला केला.
मार्च 1979 ची गोष्ट, माझा तारुबंदा परिक्षेत्रतील परिविक्षाधीर काळ संपत आला होता. संध्याकाळचे 7 वाजत आले होते. कुंड ह्या गावापासून 3 कि.मीवर व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रच्या हद्दीवर साखरी नदीच्या शृष्क पात्रच्या कडेकडेने माझी गस्त चालु होती. इतक्यात खालच्या दरीतील एक छोटीशी आग माङया दृष्टीक्षेपात आली. त्या रात्री माङयाकडे ट्रेलर असणारी जीप व धाडसी चालक हसन काय तो माङया दिमतीला होता. आम्ही दोघांनी कुंड गावात जाऊन माणसं गोळा करून आणावी म्हटलं तर मौल्यवान वेळ वाया गेला असता व छोटय़ा वाटणा:या आगीने अक्राळविक्राळ रुप धारण केलं असतं. चराईला बंदी असल्यामुळे त्या भागात गवत खूप वाढलं होतं, उंच झालं होतं. आगीला खाद्य भरपूर होतं. त्यामुळे हसनच्या विरोधाला न जुमानता मी खाली उतरून आग विझवणं सुरु करण्याचा निर्णय घेतला व हसनला कुंड गावात माणसं आणण्यासाठी पाठवलं. तो जरी म्हणाला की दहा मिनिटात येतो तरी मी धरून चाललो होतो की अर्धा तास तरी जाईलच.
हसनने जाण्यापूर्वी पालापाचोळा झाडण्यासाठी आणि आग झोडपण्यासाठी टहाळ्यांचा एक कामचलाऊ झाडु बनवुन दिला. लगेचच मी जाळरेषवरील पालापाचोळा झाडायला सुरुवात केली. आग अजून दूर दरीत होती पण तिच्या उजेडात थोडंफार दिसू शकत होतं. सुरवातीलाच आगीच्या भागातून एक साप बाहेर पडला आणि मला सहज दंश करता येईल इतक्या अंतरावरून सळसळत गेला.
हळुहळु वा:याचा वेग वाढत होता आणि आता आगही तीन भागात पसरली होती. पन्नास फुट रुंदीचा आगीचा एक लोळ माङया दिशेने लवलवत येत होता. त्या ज्वाळा जवळपास 15 फुट उंच होत्या. मी पटकन आगेच्या वाटेतली जाळरेषा साफ केली आणि आग विझवायचीच ह्या ठाम निश्चयाने तिथे पाय रोवून उभा राहिलो. तितक्यात आगीच्या भागातून एक महाकाय केसाळ अस्वल बाहेर पडून माङया उजव्या अंगाने निघून गेलं. पंधरा मिनिटाच्या अवधीत दोन धोकादायक प्राण्यांशी माझी गाठभेट झाल्याने मी थोडा सटपटलो आणि हसन लवकर यावा अशी प्रार्थना करू लागलो. आग जवळ जवळ येऊ लागली, वा:यानेही आगणी वेग घेतला होता. त्यामुळे एक छोटीशी वावटळ निर्माण होऊन आगदीच्या एका लोळाने जाळरेषा ओलांडून दुस:या भागाता प्रवेश घेतला. मी चपळाई करून त्या दुस:या भागातील ती छोटीशी आग झोडपून विझवली.
मी जाळरेषा साफ केली असल्याने आग जाळरेषेर्पयत येऊन थांबली, जाळरेषेवरची थोडीशी आग सहज विझवता आली. आग पुढे न पसरल्याने माङया श्रमाचं सार्थक झालं असं मला वाटलं. पण माझं समाधान क्षणभंगूर ठरलं. आग तर आटोक्यात आली होती पण वाढत्या काळोखामुळे काही दिसत नव्हतं. आगीचा उजेड संपला होता, माङयाकडे टॉर्च नव्हता, डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही अशा त्या मिट्ट काळोखात मी निश्चल उभा राहिलो, दुसरा पर्यायच नव्हता. तहानभुकेने माझा जीव व्याकूळ झाला होता. इतकावेळ आग विझवण्याचं भूत डोक्यात असल्याने काही जाणवलं नव्हतं, पण आता वाघाच्या ह्या साम्राज्यात माझं काय होणार आहे? ही काळजी कुरतडु लागली होती. मी मदतीचा जोरात धावा सुरु केला.
देवाने माझा धावा ऐकला. दूरवरून जीपची मंदशी घरघर मला ऐकु येत होती, जीपच्या लाईटच्या रुपात आशेचा किरण दिसु लागला होत. गावातून परतायला हसनला जवळपास एक तास लागला होता. त्याच्यासोबत आबालवृद्ध पंधरा जणाचं एक समिश्र टोळकं, बॅरल भरून पाणी आणि माङया पोटापाण्याची सोय होती. माझं काम संपलेलं नव्हतं. माङया दिमतीला आलेल्या कुमकीच्या सहाय्याने पुढे आणखी दोन तास दुस:या दोन आगी विझवणं चालु केलं. रात्री एकच्या सुमारास आमच्याकडचे बॅरलभर पाणी सरलं, पण आम्ही प्रयत्न सोडले नाहीत. एका घाणोरडय़ा डबक्यातलं पाणी पिण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. पण पाणी पिणं आवश्यकचं होतं.        डि-हायड्रेशनमुळे लघवीवाटे रक्त पडल्याची उदाहरणं आम्हाला माहित होती. पहाटे चार्पयत ही लढाई चालु होती. आग पूर्ण आटोक्यात आल्यावर ब्रेकफास्टच्या सुमारास ती तारुबंद्याला पोचलो. माझं शरीर अतिशय आंबुनचिंबून गेलं होतं. पण मन मात्र आग लावणा:या त्या अज्ञात व्यक्तीचा विचार करत होतं. कदाचित तो आमच्या ह्या ससेहोलपटीचा आनंदही घेत असावा.
असाच एक वन वणवा विझवण्याच्या प्रयत्नात प्राण गमावणा:या एका योद्धा वन क्षेत्रपालाचं स्मारक मेळघाटातील हरिसाल येथे उभे आहे. हे स्मारक आमच्यासारख्या वन कर्मचीर / अधिका:यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत असतं.
(लेखक महाराष्ट्राचे सेवानिवृत्त 
प्रधान मुख्य वनसंरक्षक आहेत.)
pjthosre@hotmail.com