शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

कुंपणावर नको, मैदानात उतरा !

By admin | Updated: February 10, 2017 17:37 IST

अस्वस्थता फक्त आपल्या देशातच नाही, याची मला जाणीव आहे. अवघ्या जगालाच या अस्वस्थतेची झळ लागते आहे.प्रश्न आता केवळ काही समाज-समूहांमधल्या अंतर्गत वादांचा नाही.या जागतिक लढाईला आता ‘सहिष्णू विरुद्ध असहिष्णू’ असं अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. मूलतत्त्ववादी; मग ते कोणत्याही धर्माचे असोत, ते एकमेकांची ‘मिरर इमेज’च असतात. प्रश्न धर्माचा नाही, धर्मांधतेचा आहे! असहिष्णुतेचा आहे!!

शबाना आझमी
शब्दांकन : जयश्री देसाई
 
संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’च्या सेटवर जो धिंगाणा घातला गेला, ते बदलत्या वर्तमानाचं आणखी एक क्लेशदायी उदाहरण!
- हे असे प्रकार इतक्या वारंवारतेने घडतात तेव्हा त्यामागच्या संगतीने एक चीड आणणारी, अस्वस्थ आणि भयावह अशी मन:स्थिती तयार होते. मी सध्या त्या अस्वस्थतेत आहे. कलाकार म्हणून आणि या देशाची नागरिक म्हणूनही!
‘वॉटर’ नावाचा चित्रपट मी केला, तेव्हा अशा हटवादी झुंडशाहीचा फटका आम्हाला थेट बसला होता, तेव्हाची परिस्थिती आज आठवते. त्यावेळी मी राज्यसभेची खासदार होते; पण आमची एक चूक झाली जी नंतर लक्षात आली. आणि आज मागे वळून बघताना ती प्रकर्षाने जाणवते. चूक अशी की, या चित्रपटातल्या भूमिकेसाठी मी गंगेच्या घाटावर माझं डोकं भादरून घेतलं आणि दुसऱ्या दिवशी त्याची फोटोसकट बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली. त्याने वादळ उठलं. आणि ‘वॉटर’च्या विरोधात वादळ पेटवलं गेलं. एका समाज-गटाने चित्रपटाची कथा-पटकथा वाचायची तसदीही न घेता परस्पर असं ठरवून टाकलं की हा चित्रपट हिंदू विरोधी आहे, स्त्री विरोधी आहे आणि हिंदू स्त्रियांचं विपरित चित्रण करणारा आहे. त्यांनी आमचं चित्रीकरण रोखलं. त्यानंतर आम्ही तिथल्या एका पंडिताला चित्रपटाची पटकथा वाचायला दिली. त्याने ती वाचून असा निर्वाळाही दिला की, यामध्ये हिंदू विरोधी/स्त्री विरोधी असं काहीही नाही; पण ‘त्या’ गटाचा अजेंडा ठरलेला होता. त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की, तुमच्यावर १४४ कलम लावण्यात आलंय, त्यामुळे तुम्ही सेटवर जाऊन शूटिंग करू शकणार नाही.
मी म्हटलं, असं तोंडी सांगून काही नाही होणार. मला एक तासाच्या आत तसा लेखी आदेश आणून द्या. नाही तर आम्ही सगळे शूटिंगला जाऊ.
तो आदेश काही आला नाही. आम्ही शूटिंगसाठी निघालो. ते कळल्यावर निरोप आला, ‘बाहेर दहा हजार लोक रस्त्यावर उतरलेत आणि तुमचा निषेध करतायत. तुम्ही जाऊच शकणार नाही.’
आमच्या बरोबर रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सचे ४०० जवान होते. त्यांच्या बंदोबस्तात आम्ही निघालो तर बाहेर रस्त्यावर दहा हजार सोडाच, दहाही लोक नव्हते!! जिथे शूटिंग होणार होतं त्या घरात गेलो तर तिथे फक्त १२ जण ‘वॉटर’ हाय हाय ...’, ‘गो बॅक’ वगैरे घोषणा देत होते.
बंदोबस्तासाठी असलेली यंत्रणा या गटाला सहज हाताळू शकली असती; पण तसं न करता त्यांनी आम्हालाच सांगितलं, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे तुम्ही शूटिंग थांबवावं, हे बरं...’
