शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
4
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
5
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
6
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
7
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
8
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
9
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
10
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
11
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
12
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
13
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
14
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
15
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
16
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी
17
AI क्राईम प्रिडिक्शन सिस्टम: गुन्हेगारांना पकडण्यासाठी आता 'हा' देश घेणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सची मदत
18
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
19
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
20
आयटी कंपनीने ८०% कर्मचाऱ्यांना एकाचवेळी कामावरुन काढलं; कारण वाचून हैराण व्हाल

चीन वेशीपलीकडली दिवाळी

By admin | Updated: October 28, 2016 17:16 IST

चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाला सणासुदीच्या दिवसांत मोठा आधार असतो तो इथल्या ‘ताओबाओ’चा! फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारं हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर.

 - पल्लवी गोरे

चीनमध्ये वास्तव्याला असलेल्या प्रत्येक भारतीयाला सणासुदीच्या दिवसांतमोठा आधार असतो तो इथल्या ‘ताओबाओ’चा!फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारं हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर. या आॅनलाइन दुकानात रायपूर (छत्तीसगढ) मध्ये बनलेल्या गुलालापासून पतंजलीच्या तुपापर्यन्त आणि सोनपापडी, काजूकतली ते कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगांपर्यंत काय म्हणाल ते मिळतं. अगदी गूळसुद्धा!मूवर्स आणि पॅकर्सनी सामानात भरलेल्या डब्यांपैकी ३८ नंबरचा डबा शांघायला येऊन पोचला. डबा लहानसा. त्यावर मी लेबल लावलं होतं- 'स्र१ं८ी१ ३ँ्रल्लॅ२'. खरं तर तो डबा वेगळा भरायची गरज नव्हती. पण तुपात भिजलेल्या फुलवाती असल्यामुळे समजा कस्टम्समध्ये तो 'क्लीअर' झाला नाही तर इतर सामान उगीच अडकायला नको; म्हणून वेगळा ठेवला होता.विदेशात स्थलांतराची ही काही पहिली वेळ नव्हती. तरी थेट चीनलाच बदली घेऊन जायचं ठरल्यावर मनात हुरहुर लागून होती. सोबत काय नेता येईल? काय नाहीं? - जगाच्या पाठीवर कुठल्याही देशाला बिऱ्हाड-बाजलं हलवा; या बाबतीत प्रत्येक वेळी अनुभव वेगळे. कस्टम्सचे नियम तर देशागणिक बदलतात... आणि चीन? - विचारूच नये!!