शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

वेगळा प्रयोग

By admin | Updated: November 29, 2014 14:53 IST

विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा ‘विटी दांडू’ हा नवा चित्रपट. दिलीप प्रभावळकर यांनी या धाटणीतला चित्रपट पहिल्यांदाच केला आहे. केवळ तांत्रिक सफाईदारपणाच्या पलीकडे जाऊन हा चित्रपट काही सांगू पाहतो. त्याच्या विविध बाजूंवर त्यांनी स्वत: टाकलेला प्रकाश..

- दिलीप प्रभावळकर

 
मोबाईलवर एकापाठोपाठ येणार्‍या कौतुकाच्या मेसेजनी मनात पुन्हा एकदा ‘विटी दांडू’ घुमला. माझ्या आयुष्यातील हा पहिलावहिला पिरिऑडिक विशिष्ट कालखंडाशी नाळ जोडू पाहणारा सिनेमा.. प्रेक्षकांची त्यावरची प्रतिक्रिया काय असेल, याची उत्कंठा मनात होती.. त्यामुळे येणार्‍या मेसेजमुळे माझ्या मनात उठलेल्या प्रश्नांच्या तरंगांना,  प्रतिक्रियात्मक उत्तरांना वाट मिळाल्याने ती गोष्ट मनाला समाधान देत असावी.. सिनेमा जगण्याच्या प्रक्रियेमधला महत्त्वाचा घटक म्हणून या प्रतिक्रियांना माझ्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व आहे.. कारण, ज्या प्रेक्षकांसाठी आपण हे सारं करतो त्यांना नेमकं काय वाटतं..? ‘विटी दांडू’ हा वेगळा प्रयोग आहे; त्यामुळे त्याविषयीची रिअँक्शन माझ्यासाठी महत्त्वाची आहे. ‘विटी दांडू’ हा स्वातंत्र्यपूर्व काळ ते २0१४ कालखंडामधला अन्वय साधणारा सिनेमा.. हा सिनेमा घटनाप्रधान आहे. त्यामधल्या अँक्शनचंही मला खरंच कौतुक आहे. कारण ढोबळमानानं होणार्‍या आपल्याकडील अँक्शनपेक्षा त्यामध्ये निश्‍चितच सफाईदारपणा आहे.. म्हणून असेल कदाचित अन् ती अँक्शन चिमुरडे करीत असल्यामुळे तो आणखी वेगळ्या कौतुकाचा मुद्दा आहे. यातल्या दाजींनी मला खूप काही दिलं. ती केवळ एक व्यक्तिरेखा म्हणून राहिली नाही. अशा काही निवडक व्यक्तिरेखा असतात, की ज्या आपल्याला न मागताही बरंच काही देऊन जातात.. आपल्याला त्या करून मिळालेलं समाधान 
 
