शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
2
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
3
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
4
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
5
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
6
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
7
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
8
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
9
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?
10
लॅरी एलिसन यांनी मस्क यांना टाकलं मागे! बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; काय करतात व्यवसाय?
11
कोण आहेत अबिदुर चौधरी? ज्यांनी डिझाईन केला Apple चा सर्वात स्लीम iPhone 17 Air
12
नेपाळचे नवे सत्ताधीश कोण? जेन झी ठरविणार, सुशीला कार्की, बालेंद्र शाह, कुलमान घिसिंग चर्चेत
13
"२.४६ कोटी घ्यायचेत"; बँकेच्या बाथरुममध्ये बिझनेसमनने स्वत:वर झाडल्या गोळ्या, कारण...
14
मानेत गोळी लागताच रक्ताची धार अन्...; चार्ली कर्कच्या हत्येचा VIDEO समोर, १८० मीटरवर होता शूटर
15
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
16
आम्ही नेपाळमध्ये सुरक्षित; कुठलीही गैरसोय नाही; ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांनी सांगितली परिस्थिती
17
पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत येऊ शकतात का? सीबीआयसी अध्यक्षांनी सांगितली आतली बातमी
18
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
19
सर्वसामान्यांमध्ये मोठी क्रेझ असणाऱ्या 'Hero Passion+' दुचाकीची GST कपातीनंतर नवीन किंमत काय?
20
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला

कटी पतंग.

By admin | Updated: March 23, 2015 19:39 IST

स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.

