शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

अति सर्वत्र वर्जयेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 16:54 IST

सध्या एक फोमो नावाचा मानसिक आजार आपल्यापैकी ब?्याच लोकांना झालेला दिसतो. FOMO म्हणजे FEAR OF MISSING OUT.  (आपण दुर्लक्षित होण्याचे भय) या बाबीचा आपण गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे.

गत आठवडाभरापासून सोशल मिडियावर अंबानी या उद्योगपतींच्या विवाहसोहळ्याचे न थकता गुणगान आणि प्रदर्शन सुरु आहे. घरात तरुण मुलं पब-जी खेळतात तेव्हा त्यांना निदान ठाऊक असतं की आपण हा गेम खेळतो आहोत. पण नीता अंबानीच्या साड्या वारंवार बघतांना आणि त्याचं कौतुक करतांना आपण कोणता गेम खेळतो आहोत? मला आता पुतणीच्या लग्नात तशीच साडी हवी. आम्हाला लग्नात ती तशी सजावट करून द्या वगैरे प्रकारचे संवाद कानावर पडतात. आतापर्यंत आपणांस कौटुंबिक, शारीरिक आर्थिक काळज्या कमी होत्या की काय म्हणून त्यात ही एक भर पडलीय ती या सोशल मीडियाची काळजी करणा?्यांची! इथे प्रत्येकाला स्वत:चे फोटो, लिखाण, आयुष्यातील सुखदु:खाच्या घटना, राजकीय घडामोडी फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाटस अप यासारख्या प्रतिष्ठित सोशल मिडीयावर पोस्ट करण्याची लगबग असते. सध्या एक फोमो नावाचा मानसिक आजार आपल्यापैकी ब?्याच लोकांना झालेला दिसतो. FOMO म्हणजे FEAR OF MISSING OUT.  (आपण दुर्लक्षित होण्याचे भय) या बाबीचा आपण गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. या आजाराची काही प्राथमिक लक्षणे आहेत. जरा सविस्तर सांगायचे झाल्यास कोणी एखादा व्यक्ती आपले परदेशवारीचे, नव्यानेच खरेदी केलेल्या महागड्या गाडीचे फोटो सोशल मिडीयावर शेअर करतो त्यावेळी माज्या आयुष्यात असे काही नाही...का? हे झाले सामान्य माणसाबाबत आणि थोडे विद्वान विदुषी असणा?्यांना कोणी एखादा उत्तम लेख लिहिला किंवा एखाद्या ठिकाणी प्रमुख पाहुणे अथवा वक्ता म्हणून गेले त्या वेळी ज्यांना फोमो झाला आहे त्यांना फार अस्वस्थ व्हायला लागते. अहो, हे दुखणे इतके विकोपाला जाते की समजा मी स्वामी विवेकानंद या विषयावर लिखाण केले की हा आजार झालेय व्यक्तीला वाटते की अरेच्चा मी तर यापेक्षा उत्कृष्ट लिहिले असते आणि मग तो झपाटल्यागत लिहितो नव्हे तर ते पोस्ट केल्याशिवाय स्वस्थच बसत नाहीत. एक दुसरा वर्ग आहे तो म्हणजे ह्यशतक लोभीह्ण आजार झालेला. हा आजार झालेला वर्ग फेसबुक, इन्स्टाग्राम आणि काही प्रमाणात whats app वर सक्रीय असलेल्या व्यक्तींना झालेला असतो. या लोकांनी एखादा सेल्फी किंवा काही वाचनीय, दर्शनीय अश्या पोस्ट शेअर केल्यात तर १०० लोकांना ते आवडल्याशिवाय यांना स्वस्थ बसवत नाही. अहो, हा आजार एवढा चिंताजनक आहे की जर त्यांच्या या पोस्टने अर्धशतकही गाठले नाही तर हे लोक तीच ती पोस्ट नव्याने लोकांपर्यंत पोहचवण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतात. त्यांनी