शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

डिजिटल होम-स्कूलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:55 IST

लॉकडाऊनमुळे सर्वच घटकांवर मोठा परिणाम झालेला आहे. यात शिक्षणही अपवाद नाही. वर्गात बसून शिकवणे आणि शिकणे शक्य नसल्याने होम स्कूलिंगला सुरुवात झाली. अ‍ॅक्सेस करा आणि शिका ही शिकण्याची उत्तम पद्धत आहे. याच विचार प्रवाहातून दीप (डिजिटल एज्युकेशन एम्पॉवरमेंट प्रोग्रॅम) फाउंडेशनने तंत्रज्ञानावर आधारित केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग विद्यार्थ्यांना घरबसल्या रंजक पद्धतीने शिकण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत.

सदर प्रयोगांच्या मदतीने आपणही आपल्या घरातील टीव्ही, स्मार्ट फोन्स यासारख्या गॅजेट्सचा वापर करून आपल्या घरात डिजिटल होम स्कूलिंग सुरू करू शकता.

ऑफलाईन डिजिटल लायब्ररीस्मार्ट टीव्हीतील अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचा वापर करून आपण आपल्या घरातच ऑफलाईन डिजिटल लायब्ररी तयार करू शकतो. यासाठी आपल्याकडे जास्त स्टोरेज असलेल्या एखाद्या पेनड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्हची आवश्यकता आहे. पेन ड्राईव्ह किंवा हार्ड ड्राईव्हमध्ये आपल्या मुलांच्या इयत्तेनुसार फोल्डरवाईज कन्टेन्ट अ‍ॅड करून सदर हार्ड ड्राइव्ह किंवा पेन ड्राईव्ह टीव्हीच्या अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमला जोडा. यानंतर आपल्या स्मार्ट फोनवर ‘डिलिंक’ हे लोकल नेटवर्किंगचे अ‍ॅप्लिकेशन इन्स्टॉल करून हार्ड ड्राईव्ह किंवा पेन ड्राईव्हमध्ये ठेवलेला कन्टेन्ट आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अ‍ॅक्सेस करता येऊ शकेल. यात वायफाय फक्त माध्यम म्हणून काम करेल. विशेष म्हणजे डिजिटल लायब्ररीमध्ये शेकडो पुस्तकांचा व व्हिडिओचा समावेश करता येऊ शकतो.

घरचा टीव्ही : डिजिटल फळालॉकडाऊनच्या काळात तर मुलांचे टीव्ही पाहणे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अशा परिस्थितीत टीव्ही पाहणेच जर अभ्यास झाला तर..! यासाठी काही क्लृप्त्या आपल्यासाठी निश्चित उपयुक्त ठरतील. तीन वर्षांपूर्वी घरातील टीव्हीवर मी हा प्रयोग केला होता. टीव्हीच्या स्क्रीनवर एक टच स्क्रीन इंटरफेस लावून टीव्हीची पॅसिव्ह स्क्रीन टच स्क्रीनमध्ये कन्व्हर्ट केली. ज्यामुळे घरचा टीव्ही इंटरॅक्टिव बोर्डमध्ये परावर्तित झाला. घरच्या टीव्हीवर विविध शैक्षणिक अप्लिकेशन टचस्क्रीन पद्धतीने हाताळणे, त्यातील अ‍ॅक्टिव्हिटी पेन टूलने सोडवणे टीव्हीच्या स्क्रीनवर विविध रंगात लिहिणे, पुसणे, सेव्ह करणे आदी इंटरॅक्टिव बोर्डचे सर्व पॉवरफुल टूल मुलांना घरबसल्या घरच्या टीव्हीवर अनुभवयास मिळाले. सदर इंटर्वेंशन दीप फाऊंडेशनच्या माध्यमातून शेकडो शाळांपर्यंत तसेच अनेक घरांमध्ये पोहचवले गेले आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या अ‍ॅक्टिव्हिटी बेस डिजिटल लर्निंगचा आनंद घेता येत आहे.घरच्या टीव्हीचा डिजिटल फळा म्हणून वापर करण्यासाठी आणखी एक साधा प्रयोग आहे. ज्यात टीव्हीच्या आकाराची काच घेऊन टीव्हीच्या स्क्रीनवर चिटकवून स्क्रीनवरील अ‍ॅक्टिव्हिटी सोडवण्यासाठी साध्या मार्करचा किंवा स्केच पेनचा वापर करता येतो. घरातील टीव्ही व स्मार्टफोन यांच्या मदतीने घरबसल्या शिकण्याची आणखी एक उत्तम पद्धत म्हणजे स्क्रीन कास्टिंग किंवा स्क्रीन मिररिंग. यात आपल्या स्मार्ट फोनची स्क्रीन टीव्हीच्या मोठ्या स्क्रीनवर वायरलेस पद्धतीने परावर्तित केली जाते.

इलेक्ट्रिक टीचिंग एडहलणारी, डोलणारी विविध आवाज करणारी इलेक्ट्रिक खेळणी मुलांना नेहमी आकर्षित करतात. या कारणाने घरोघरी अशी अनेक इलेक्ट्रिक खेळणी आपल्याला सापडतील. अशाच एका इलेक्ट्रिक कारच्या मदतीनं मी बनवलेले टिचिंग एड निश्चित आपल्या मुलांना उपयुक्त ठरेल. चालू स्थितीत असलेली एक इलेक्ट्रिक कार घेऊन कारचे आॅन-आॅफ स्विच काढून टाकले व स्विचमधून प्लस आणि मायनस अशा दोन वायर बाहेर काढून वायरच्या दोन्ही टोकांना मल्टिमीटरच्या दोन पिन शोल्डर केल्या गेल्या. त्यानंतर काही कुठे घेऊन त्यावर बहुपर्यायी प्रश्नांची प्रश्नपेढी तयार केले गेली. प्रत्येक प्रश्नासमोर व उत्तराच्या पर्यायासमोर मेटल पिन लावल्या गेल्या. पुठ्ठ्याच्या मागील बाजूस प्रश्न व योग्य उत्तर असलेल्या पर्यायाची पिन तारेने जोडून घेतली. ज्यावेळी मुले मल्टिमीटरच्या पिनचे एक टोक प्रश्नासमोरील मेटल पॉईंटवर तर दुसरे टोक उत्तराच्या योग्य पर्यायासमोरील मेटल पॉईंटवर ठेवतात, त्या वेळेला कार आपोआपच चालू होते. हा जादुई अनुभव मुलांना खूप व्यस्त ठेवतो. यांसारख्या अ‍ॅक्टिव्हिटीमुळे मुलांचे खेळणे आणि शिकणे एक होऊन जाते.

  • संदीप गुंड
टॅग्स :Schoolशाळाdigitalडिजिटल