वैशाली करमरकर
 
मांजा तुटलेला पतंग काही काळ दिशाहीन तरंगतो. नंतर तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो किंवा कुठेतरी अडकून फाटून जातो. स्वत:च्या संस्कृतीला श्रेष्ठ ठरविण्यासाठी इतर संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापण्याचा आणि त्यांना अधांतरी लटकवण्याचा उद्योग दीर्घ काळापासून सुरू आहे.
-----------------
गेल्या पंधरा-वीस दिवसात युरोपभर आणि इतरत्र फार अचंबित करणा:या घडामोडी घडत होत्या. त्या सर्व घडामोडी ‘सॉफ्ट पॉवर’ या विषयाच्या व्याप्तीला स्पर्श करणा:या आहेत, म्हणून त्याबद्दल उल्लेख जरुरीचा आहे -
1. जर्मनीमधे सर्व ज्यू लोकांना एक अपील करण्यात आले आहे. त्यांनी त्यांची ‘किप्पा’ नावाची तळहाताएवढी गोल टोपी जर्मनीत घालून फिरू नये. कारण त्यामुळे त्यांच्यावर प्राणघातक हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. ‘किप्पा’ घालून फिरले आणि हल्ला झाला तर सरकार जबाबदार नाही, अशा कडक शब्दात ही ‘विनंती’ आहे.
2. ऑस्ट्रीयन सरकारने ‘इस्लामिक लॉ’ नावाचा एक नवीन कायदा केला आहे. ऑस्ट्रीयामधे सहा टक्के लोकसंख्या मुस्लीम आहे. आजवर त्यांच्यासाठी 1912 सालापासून अस्तित्वात असलेला कायदा लागू होता. तो रद्द करून दि. 25 फेब्रुवारीपासून आता हा नवीन कायदा मुस्लीम धर्मीयांना लागू होणार आहे. 
त्यानुसार मशिदींसाठी किंवा इमामांसाठी यापुढे परदेशातून पैसा आणण्यावर सक्तीची बंदी आणली आहे. मुस्लीम समाजाने यावर प्रचंड विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणो आहे की, सर्व ािश्चन आणि ज्यू धर्मीयांना ‘फॉरेन फंडिंग’ म्हणजे परदेशी पैशाची मदत कायदेशीरपणो शक्य आहे; मग आमच्यासाठी हा भेदभाव का?
3. डेन्मार्कमधील एका सांस्कृतिक केंद्रात एक स्वीडनचे आर्टिस्ट, फ्रान्सचे अॅम्बॅसीडर अशी बडी बडी मंडळी एका परिचर्चेसाठी जमलेली होती. चर्चेचा विषय धार्मिक स्वातंत्र्य, कलास्वातंत्र्य आणि मतस्वातंत्र्य असा होता. त्यावेळी या सांस्कृतिक केंद्रावर भीषण दहशतवादी हल्ला झाला. 
4. ब्रेमेन या उत्तर जर्मनीतील शहरात पोलिसांनी एका सांस्कृतिक केंद्रावर छापा घालून काही लोकांना अटक केली आहे आणि अनेक कागदपत्रे जप्त केली आहेत. या सांस्कृतिक केंद्राला सशस्त्र जर्मन पोलिसांनी घट्ट वेढा घातला आहे.
5. मोसूल या इराकमधील शहरात एका वास्तुसंग्रहालयावर भीषण हल्ला झाला. प्राचीन असीरीयन संस्कृतीची अनेक प्राचीन शिल्पे आणि पुतळे या ठिकाणी जतन केलेले होते. सहाव्या आणि सातव्या शतकातील अनेक मौल्यवान शिल्पे हल्लेखोरांच्या हातोडय़ाखाली येऊन चक्काचूर झाली. 
- वरील सर्व घडामोडी फक्त गेल्या काही दिवसातल्या आहेत. सर्व घडामोडींचा संबंध ‘संस्कृती’ या शब्दाशी जाऊन पोहोचणारा आहे. लष्करी तळावरील हल्ले ही गोष्ट समजण्यासारखी आहे. ती इतकी वर्षे प्रत्येक युद्धात अनुभवाला येत होती; परंतु सांस्कृतिक केंद्रे, वस्तुसंग्रहालये, पेहेरावातल्या सांस्कृतिक खुणा यावर हल्ला करण्यासारखे काय आहे? - असा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही.
गेली तीनेक शतके ‘संस्कृती’ या संकल्पनेचा जगभर एखाद्या अस्त्रसारखा उपयोग केला गेलेला आहे. विशेषत: पाश्चात्त्यांकडून. 
चार्लस् डार्वीनने मांडलेल्या उत्क्रांतीवादाचे बोट धरत धरत 19व्या शतकाच्या पूर्वार्धात हरबर्ट स्पेन्सर या ब्रिटिश तत्त्ववेत्त्याने त्याची अजब निरीक्षणो हिरीरीने जगापुढे मांडायला सुरुवात केली. त्यांनी अठराव्या शतकातील सर्व संस्कृतींच्या आजवरच्या उत्क्रांतीचे किंवा प्रगतीचे आलेख मांडले. त्याने त्यासाठी तीन-चार निकष वापरले. ते निकष म्हणजे- एखाद्या संस्कृतीने केलेली आर्थिक प्रगती, तंत्रविज्ञानातील प्रगती, त्या संस्कृतीतील राजकारण प्रणालींची प्रगती आणि लष्करी सामथ्र्यातील प्रगती. 
अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील जग हे बहुतांशी ब्रिटिश आणि युरोपियन टाचांखाली चिरडलेले वसाहतवादी जग होते. जगातील इतर संस्कृतींना नामशेष करीत करीत या वर्चस्ववादी संस्कृतींनी जगभर आपले जाळे पसरवायला सुरुवात केलेली होती. त्यांच्या युरोपियन संस्कारांना जे जे काही म्हणून ‘परके’, ‘वेगळे’, ‘न कळणारे’ असे दिसले, वाटले ते सर्व ‘मागासलेले’ या सदरात जमा केले गेले. 