पूर्वेकडचा हा शेजारी देश आपल्यासाठी काहीसा अनोळखीच राहिला. त्यामुळे चीनची वेस ओलांडताना मनात संमिश्र भावनाच होत्या. आता शांघायमधल्या वास्तव्यानंतर वाटतं, आपल्या मनातल्या भावना पुष्कळशा अज्ञानावरच आधारलेल्या होत्या.आम्ही याच वर्षी आॅगस्ट महिन्यात शांघायला आलो. लगेच २-३ आठवड्यांनी गौरी-गणपतीचे आगमन. भारतातून सोबत नेलेली वैशंपायन गुरुजींची सीडी लावून प्रतिष्ठापना केली. शांघायच्या पब्लिक गार्डनमध्ये जरा वेगळी पण दूर्वा मिळाली. मोदकांचा नैवेद्य झाला. भारतातून धातूची गणेशमूर्ती करून नेली होती. आपल्या इष्टदेवतेचे लपून छपून विसर्जन करणे मनाला पटेना. इथे नोकरी-व्यवसायानिमित्त वास्तव्याला आलेले अनेक लोक गणेशाची स्थापना करतात. मग परस्परांकडे जाऊन दर्शन, आरती इत्यादि कार्यक्रम होतात. मी आमच्या घरी मैत्रिणींबरोबर  अथर्वर्शीर्षाची आवर्तनेही केली. भारतातून येण्यापूर्वीच शांघायला असलेल्या भारतीय संघाची माहिती इंटरनेटवरून काढली होती. तसेच इथे ‘शांघाय मराठी मंडळ’ही आहे हे इतर भारतीय मित्रांकडून कळले तेव्हा मोठाच आधार वाटला. गणपतीच्या दहा दिवसांत एक वीकेण्ड साधून ‘गणेशोत्सव’ साजरा होतो. एका हॉटेलमधे बॉलरूम बुक करून सुंदर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. येणाऱ्या पिढीला मराठी भाषा आणि परंपरेचा वसा आपोआपच मिळतो. शांघाय मराठी मंडळ स्थापन होऊन आता दहा वर्षे झाली आहेत. सदस्य संख्या फार नाही, पण उत्साह दांडगा. गुढीपाडवा हा दुसरा कार्यक्रम. त्यानिमित्ताने अनेक मराठी कलावंतही शांघायला येऊन गेले आहेत. या देशात भाषेचा अडसर फार मोठा. त्यामुळे मिसळण्यावर मोठी बंधने पडतात. परदेशी लोक - ज्यांना इथे ‘एलियन्स’ मानतात - ते तसे वचकूनच राहतात. आसपासच्या वातावरणाबद्दलची कुठलीही माहिती अनुवादाशिवाय कळत नाही. ‘एलियन्स’ना जेवढे कळू द्यायचे आहे तेवढेच सांगितले जाते. अशा वातावरणात आमच्यासारखे विदेशी लोक संस्कृतीच्या ओलाव्याला मुकतात.ती पोकळी मंडळाचे कार्यक्रम भरून काढतात. कार्यक्रमाचे स्वरूप धार्मिक नसून सार्वजनिक असते. गीतेच्या वर्गापासून बुक क्लब ते धावण्याच्या ग्रुप्सपर्यंत कितीतरी गोष्टी इथे सतत चालू असतात.  दिवाळी, नवरात्रातला दांंडिया हे सण सर्व भारतीय एकत्र येऊन साजरे करतात.सुमारे दहा वर्षांपूर्वी चीनच्या मुख्य शहरांमध्ये नोकरीच्या निमित्ताने येणाऱ्या भारतीयांचे प्रमाण वाढले. तोपर्यन्त व्यापारीवर्गच प्रामुख्याने भारतातून किंवा हाँगकाँगहून यायचा. ग्वांग्जो, यीवू श्यान्शी ह्या शहरात येणारे भारतीय पिढीजात ‘ट्रेडर्स’ होते. २००० नंतरच नोकरीनिमित्ताने होणारे स्थलांतर वाढले. त्यामुळे आता या शेजारी देशात नोकरदार भारतीयांची संख्या मोठी आहे.एकदा मनात ठरवले, की देश असो वा विदेश; माणूस हळूहळू रुळू लागतो. माझेही तेच झाले.