हे महत्त्वाचं असतंच; पण तरीही त्याला जेव्हा प्रशंसेचं कोंदण मिळतं, त्या वेळी त्यावर शिक्कामोर्तब झालेलं असतं. मला या सिनेमामधले दोन-तीन प्रसंग प्रामुख्यानं महत्त्वाचे वाटतात.. कारण या दाजीला संपूर्ण गाव ‘बाटगा दाजी’ म्हणून ओळखतं.. त्यानं इंग्रजांचं वर्चस्व स्वीकारलं अन् त्यांना शरण गेला असला, तरी त्याच्या मनात इंग्रजांविरुद्ध लढताना आपल्या मुलानं आणि सुनेनं प्राणांची आहुती दिली आहे, याचं कुठं तरी भान आहे.. पण, त्या सार्‍याची सावली आपल्या नातवावर पडू नये, यासाठीचा हा प्रयत्न आहे.. हे सगळं असलं तरी त्याला इंग्रजांच्या पुरोगामी असण्यावर आणि त्यांच्या प्रगतिशील अन् विकसनशील दृष्टिकोनाचं विशेष कौतुक आहे; पण या सार्‍यामध्ये आपल्या मुलाच्या बलिदानाची भळभळती जखम या वयस्कर दाजीच्या मनात खोलवर दडलेली आहे.. दाजींचा शोक अनावर होतो, त्या वेळी ते बोटीतून दूरवर जाऊन एकांतात रडतात.. त्या वेळी विकास कदम आणि गणेश कदम या दोघांना तो सीन काहीसा अधिक तीव्र प्रतिक्रियांचा हवा होता. कारण, आजपयर्ंत कोणत्याही नाटक वा सिनेमा वा मालिकेमध्ये माझी रिअँक्शनही इतकी तीव्र नव्हती आणि त्यामुळेच हे सारं माझ्यासाठी नवं होतं. विकास आणि गणेशला ती भावना अधिक संयतपणे दिसायला हवी होती. कारण, त्या दु:खाची असलेली कोंडी.. कारण, दु:ख सांगू न शकल्यामुळे त्या प्रसंगांची ती गरज असल्यामुळे माझ्याकडून त्यांना हव्या त्या पद्धतीनं आपण हे सारं करू या.. असं म्हणून तो सीन केला.. आणि तो पाहताना माझ्या पापण्यांच्या कडाही ओलावल्या होत्या. असं फार क्वचित होतं.. कारण हातात असलेली लाकडी पेटी, विटी आणि ते वृत्तपत्राचं कात्रण.. हे सारं काही घेऊन तीन दिवस चित्रण सुरू होतं. कारण त्या संधिप्रकाशातला तो खेळ.. मागे असलेला नदीचा प्रवाह.. त्यामध्ये आकाशात पसरलेले ते रंग आणि हे सारं पार्श्‍वभूमीला घेऊन उभी राहणारी ती नाव.. होडी.. त्याला लटकलेला कंदील अन् त्यामध्ये मी.. हे सारं आजही माझ्या डोळ्यासमोर येतं. रडण्याचा प्रसंग म्हटला, की आजही माझ्या डोळ्यासमोर ‘नातीगोती’चा तो प्रसंग येतो; ज्यामध्ये आपल्याला जाणवतं, की माझ्या मतिमंद मुलाचा झालेला मृत्यू.. बच्चू गेल्याचं दु:ख आहे. आमच्या कुटुंबावर आभाळ कोसळलंय.. मी लाकडी स्टूलवर बसून मांडीत तोंड खुपसून रडत असतो.. रडण्याची ही अभिव्यक्ती २0-३0 सेकंदांची आहे.. पण त्यामध्ये माझा चेहरा दिसत नाही. इथं मी ज्या प्रकारे रडतो.. वेगवेगळ्या कॅमेरा अँगलनी हे सारं टिपलं जात होतं. मी विकास आणि गणेशवर विश्‍वास ठेवून हा सीन केला. त्या दु:खाची परिसीमा ओलांडणारा तो प्रसंग.. मनात गोठलेल्या प्रसंगांचं कोलाज आहे. दु:ख, शोक आणि त्यामध्ये घुसमटणारे दाजी हे सारं आजही आठवलं तरी मन रोमांचित होतं. हे सारं ज्या प्रभावीपणे चित्रित झालंय ते समाधानकारक आहे, कारण तो तांत्रिकदृष्ट्या सफाईदारपणा आहे; पण त्याहीपेक्षा ते हृदयस्पश्री झालंय, या गोष्टीचं समाधान अधिक आहे. यासोबत दुसरा एक प्रसंग आहे, जो माझ्या मनात आहे. इंग्रजांविषयी असलेला आदर आहे. इंग्रज अधिकार्‍याची बदली होऊन तो गावात येतो.. त्या वेळी नातवाला सोबत घेऊन दाजी भेटायला जातो.. त्या वेळी तो इंग्रज अधिकारी खौफनर त्या चिमुरड्या नातवाला एका हातानं उचलतो.. आणि तेही त्याच्या कोटाची कॉलर धरून व त्या अधिकार्‍याला पाहिल्यावर याच अधिकार्‍यानं आपल्या मुलाला गोळी घालून मारलंय, याची जाणीव होते. तो खौफनर इंग्रज अधिकार्‍याच्या हाताचा आपल्या नातवाला स्पर्श झालाय, ही विटाळाची भावना घेऊन घरी येतो.. त्या वेळचा प्रसंग चित्रित करणं ही तारेवरची कसरत होती, कारण पारदर्शक काचेवर मी आणि निशांत भावसार हा चिमुरडा उभा होता. एका बाजूला असलेली विहीर आणि दुसरीकडे काच.. इकडे आड अन् तिकडे विहीर म्हणजे काय, याची चांगलीच जाणीव झाली होती. त्यामध्ये काचेवर उभं राहणं.. ती घागर निशांतवर उपडी करणं.. त्या काचेच्या खाली असलेला कॅमेरा त्याचं भान मनात ठेवणं.. आणि ते शुद्धीकरणाचं मंत्रोच्चारण हे सगळं करीत असतानाचा प्रसंग खरंच बाका होता, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, त्या वेळी कॅमेरा टीमही ज्या प्रकारे जरा सांभाळून हं, असं सांगत होती.. त्यावरून माझ्या लक्षात येत होतं; पण माझ्यासोबत असणार्‍या चिमुरड्याचा विश्‍वास वाढवत तो प्रसंग उत्तम प्रकारे चित्रित होण्यासाठी धडपडणं एवढंच हातात होतं. यासोबतच मला आठवतंय, की अँटन म्हणजे गौहर खानसोबतचे काही सिक्वेन्स. खौफनर मेल्याचं वृत्त येतं.. अँटन चिडतो. आपल्या मुलाच्या मित्रांना इंग्रज निर्दयीपणे मारत आहेत. आपण काही करू शकत नाही.. हतबल असल्याची ती भावना.. त्या वेळी तो अँटन मला बंदुकीच्या दस्त्यानं मारतो. गौहरनं तो प्रसंग उत्तम प्रकारे केला.. त्याला रिअँक्शन म्हणून मी सिमेंटच्या खांबाला आपटलो.. ते ज्या पद्धतीनं आपटलो, की काही आठवून सोय नाही. मला प्रचंड लागलं.. डोकं तर खूप वेळ ठणकत होतं.. तसंच तुरुंग फोडून देशभक्त पळत असतात, त्या प्रसंगी बंदुकीच्या दस्त्याचा प्रसादही मिळाला होता.. आज नुसत्या त्या मेसेजनं तो सिनेमा नव्यानं जगल्याचं भान पुन्हा एका आलं. या सगळ्यामध्ये शेवट ज्या प्रकारे होतो, त्या वेळी आपल्या मुलाला मारलेल्या इंग्रजांवर प्रहार करण्याची वेळ येते.. त्या वेळी तो दाजी त्या इंग्रजांना क्षमा करतो हा महत्त्वाचा भाग आहे. हल्ल्याला प्रतिहल्ला हे उत्तर नाही होऊ शकत.. क्षमाशीलता हा गुण एका वेगळ्या उंचीवर या सिनेमाला घेऊन जातो.. हे या सार्‍याचं शक्तिस्थान आहे, असं प्रांजळपणे वाटतं. आज या आठवणी जागवण्याची ताकद ‘विटी दांडू’ सिनेमामध्ये आहे, ही खासियत मला महत्त्वाची वाटते.