शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

जॅक मा ची जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 06:22 IST

गरीब घरात जन्म. उपाशीपोटी बालपण आणि नंतरही सतत ‘नापास’ होण्याची, विद्यापीठांपासून कंपन्यांपर्यंत प्रत्येका दारी नाकारलं जाण्याची नामुष्की वाट्याला आलेली! - आज हा माणूस अजस्त्र अशा ‘अलीबाबा’चा सबकुछ आहे, आणि वयाच्या चौपन्नाव्या वर्षी निवृत्त होऊन पुन्हा शिक्षक व्हायला निघाला आहे!

1964. बंद भिंतीआडच्या कम्युनिस्ट चीनमध्ये हॉँगझाऊ या गावात दोन भावंडांच्या पाठीवर एक किडकिडीत मुलगा जन्मला. नाव मा युन. घरची गरिबी. अंधारात दिव्यावर येणारे किडे एकत्र करून त्यांच्या मारामा-या लावायचा खेळ खेळत मा युन मोठा झाला.

धडपड्या होता. शिक्षणाची आवड; पण डोकं फार चालत नसे. 1972 साली अमेरिकेचे प्रेसिडेंट निक्सन हॉँगझाऊला येऊन गेल्यावर अचानक या छोट्या शहरात पर्यटकांची वर्दळ सुरू झाली. तेरा वर्षांचा मा युन भल्या सकाळी मोठमोठय़ा हॉटेलांच्या दारात जाऊन उभा राहू लागला. इंग्रजी बोलायचा सराव मिळण्याच्या बदल्यात त्याने टूरिस्ट गाइड म्हणून काम सुरू केलं.

एका अमेरिकी पर्यटकाने त्याला नवं नाव दिलं : जॅक . मा युन चा झाला जॅक  मा.प्राथमिक शाळेत दोनदा, माध्यमिक शाळेत तीनदा नापास झालेल्या जॅकने कॉलेजच्या प्रवेश परीक्षेतही तीनदा गटांगळ्या खाल्ल्या. शेवटी 1988 मध्ये एकदाची पदवी मिळाली आणि महिना बारा डॉलर पगाराची शिक्षकाची नोकरी.नोकरीत मन नव्हतं म्हणून बहिणीकडून हातउसने पैसे घेऊन जॅकने इंग्रजी भाषांतर करून देणारी कंपनी सुरू केली. एका चिनी कंपनीची अमेरिकेतली उधारी वसूल करण्यासाठी म्हणून 1995 मध्ये जॅक  पहिल्यांदा अमेरिकेला गेला.कॉम्प्युटर आणि कोडिंग याचा काहीही गंध नसलेल्या जॅकने अमेरिकेत पहिल्यांदाच इंटरनेट वापरलं. ती जादू अनुभवून तो थक्कच झाला. त्याने सर्च केलेला पहिला शब्द होता ‘बिअर’! पण एकाही चायनीज बिअरची माहिती त्याला त्या यादीत दिसली नाही. तेव्हा अस्वस्थ होऊन त्याने मित्राच्या मदतीने चीनशी संबंधित माहिती देणारी संकेतस्थळं सुरू करायचं मनावर घेतलं. त्या प्रयत्नांना नाव दिलं : चायना पेजेस! 

 

चीनच्या उद्योगविश्वात पाय रोवत असलेल्या जॅकला सरकारी नोकरीचीही संधी मिळाली. पण नवी दिशा दिसू लागल्यावर 1999 मध्ये तो त्याच्या गावी हॉँगजाऊला परत आला. अपार्टमेंटमधल्या एकूण 17 मित्रांना भरीला पाडून जॅक माने त्यांच्याकडून भांडवल उभं केलं आणि सगळ्यांनी मिळून एक ई-कॉर्मस कंपनी सुरू केली. नाव ठेवलं  ‘अलीबाबा’.

अलीबाबा का? तर  ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’ या कथेत जशी गुप्तधनाची गुहा उघडणारी ‘कळ’ असते, तसा उन्नतीचा गुप्त मंत्र मध्यम आणि छोट्या व्यावसायिकांसाठी खुला व्हावा, म्हणून ! आणि अलीबाबा हा स्वभावाने फार उदार मनाचा व्यापारी होता म्हणूनही !

चीनमधल्या निर्यातदारांना त्यांच्या उत्पादनांची यादी- प्रॉडक्ट लिस्ट- अलीबाबाच्या वेबसाइटवर ठेवता येण्याची सुविधा ही या कंपनीने उपलब्ध केलेली पहिली  ‘सेवा’!