शांघायमधल्या डिपार्टमेण्टल स्टोअर्समुळे ‘आपल्या’ स्वयंपाकासाठीची किराणा खरेदी खूपच सोपी झाली आहे. भाजीपाला भारतातल्यासारखाच मिळतो. मंडई म्हणजे इथले वेट मार्केट! इथेही भारताप्रमाणेच शेवटून कांद्याची पात द्यायची पद्धत आहे. भारतीय लोकांना इथे ‘इन्दुरन्स’ म्हणतात. कुणी ‘इन्दुरन’ दिसला की भाजीने भरलेल्या पिशवीत ‘श्याङ चाइ’ टाकू का विचारतात. ‘श्याङ चाइ’ म्हणजे आपली कोथिंबीर! शांघायमध्ये भारतीय खाद्यपदार्थांची दोन एक दुकाने आहेत. अर्थात, नेहमीच सगळे मिळते असे नाही. एक घरपोच सेवाही उपलब्ध आहे. पण सर्वात भन्नाट प्रकार म्हणजे ‘ताओबाओ’. फ्लिपकार्ट असो की अमेझॉन; या सगळ्यांना मागे टाकणारे हे खास चायनीज आॅनलाइन स्टोअर. या आॅनलाइन दुकानात रायपूर (छत्तीसगढ) मध्ये बनलेल्या गुलालापासून पतंजलीच्या तुपापर्यंत आणि सोनपापडी, काजूकतली ते कढीपत्ता, शेवग्याच्या शेंगांपर्यंत काय म्हणाल ते मिळतं. अगदी गूळसुद्धा. दिवाळीच्या दिवसांत मिठाया आणि फरसाणचा नवीन स्टॉक येतो.    इथे फटाक्यांना भर शहरात जरी बंदी असली तरी शहराबाहेर फटाके वाजतात. त्यामुळे शांघायमधली दिवाळी गाजत वाजत साजरी होते. शिवाय लहानमोठी गेट-टुगेदर्स असतातच.घरकामासाठी मदतनीस स्त्रिया मिळतात. त्यांना इथल्या स्थानिक भाषेत ‘आयी’ म्हणतात, हे कळले तेव्हा विशेषच वाटले होते.उच्चपदस्थ नोकरदारांना बहुतेक करून ड्रायव्हरसह गाडीसुद्धा मिळते. पण त्यांना सूचना देताना भाषेची तारांबळ उडते. त्यांची चिनी आणि आपली खाणाखुणांची सांकेतिक भाषा मिसळून मजेदार संवाद सुरू होतो. पण आता हळूहळू मराठी भारतीयांची संख्या वाढते आहे तसतशा शांघायमध्ये मराठी स्वयंपाकात तरबेज असलेल्या ‘आयी’ मिळू लागल्या आहेत. एक बाई तर चक्क आॅर्डर घेऊन मऊसूत घडीच्या पोळ्या करून देतात. या ‘आयी’ आणि ड्रायव्हर्स आदि सेवाक्षेत्रातले मनुष्यबळ सधन असते इथे.१९८० पर्यन्त भारत आणि चीनच्या परिस्थितीत फार काही फरक नव्हता. शिवाय  लोकसंख्या आपल्याहून जास्त. गेल्या दहा वर्षात चीनने जवळपास ६० कोटी लोकांना निम्न वर्गातून मध्यम वर्गात पोचवले आहे. यामागचे मला जाणवणारे मोठे कारण इथले उत्कृष्ट आधुनिक दळणवळण! वाहतुकीसाठीच्या बंदरांपासून गावं आणि शहरांची अंतरे कमी केली की विकासाला कसा वेग येतो, हे इथे शांघायमध्ये जाणवते. आज अख्खे जग चिनी मालाने भरले आहे पण इथल्या लोकानां ‘इंपोर्टेड’ गोष्टींचे मोठे वेड!! आपल्या भारतीय बाजारपेठा ‘मेड इन चायना’ने भरल्या असल्याचा संताप इथे वाचताना त्यातली अपरिहार्य हतबलता जाणवल्यावाचून राहत नाही. इथल्या बाजारातून वस्तू भारतात नेऊन नफा कमावणारे कितीतरी भारतीय कारणाकारणाने भेटतात. हे अर्थचक्र!! कितीतरी नामांकित धनिक, आर्किटेक्ट इथे येऊन नव्या वास्तूसाठी लागणारे तयार फर्निचर घेऊन जातात. अशी किती उदहरणे द्यावीत!!एक मात्र जाणवते - भारतीयांच्या बुद्धिमत्तेवर सामान्य चिनी माणसाचा मोठा भरवसा आहे. त्याला हेवा वाटतो आपल्या इंग्रजी भाषेवरच्या अधिकाराचा आणि कॉम्प्युटरच्या शिक्षणाचा. या देशातली तरुण पिढी जरी अमेरिकेकडे आकर्षित झालेली असली, तरी वृद्धांना भारताचे वेगळे आकर्षण आहे. ह्याचा प्रत्यय बौद्ध मंदिरे बघताना हमखास येतो. आपण ‘इन्दुरन’ आहोत हे कळल्यावर लगेच वागणुकीत आदरभाव जाणवतो.दोन्ही देशात साम्यही खूप आहे आणि एकमेकांकडून शिकण्यासारखेही खूप आहे.