शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सगळं लक्षात ठेवण्याची गरज असते का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 06:00 IST

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे,

आपण खूप वेळा ‘स्मरणात काय राहिलं?’ यावर चर्चा करतो. ज्याची स्मरणशक्ती चांगली आहे, त्यांना नेहमीच खूप छान वाटतं. त्याचप्रमाणे ज्यांची स्मरणशक्ती खूप काही चांगली नाही, सारखं विसरायला होतं, अशांना वाटतं की आपल्याला फार काही आठवत नाही, म्हणजे आपल्यात काही तरी दोष आहे. काय करावं म्हणजे आपली स्मरणशक्ती तल्लख होईल? 

स्मरणशक्ती चांगली असणं हे चांगलंच असतं. पण आपल्यासाठी सगळ्या आठवणी मेंदूत ठेवणं शक्य नाही, हे आपल्या शरीरालाही माहीत असतं. म्हणून तर जन्मापासूनची प्रत्येक आठवण राहत नाही. 

दिवसभरात अनेक प्रसंग घडतात. त्यातले जास्तीत जास्त प्रसंग विसरले जातात. रस्त्यावरून जाताना जे काही दिसतं, ते लगेचच विसरलं जातं. कारण ते सगळं लक्षात ठेवण्याची गरज नसते.

रात्रीच्या झोपेत मेंदू दिवसभराच्या घटनांचे वर्गीकरण करायला घेतो. ज्या घटना पुढच्या काळात आवश्यक नाहीत असं वाटतं त्या सर्व डिलिट होतात. त्याचप्रमाणे ज्या घटना पुढच्या काळात गरजेच्या असू शकतात, त्या सर्व आठवणी मेंदूत शिल्लक राहतात. कोणत्या आठवणी ठेवायच्या आणि कोणत्या आठवणी आधी पुसट आणि मग डिलिट करायच्या, हे मेंदू ठरवतो.

त्यामुळे आजच्या दिवसात समजा आपण १६ तास जागृतावस्थेत आहोत, त्या कालावधीतल्या किती आठवणी त्याच रात्री किंवा दुसऱ्या दिवशी – तिसऱ्या दिवशी आठवतात? असे आपण जगलेल्या आयुष्यातील रोजचे दिवस बघितले तर एकूण किती अशा आठवणी आपल्याकडे असतात? खरं सांगायचं तर एकूण जगलेल्या आयुष्यातली फारच थोड्या, पण महत्वाच्या, नेमक्या आठवणी स्मरण केंद्रात असतात. या आठवणी आनंदाच्या असतात, दु:खांच्या, अपमानाच्या, कौतुकाच्या, मजेच्या असतात. तशाच कंटाळ्याच्या सुद्धा  असतात.

आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण म्हणजे एक एक घटना असते. त्या सर्व लक्षात ठेवल्या जात नाहीत. प्रत्येक आठवण लक्षात ठेवणं हे मेंदूच्या दृष्टीने अवघड आहे आणि तसं अनावश्यकही. कारण त्या घटना तितक्या गरजेच्या नाहीत. म्हणून मेंदूने त्या डिलिट केल्या आहेत.

- डॉ. श्रुती पानसे, मेंदू आणि शिक्षण अभ्यासक shruti.akrodcourses@gmail.com