अलीबाबाचा पसारा वाढत गेला आणि विदेशातून परकीय भांडवलाचा ओघ सुरू झाला. 2005 मध्ये चीनमध्ये पाय रोवण्याच्या उद्देशाने याहूने अलीबाबामध्ये एक बिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक केली. 2014 मध्ये अलीबाबाने पब्लिक लिमिटेड अवतार धारण करून न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये नोंदणी केली. अलीबाबाच्या  ‘आयपीओ’ने तब्बल 150 बिलियन अमेरिकन डॉलर्सचं भांडवल उभारून विक्रम केला. त्या रात्री अलीबाबाच्या कर्मचा-यानी चीनमध्ये शानदार पार्टीचं आयोजन केलं होतं. जॅक  त्यांना म्हणाला, ‘ही  श्रीमंती जपून वापरायला शिका. इतरांना मदत करणं विसरू नका. भरपूर काम करा; पण मजा करणं विसरू नका!’ चीनमधली सर्वात  श्रीमंत व्यक्ती म्हणून जॅक माचं नाव झळकलं. त्याची व्यक्तिगत संपत्ती 2500 कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाऊन पोहचली.

आज अलीबाबा ही जगभरातल्या भल्यामोठय़ा बाजारपेठेला सर्व प्रकारच्या सुविधा पुरवणारी अजस्र  ई कॉर्मस कंपनी झाली आहे. ऑनलाइन शॉपिंगसाठी घसघशीत सवलतींचा वर्षाव करणारा ‘सिंगल्स डे’ हे अलीबाबाचं वैशिष्ट्य. गेल्यावर्षी या सिंगल्स डे ला अलीबाबाने फक्त चोवीस तासात तब्बल 18 कोटी अमेरिकन डॉलर्स किमतीच्या वस्तू ऑनलाइन विकल्या.

गेल्या आठवड्यात वयाची चौपन्न वर्षं पुरी केल्यावर जॅक माने पुढच्या वर्षी आपण निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. आज त्याच्या व्यक्तिगत संपत्तीचं मूल्य 3700 कोटी अमेरिकन डॉलर्सवर जाऊन पोहचलं आहे. निवृत्ती घेऊन आवडीच्या शिक्षण क्षेत्रात काम करण्याचा नवा प्लॅन आता या हरहुन्नरी गृहस्थांनी आखला आहे.

जॅक मा म्हणतो, ‘मला अहो-जाहो म्हणू नका. मी साधा माणूस आहे’. आजही त्याच्या सवयी बदललेल्या नाहीत. वाचन, कुंग-फूच्या गोष्टी लिहिणं, पोकर खेळणं, मेडिटेशन आणि ताई-ची हा व्यायाम प्रकार या त्याला आनंद देणा-या मोजक्या गोष्टी! शाळेपासूनची बालमैत्रीण झैंग चिंग हिच्याशी जॅकने 1980 साली लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. पण जॅकचं कुटुंब कधीही प्रसिद्धीच्या झोतात आलं नाही. झैंग चिंग एकदा म्हणाली, ‘जॅक काही हॅण्डसम पुरुष नाही. पण तो जे करू शकतो ते बाकीच्या हॅण्डसम पुरुषांना तरी कुठे जमतं?’ ‘माझं डोकं फार मोठं आहे आणि नाक-डोळेही थोडे विचित्रच आहेत, त्यामुळे मी स्पीलबर्गच्या सिनेमातल्या  ‘ईटी’सारखा दिसतो’, असं जॅक मा एकदा हसून म्हणाला होता. 

‘आंधळ्या वाघावर स्वार झालेला मी एक आंधळा माणूस आहे’, असं जॅक मा स्वत:विषयी म्हणतो. आजचा दिवस कठीण असला, तर उद्याचा आणखी कठीण असतो. पण परवाच्या दिवशी मळभ जाऊन स्वच्छ ऊन पडतंच पडतं, एवढं मी माझ्या आयुष्यात शिकलो असं त्याचं सांगणं आहे.

‘खाजगी उद्योगांनी सरकारशी संबंध जरूर ठेवावे, पण त्यांच्याशी व्यवसाय करू नये. प्रेम-बिम ठीक; पण ते लग्न करण्याच्या लायकीचे लोक नसतात’, असं जॅक माचं नवउद्योजकांना सांगणं आहे.

 

जॅक मा म्हणतो..

‘मी इतकी वर्षं अलीबाबा चालवतो आहे; पण मला कॉम्प्युटरमधलं काहीही कळत नाही. मला सॉफ्टवेअर कशाशी खातात, हे ठाऊक नाही. पण त्याने काय बिघडतं? हुशारातल्या हुशार लोकांच्या टीमचं नेतृत्व माझ्यासारख्या जेमतेम हुशार; पण व्यवहारचतूर माणसाकडेच असलेलं बरं असतं. कारण सगळे हुशार लोक एकसारखा विचार करतात, त्यामुळे टीममध्ये (माझ्यासारखा) एखादातरी अर्धवटराव हवाच हवा !’

 

जॅक मा चा पराक्रम

चीनच्या उद्योगविश्वाची दादागिरी जगभरात पोचवणारा ज्ॉक मा हा मोठा सामर्थ्यशाली उद्योजक; आपल्या कंपनीच्या वार्षिक सोहळ्यातल्या ‘विविध गुणदर्शनात’ हिरिरीने भाग घेतो. अलीकडेच त्याने पूर्ण मेकअप करून सादर केलेल्या पंक रॉक कॉन्सर्टने जगभरात खळबळ माजवून दिली होती.