एक स्वत:ची फुटपट्टी तयार केली असते. तिचे परिमाण म्हणजे ज्यांना १००च्या वर लाईकस वगैरे असतात ते सेलिब्रिटी होतात. खूप मित्र मैत्रिणींना हॅश टॅग केल्याने आपण इतरांना आवडतं राहतो. यामध्ये त्या रोग्यांचाही समावेश आहे जे whats app  वर त्यांनी जे काही समोरच्याला पाठवले आहे त्यांचे उत्तर न आल्यास यांच्या क्रोध वृत्ती वगैरे उफाळून येतात. मग हे एखादा फोन समोरच्याला करतात आणि वाचून उत्तर देण्याविषयी कान पिळतात. नकळतपणे या सगळ्या नशेत ते विसरतात की आपण आपले मित्र, कुटुंबीय या पौष्टिक व्यक्तींपासून आपण दुरावतो आहोत. हल्ली प्रेक्षकांना आता टीव्ही नकोसा झालाय म्हणून वेब झ्र सिरीज आल्या आहेत. युवावगार्ला हे बघण्याची एक झिंग चढलीय. म्हणजे रात्रभर बसून त्या मालिकेचे सगळे भाग संपवायचे. दुसरे दिवशी सकाळी एखादे मेडल मिळाल्याच्या थाटात मित्रमंडळीत त्याची चर्चा करायची. जे हे बघत नाहीत त्यांना आपण खूप मागासलेले आहोत असे वाटायला लागते आणि त्यांनाही या रोगाची लागण स्वत:ला करून घेईपर्यंत समाधान लाभत नाही. वाचकांना या रोगाची लक्षणे समजली असतीलच. आपल्यामध्ये ही लक्षणे असतील आणि तरीही आपण हे व्यसन सोडत नसाल तर आपणास SOCIAL ANHEDONIA (उदासीनता-आनंदाचा अभाव ) हा गंभीर मानसिक आजार होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. आनंद हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे तो सोशल मेडिया कसा काय हिरावून घेऊ शकतो. पण हे दुदैर्वाने हे खरे आहे. गीतेमध्ये कृष्ण्भगवान सांगतात, ह्ल सुखदु:खे समेकृत्वा लाभालाभौ जयाजयौह्व अर्थात सुख असो वा दु:ख, लाभ असो वा हानी सगळे सारखेच असायला हवे. हा आजार झालेले लोक काहीसे असेच असतात. यांच्यासाठी उत्तीर्ण-अनुत्तीर्ण, जन्म-मृत्यू या मोठ्या घटना महत्वाच्या नसतात इथे जरी गीता प्रत्यक्षात येत असेल तरी याचा उर्वरित भाग असा आहे की यांना गेम मध्ये कोणाला मारले, कोणाला वाचवले किंवा लाईक कॉमेंट याने यांच्या दैनंदिन जीवनात खूप फरक पडत असतो. हे लोक सतत सोशल मेडिया नावाच्या घरात वास्तव्य करतात. तिथेच हसतात, रडतात, पोटाची गरज म्हणून खात असतात . मन मात्र सतत त्या नोटीफिकेशनच्या अवतीभवती फिरत असते. यातून बरे होण्यासाठीचा रामबाण उपाय म्हणजे सोशल मिडियाची सकारात्मक आणि नकारात्मक ताकद ओळखायला हवी. लक्षात असू द्या यामधील रेषा अतिशय अस्पष्ट आहे. ती जरा बारीक नजरेतून बघा. सुज्ञ वाचकांना वाटेल की या सोशल मिडियाचे कितीतरी लाभ आहेत. तर तुम्ही अगदी योग्य आहात तो विषयच वेगळा आहे. फलाहार सात्विक आहे, लाभदायी आहे पण अति अयोग्यच ना! म्हणूच संस्कृत सुभाषितकार म्हणतात, अति सर्वत्र वर्जयेत आपणा सगळ्यांना आपले मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी फेसबुकभर शुभेच्छा!!! हॅश टॅग भरलेली मित्रांची गर्दी आपल्या अवतीभवती असावी ही शुभकामना.

- सिमा बक्षी

टॅग्स :AkolaअकोलाSocial Mediaसोशल मीडिया