युरोप सोडून इतर सर्व जग वरील सर्व निकष वापरता ‘अगदीच अप्रगत किंवा उत्क्रांत न झालेले’ असे असल्यामुळे हर्बर्ट महाशयांनी त्यांचा स्वत:चा असा सांस्कृतिक उत्क्रांतीवाद मांडला. या थिअरीनुसार युरोपियन हा एकच वंश ‘जगायला लायक’ असा ठरवला गेला. ‘किल ऑर बी किल्ड’ म्हणजे ‘ठार मारा, नपेक्षा मारले जा’ हे युरोपियन संस्कृतीचे सूत्र ठरविले गेले. 
बिचा:या डार्विनने अनेक शास्त्रीय प्रयोगाअंती निष्कर्ष काढला होता - ‘सव्र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ - म्हणजे ज्या प्रजाती सबळ, सक्षम असतील, त्याच जगायला लायक ठरतील. जीवशास्त्रतील डार्विन यांच्या या प्रयोगांचे निष्कर्ष सरसकट सांस्कृतिक वंशशास्त्रला लावले जातील अशी बिचा:या डार्विन यांना कल्पनाही आली नसेल.
परंतु असे झाले खरे. ‘आमची संस्कृती श्रेष्ठ आहे’ हे सांगण्याचे आणि ते इतरांच्या मनावर ठसवण्याचे कार्य हे आज फार बेमालुमपणो करावे लागते. 
 आज जगावर आपला सांस्कृतिक वरचष्मा स्थापन करण्यासाठी वर्चस्ववादी राष्ट्रांना वेगळी आखणी करणो भाग पडत आहे. त्यासाठी प्रचंड पैसे गुंतवले जात आहेत. 
या आखणीतील पहिली सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही गटांना आपल्या पंखाखाली घेणो. त्यांच्यावर पुरस्कारांची खैरात करणो. त्यांचे जगभराचे दौरे स्पॉन्सर करणो. त्यायोगे समाजातले विद्रोही सूर सतत खदखदत ठेवणो. 
स्वत:च्या संस्कृतीशी असलेली त्यांची नाळ जितक्या लवकर तुटेल तितके चांगले. मांजा तुटलेला पतंग काहीकाळ अधांतरी दिशाहीन तरंगतो आणि मग तो एकतर कापणा:याच्या मुठीत येतो नाहीतर काटेरी झाडांवर पडून आपोआप फाटून जातो.
प्रत्येक संस्कृतीतील विद्रोही आणि फुटीरतावादी वृत्तींना एकीकडे खतपाणी घालायचे आणि त्याचवेळी दुसरीकडे ‘तुमची संस्कृती कशी मागासलेली’ असे बहुसंख्य मनांवर ठसवत राहायचे’ 
- हा पाश्चात्त्य वर्चस्ववादी विचारांचा अगदी जुना खेळ आहे. त्यामुळे इतर संस्कृतींचे खच्चीकरण तर होतेच; पण त्याचबरोबर त्यांच्या स्वत:च्या संस्कृतीचा इगो किंवा आत्मभान सतत फुलारण्याचे काम होत राहते.
गोष्ट म्हटली तर जुनी, म्हटली तर अलीकडची आहे. 
काळ 192क् ते 1926. एका युरोपियन शहराच्या भिंतींवर असंख्य जाहिरातपत्रके चिकटवलेली असत. त्यावरचे शब्द होते- ‘इंडियन्स इन् द झू’. त्या शहराच्या प्राणिसंग्रहालयात गवताच्या झोपडय़ा उभारल्या होत्या. दक्षिण भारतातून आणलेले आदिवासी हे त्यातले जणू प्राणी. ते झाडांवर चढून दाखवत, पुंगी वाजवून सापाला डोलावून दाखवत. मधेच नृत्ये करत. युरोपियन ‘पुढारलेले’ आबालवृद्ध या प्राणिसंग्रहालयाला भेट देत. आणि या ‘मागासलेल्या’ भारतीय वंशाकडे तुच्छतेने आणि अचंब्याने पाहत. 
या युरोपियन राजधानीच्या शहरात शिकणा:या वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय आणि ए.सी.एन. नंबीयार या बहाद्दर भारतीय विद्याथ्र्यानी तेथील प्रसारमाध्यमांमधे तडाखेबंद लिखाण करून 192क् पासून चाललेला हा प्रकार बंद पाडला. 
त्या उभयतानी लेखणी वापरली. इतरेजन बॉम्ब आणि बंदुका वापरतात. सांस्कृतिक नाळ तुटू न देण्याची पोटतिडीक तेवढी दोनही मार्गात सामायिक म्हणायची. 
म्हणून तर ठिकठिकाणच्या संस्कृतीतील लोकांची सांस्कृतिक नाळ कापणो हे  ‘सॉफ्टपॉवर’च्या भात्यातले आणखी एक महत्त्वपूर्ण अस्त्र मानले जाते.
 
महत्त्वाची अस्त्रे 
जसे नेशनचे ब्रॅँडिंग तसे संस्कृतींचेही ब्रॅँडिंग कटाक्षाने केले गेले आहे. अरब जगातील ज्ञानाला तुच्छ लेखले गेले. अरबी संस्कृतीला तुच्छ लेखले गेले. आफ्रिका, पूर्वेकडील संस्कृती, रेड इंडियन्सची संस्कृती, भारतीय संस्कृती - असे अगदी कोणीही या ‘सांस्कृतिक उत्क्रांतीवादातून’ सुटले नाही. युरोपियन संस्कृतीने ‘मागासलेले’ म्हणून भाळी मारून ठेवलेली मेख आज मात्र अनेक संस्कृतींना सहन होईनाशी झालेली आहे.  त्यामुळे आगामी काळात ‘सांस्कृतिक केंद्रे’, ‘संस्कृती प्रचार करणा:या संस्था’, ‘आंतरसांस्कृतिक देवाण-घेवाण केंद्रे’ ही सॉफ्ट पॉवरच्या अस्त्रगारातील सर्वात महत्त्वाची अस्त्रे असणार आहेत.