मी राज्यसभेची खासदार असताना भाजपाशासित राज्यात हे अनुभवलं आहे. संजय लीला भन्साळींच्या बाबतीत घडलेला प्रकारही भाजपाशासित राज्यातच घडावा, हा योगायोग नव्हे. इथेही विरोध करणाऱ्या लोकांनी पटकथा वाचलेली नाही. जे दृश्य चित्रपटात आहे असं मानून हा हल्ला करण्यात आला ते दृश्य त्यात खरंच आहे की नाही, हे बघायची तसदी घेतलेली नाही.. 
आणि अशा तऱ्हेने कायदा हातात घेणारे, हल्ला करणारे हे मूठभर लोक खरंच कोण आहेत? त्यांना जे पसंत नाही त्याबाबत निषेध नोंदवण्याचा पूर्ण अधिकार आहे, हे मी मान्य करते. पण त्या निषेधाची तऱ्हा हिंसेची? बळजोरीची?
आजकाल आपल्या देशात प्रत्येकाच्याच भावना प्रत्येकच बाबतीत दुखावल्या जायला लागल्या आहेत. हे सगळं प्रकरण आपल्या सामाजिक स्तरावर नेमका प्रकाश टाकणारं असलं, तरी तो वेगळ्या चर्चेचा मुद्दा झाला. या देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाचाच निषेध नोंदवण्याचा अधिकार अबाधित राहिलाच पाहिजे, याबाबत दुमत नाही.. पण निषेधाचे अनेक सनदशीर मार्ग उपलब्ध असताना जे हिंसक मार्ग अवलंबतात त्यांना यंत्रणेने अटकाव करावा, अटक करावी. आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये एवढीच माझी मागणी आहे आणि ते का केलं जात नाही; हा प्रश्न!
नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर प्रखर राष्ट्रवादाची उभारणी ज्या तऱ्हेने आणि मार्गाने चालू आहे; त्या मार्गात माझ्यासारख्या प्रश्न विचारणाऱ्या व्यक्ती थेट ‘देशद्रोही’च ठरवल्या जाऊ लागल्या आहेत, हे मला अत्यंत चिंताजनक वाटतं.
आमच्याच घरात घडलेली एक अत्यंत धक्कादायक व अतिवेदनादायी घटना सांगते, संजय लीला भन्साळीवर हल्ला झाल्यावर तन्वीने (आझमी) एक ट्विट केलं-
‘पद्मावती’च्या सेटवर संजय लीला भन्साळी यांच्याबाबतीत जे घडलं ते धक्कादायक होतं.. हा माझा भारत असूच शकत नाही!’
...झालं! 
समाजमाध्यमांमधल्या झुंड टोळ्यांनी मिळून तिला झोडायला सुरु वात केली. तिच्या विधानाचा अर्थ समजून न घेता ‘हा तुमचा भारत असू शकत नाही तर मग पाकिस्तानात जा...’ वगैरे वगैरे अनर्गल भाषा सुरू झाली. 
या सगळ्या प्रकाराने साहजिकच तन्वी खूप अस्वस्थ झाली. तिची मुलगी अवघी १३ वर्षांची आहे. तिने तन्वीला थेटच विचारलं,
‘तुला हे लिहायला कुणी सांगितलं होतं? आता तुला ते देशद्रोही ठरवतील!’ 
अवघ्या तेरा वर्षांच्या मुलीला हे जाणवणं किंवा ‘अशी धास्ती’ वाटणं ही भारतासारख्या लोकशाही देशात भयावह गोष्ट नाही?
सरकारवर टीका करणं किंवा अशा एखाद्या हल्ल्याच्या घटनेवर आपलं मत मांडणं, त्यातल्या न पटलेल्या गोष्टींवर टीका करणं यात कसला आलाय देश द्रोह? मुळात त्याचा देशभक्तीशी संबंधच काय? 
अत्यंत सुसंगत, पद्धतशीरपणे वातावरण कलुषित केलं जाणं मला जाणवतं आहे. त्यातल्या सलगतेची आणि अतीव थंडपणे पण सातत्याने दिल्या जाणाऱ्या वळशांची मला धास्ती वाटते.
बेडकाची ‘जुनी’ गोष्ट ‘नवी’ होते आहे का, अशी शंकाही येते. बेडकाला उकळत्या पाण्यात टाकलं तर तो त्यातून टुणकन उडी मारून बाहेर येतो आणि आपला जीव वाचवतो. पण हेच जर त्याला गार पाण्यात ठेवलं आणि खालून विस्तव लावला तर जसजसं पाण्याचं तपमान वाढत जातं, तसं तसं तो बेडूक त्याच्या शरीराचं तपमान जुळवत राहतो आणि शेवटी ते अशक्य झाल्यावर मरून जातो... कारण पाणी हळूहळू तापत जाऊन शेवटी उकळणार आहे हे त्याला आधी माहीत नसतं. 
आपण थंडगार पाण्यात ठेवलेल्या त्या बेडकासारखे होत चाललो आहोत का?
