शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अनंत सुखाच्या अनुभवासाठी

By admin | Published: April 29, 2014 3:26 PM

आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील.

आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील.नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी। । एक तरी ओवी अनुभवावी।।’ असे नामदेवमहाराज म्हणतात. ज्ञानेश्‍वरीतील एक ओवी अनुभवाला आली, तरी त्यात जीवनाची धन्यता आहे. ज्ञानेश्‍वरमहाराज म्हणतात, ‘अर्जुना अनंत सुखाच्या डोही। एकसरा तळुचि घेतला जिंही। मग स्थिराऊनि तेही। तेचि जाहले।।’ अनंत सुख याचा अर्थ आत्मसुख. विषयांचे सुख हे अनंत सुख असू शकत नाही. ते र्मयादित सुख आहे, तर अनंतसुख म्हणजे आत्मसुख हे सागरासारखे अर्मयाद आहे.एकदा एक हंस उडता-उडता जमिनीवरील भू-भागात आला. तेथे एक विस्तीर्ण विहीर होती. तिच्या काठावर येऊन तो थांबला. विहिरीत एक मोठा बेडूक होता. त्याने अशा प्रकारचा पक्षी आत्तापर्यंत पाहिला नव्हता; त्यामुळे आश्‍चर्यचकित होऊन त्याने हंसाला विचारले, ‘तू कोण? कोठून आलास?’ हंस म्हणाला, ‘मी हंस पक्षी, सागरावरून उडत आलो.’ बेडकाने विचारले, ‘सागर? तो केवढा असतो?’ हंसाने उत्तर दिले, ‘खूप मोठा! अगाध असा जलाशय! तुला नुसते सांगून कल्पना येणार नाही.’ हंसाचे हे बोलणे ऐकून विहिरीतील पाण्यात बेडकाने दोन मोठे वेढे घेतले व म्हणाला, ‘इतका मोठा असतो का सागर?’ हंस म्हणाला, ‘सागर अशा वेढय़ांमध्ये मावणारा नाही आणि तो खूप विशाल आणि खोल असतो.’ तेव्हा बेडकाने विहिरीच्या पाण्यात खूप खोल बुडी मारली आणि वर येऊन म्हणाला, ‘सागर इतका खोल असतो का?’ हंस म्हणाला, ‘तुला समजत नाही. हे तर काहीच नाही. सागराच्या खोलीची विहिरीत राहून तुला कल्पनाही येणार नाही.’ आता मात्र बेडूक रागावला व म्हणाला, ‘बस्स झाले तुझे! खोटे बोलण्यालाही काही र्मयादा असते.’ बेडूक सागराचे वर्णन समजूच शकत नव्हता. आत्मसुखाबाबत आपली समजही अशीच थिटी आहे. विषयांच्या सुखावरून अनंत अशा आत्मसुखाची कल्पनाही करता येणे कठीण आहे.अनंत सुखाच्या अनुभवासाठी सीमित देहबुद्धी टाकावी लागते. ‘देहबुद्धी केली बळकट। आणि ब्रह्म पाहो गेला धीट। तंव दृश्याने रुधली वाट। परब्रह्मची।।’ असे सर्मथ म्हणतात. देहबुद्धीला घट्ट धरून कोणी ब्रह्म पाहायला गेला, तर त्याची गत वरील गोष्टीतील बेडकासारखी होते. विश्‍व आणि त्यातील शब्दस्पर्शादी विषय वाट अडवून उभे राहतात. आपला नावलौकिक, आपले कूळ, घराणे, आपला देश, आपला प्रांत, आपली भाषा यांचा अभिमान आड येतो. याशिवाय, आपले रूपवान असणे, गुणवान असणे, उच्चशिक्षित असणे, श्रीमंत असणे यांचा अहंकार अनंत सुखप्राप्तीच्या आड येऊ शकतो. ‘देह बळी देऊनि साधिले म्यां साधनी। तेणे समाधान मज जाहले वो माये।।’ देह म्हणजे ‘मी’ या भावनेचा, अर्थात देहबुद्धीचा बळी देऊन साधना केली पाहिजे; मगच ते अनंत सुख, आत्मसुख प्राप्त होते.महर्षी नारद सनकादिकांना विचारतात, ‘माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ भेटला, तर मला त्याचा मत्सर वाटतो आणि कोणी कनिष्ठ भेटला तर मी त्याला कमी लेखतो. असे होऊ नये यासाठी काही उपाय आहे का? ’ बघा हं! नारद महर्षींसारखे भक्ताचार्य असे विचारत आहेत; मग आपल्याबद्दल तर बोलायलाच नको. सनकादिक नारदांना सांगतात, ‘अल्प होऊन राहण्यात सुख नाही. व्यापक होण्यातच सुख आहे. नाल्पे सुखमस्ति। भूमैव सुखम।’ हे सुख आपल्या आतच आहे. आत्म्याच्या ठिकाणी आहे. त्याचे अनुसंधान ठेवावे. देहाचे सुख म्हणजे सुख, असे खरे तर मानूच नये. तसेच वळण आपल्याला लावून घ्यावे. ‘देहातीत वस्तू आहे। ते तू परब्रह्म पाहे। देहसंग हा न साहे। तुज विदेहासी।।’ तू विदेही आहेस हे जाणून घेशील, तर सुखी होशील. उत्तम ध्यानामध्ये हे सुख मिळते. ध्यानातून बाहेर आल्यावर आत्मबोधासहित आपली कर्मे करीत जावीत. आत्मभावाने विश्‍वाकडे पाहावे. जे-जे पाहाल ते-ते आत्मभावाने, आत्मप्रकाशाने उजळून गेलेले पाहा; मग व्यवहारकाळीदेखील कामना, वासनांचा स्पर्श होणार नाही. परमात्मभाव टिकून राहील. असे जीवन होणे, ही सामान्य गोष्ट नाही. मात्र, साधनेने आणि गुरुकृपेने असे जीवन निश्‍चितपणे प्राप्त होते, यात शंका नाही.(लेखक पुणेस्थित असून, नाथ संप्रदायातील स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी स्वामी माधवनाथ यांचा वारसा पुढे चालविणारे आध्यात्मिक अधिकारी आहेत.)