शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

लोककलेचा जगात डंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:18 IST

पिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा बनून हे पथक मानाने डोलत आहे.

ठळक मुद्देज्या कुलदैवतांच्या चरणी या कलेच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला ते मुरसिद्ध, बिरदेव आणि कुपवाडचे लाडले मशायक बाबा यांच्याप्रतीही तितकाच भक्तिभाव पथकाने जपला आहे.

अविनाश कोळीपिवळ्याधमक भंडाऱ्याच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले. जगातील अनेक राष्टÑांच्या सांस्कृतिक सोहळ््यांची प्रतिष्ठा बनून हे पथक मानाने डोलत आहे.आधुनिकतेच्या चाकावर आरूढ होत बदलांचे वारे अंगात भिनवत विविध क्षेत्रांनी कूस बदलली. जगाच्या प्रवाहाच्या दिशेने प्रवाहित होत सुरात सूर मिसळून पुढे जाण्याची कलाही अनेकांनी अवगत केली. मात्र, बदलाच्या वाºयापेक्षा परंपरेने आलेल्या कलेच्या वादळासंगे नाचत आधुनिक जगाच्या व्यासपीठावर आपला डंका वाजविणारे दुर्मीळच. पिवळ््याधमक भंडाºयाच्या रंगात न्हाऊन ढोलवादन, वालुग आणि ओव्यांच्या विश्वात रमलेल्या कुपवाडच्या एका पथकाने जगाच्या व्यासपीठावर आपल्या कलेचे अस्सल रूप प्रदर्शित करून विदेशी रसिकांच्या हृदयात घर केले.

लोककलांचा प्रवास कित्येक वर्षांचा असला तरी आधुनिक काळात त्याच्या जतनाचे काम म्हणजे एक दिव्य वाटू लागले आहे. परंपरागत कलेचा अभिमान, त्याची गोडी, त्याचे महत्त्व अधोरेखित होत असतानाच, अर्थकारणात, लोकप्रियतेत कुठेतरी फसत असल्याची भावनाही व्यक्त होत असते. म्हणून संमेलनांमधून भारतीय लोककलांच्या भवितव्याची चिंताही तज्ज्ञांकडून व्यक्त होत असते. कलेच्या क्षेत्रात संभ्रमाचे हे ढग दाटले असतानाच, लोककलेला प्रकाशझोतात आणण्याचे काम कुपवाडच्या मुरसिद्ध वालुग, ओवीकार मंडळाने केले. गेल्या चाळीस वर्षांत या पथकाने जी झेप जागतिक पातळीवर घेतली, ती अन्य लोककला पथकांसाठी दिशादर्शक म्हणावी लागेल. पथकाचे प्रमुख डॉ. बाळासाहेब लक्ष्मण मंगसुळे यांनी सातत्याने यासाठी धडपडत राहणे पसंत केले. या कलाकाराने आर्थिक गोष्टींची चिंता न करता लोककला जपण्याचे वेड अंगी बाळगले आणि आता ते जगातील रसिकांना आपल्या कलेने वेड लावत आहेत.

कंबोडिया, इंडोनेशिया, मॉरिशस, थायलंड, भूतान अशा देशांचे केवळ औपचारिक दौरे नव्हे, तर दीर्घकाळ त्याठिकाणच्या सांस्कृतिक पटलावर उमटणारी घट्ट छाप ते सोडून आले आहेत. त्यामुळेच अमेरिकेच्या वर्ल्ड कॉन्स्टिट्युशन अ‍ॅण्ड पार्लमेंट असोसिएशनने मंगसुळे यांना सदस्यत्व बहाल केले. मानाच्या दोन संस्थांनी त्यांना डॉक्टरेटसुद्धा दिली. मुरसिद्ध आणि बिरुदेव या कुलदैवतांसमोर कधीकाळी भंडाºयात न्हाऊन सादर होत असलेली ही लोककला आता जगाच्या कानाकोपºयात फिरत आहे. इतकेच नव्हे, तर २१ फेब्रुवारी २०११ रोजी त्यांनी एकाचवेळी १ हजार ३५६ लोकांच्या माध्यमातून ढोलवादन करीत ‘गिनिज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंदही केली.

आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली यांसह देशातील अनेक प्रांतांतही त्यांची ही कला लोकप्रिय झाली. आधुनिक संगीताचा बाज स्वीकारत त्यांच्या तालावर आपली कला नाचविण्यापेक्षा आधुनिक संगीताला लोककलेच्या परंपरागत ठेक्यावर ठेका धरायला लावणे आपल्याला पसंत आहे, असे डॉ. मंगसुळी सांगतात. त्यांनी सांगितले की, धनगर समाजातीलच नव्हे, तर प्रत्येक समाजाकडे असलेली लोककला ही अशाच मार्गाने गेली पाहिजे. आपले संगीत, नृत्य, कलाविष्कार मूळ स्वरूपातच टिकले पाहिजे. काळ आधुनिक आला म्हणून निसर्ग त्याचे मूळ रूप कधी बदलत नाही, तसेच कलांच्याबाबतीत झाले पाहिजे. पथकासाठी आंतरराष्टÑीय व्यासपीठाच्या पायºया उपलब्ध करून देण्याचे काम सांस्कृतिक मंत्रालयाच्या नागपूर विभागातील संचालक डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महाराष्टÑाच्या वित्त विभागाचे सचिव वैभव राजेघाडगे, तसेच भारतीय सांस्कृतिक संचालनालयाशी संबंधित सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांचेही तितकेच योगदान आहे. ज्या कुलदैवतांच्या चरणी या कलेच्या सादरीकरणाचा श्रीगणेशा झाला ते मुरसिद्ध, बिरदेव आणि कुपवाडचे लाडले मशायक बाबा यांच्याप्रतीही तितकाच भक्तिभाव पथकाने जपला आहे.

(लेखक ‘लोकमत’ सांगली आवृत्तीमध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)