- माझी हरकत मतभिन्नतेला, विरोध प्रदर्शनाला नाही. हा विरोध कोणत्या रीतीने प्रदर्शित होतो आणि ती रीत जर कायदा मोडणाऱ्या झुंडशाहीची असेल, तर त्यावर शासन यंत्रणा काय भूमिका घेते, हा माझा मुद्दा आहे.
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे त्याहूनही पुढचं आणि अतीव मोलाचं असं लोकशाही मूल्य आहे. मी फक्त त्या आधी येणाऱ्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल बोलतेय.
ही लोकशाही आहे आणि इथे हिंसाचाराला, झुंडशाहीला स्थान असूच शकत नाही; असा स्पष्ट संदेश आपलं सरकार, शासन यंत्रणा समाजाला देते आहे का, हा माझा प्रश्न आहे.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा तर आपला घटनादत्त अधिकार आहे. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याच्या नावाखाली चालणारा स्वैराचार किंवा इतिहासाचं विकृतीकरण यात एक अतिशय पुसट अशी सीमारेषा असते, अनेकदा ती उल्लंघली जाते. त्याचा मला त्रास होतो. माझं हे मत अनेक उदार मतवाद्यांना फारसं पटत नाही; पण स्वातंत्र्य हे कधीच संपूर्ण, निरंकुश असूच शकत नाही, हे मला मान्य आहे.
लोकांच्या भावनांचा, धारणांचा सन्मान केला गेलाच पाहिजे. अकारण त्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची दक्षताही घेतली गेली पाहिजे. तसं होत असेल तर विरोधाचा, निदर्शनांचा मार्गही खुला असला पाहिजे; पण विरोध म्हणजे हिंसाचार नव्हे, झुंडशाहीसमोर कायद्याने मान टाकणं नव्हे!
अशा प्रकरणांच्या बाबतीत माध्यमांनीही एक ठोस आणि कालानुरूप भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असं मला वाटतं. कुणीही मूठभर लोक उठतात, अख्ख्या समाज-समूहाचे आपणच प्रतिनिधी असल्याचा आव आणून भूमिका घेतात आणि माध्यमंही त्यांच्या मागे धावतात. 
मूठभर विघ्नसंतोषी लोकांचे गट एका मोठ्या समाज-समूहाचे प्रतिनिधी म्हणून माध्यमांमध्ये झळकत राहतात आणि आपला तात्कालिक हेतू साध्य करून पुन्हा लोप पावतात. ज्यांना एरवी कुणी ओळखतही नसतं अशी मंडळी देशभर पसरवल्या गेलेल्या विद्वेषाचं मूळ ठरतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचं तारतम्य माध्यमांनी दाखवलं पाहिजे.
अस्वस्थता फक्त आपल्या देशातच नाही याची मला जाणीव आहे. अवघ्या जगालाच या अस्वस्थतेची झळ लागते आहे.
हा प्रश्न आता केवळ काही समाज-समूहांमध्यल्या अंतर्गत वादांचा अगर ‘हिंदू विरु द्ध मुस्लीम’ किंवा ‘मुस्लीम विरु द्ध ख्रिश्चन’ अशा धर्म-लढाया पुरताही मर्यादित राहिलेला नाही.
या जागतिक लढाईला आता ‘सहिष्णू विरुद्ध असहिष्णू’ असं अधिक व्यापक स्वरूप आलं आहे. एक लक्षात घेतलं पाहिजे की, मूलतत्त्ववादी; मग ते कोणत्याही धर्माचे असोत ते एकमेकांची ‘मिरर इमेज’च असतात. संजय लीला भन्साळी यांच्यावर हल्ला करणारे हिंदू होते. पण त्यांच्यावर ज्या जयपूरमध्ये हा हल्ला झाला त्याच जयपूरमध्येच भरलेल्या ‘लिटररी फेस्ट’मध्ये काही मुल्लांनी उठून तस्लीमा नसरीन यांच्यावर हल्ला चढवलाच की!
प्रश्न धर्माचा नाही, धर्मांधतेचा आहे, असहिष्णुतेचा आहे, त्याकडे तसंच बघायला हवं. मतभिन्नता व्यक्त करण्यासाठी, विरोध दर्शविण्यासाठी जे कुणी हिंसेचा आधार घेत असतील त्यांचा निषेधच व्हायला हवा. त्यासाठी आज जे जे कुंपणावर बसून चिंताग्रस्त आहेत त्यांनीही थेट मैदानात उडी घेऊन तशी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी... तरच ही लोकशाही टिकेल!
 
(लेखिका ख्यातनाम अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.)