शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

हिंमत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 06:05 IST

.. जे आज आहे, ते उद्या नसेल!! आजचा दिवस उद्या असणार नाही! काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही!!!

ठळक मुद्दे..हो! हे असं होईल!! पुन्हा एकदा सारं पहिल्यासारखं होईल. हा उदास, हताश काळ सरेल, आणि तुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

- राजेंद्र दर्डा

धावत्या शहरांच्या पायातबेडी पडली आहे,फिरत्या चाकांच्या पट्टय़ांवरधूळ चढली आहे.

.पण हे टिकणार नाही.आजचा दिवस उद्या असणार नाही. काहीही झालं, तरी माणूस हिंमत हरणार नाही!

रस्ते आहेत सुनसान.माणसं बावरलेली,मनातून घाबरलेली,घरातघरांत कोंडून पडलेली!

दिवसांचं चैतन्य हरवलं आहे,रात्रींची चमक ओसरली आहे..पण हे टिकणार नाही.आजचा दिवस उद्या असणार नाही.काहीही झालं, तरीमाणूस हिंमत हरणार नाही!

मंदिराचे गाभारे एकेकटे..रमझानची सहेरी उदास,इफ्तारची रौनक विझलेली!..पण हे संपेल,आज आहे तसं उद्या नसेल!

शेकडो मैल दूरच्या घराकडे चालत निघाले आहेत अनवाणी पाय!असहाय्य बापाकडे दुसरा पर्याय नाही,थकल्या आईचा जीव थार्‍यावर नाही,भुकेल्या पोराच्या ओठी दुधाचा थेंब नाही!

- हा असा आहे का माझा देश?इतका क्रूर?इतका निर्दय?

- पण ही तडफड थांबेल.वर्तमान बदलेल!आजचा दिवस उद्या असणार नाही!काहीही झालं तरी,माणूस हिंमत हरणार नाही.

पुढे काय होणार?कसं होणार?जगल्या वाचल्या लोकांच्या वाट्यालाकसलं जग येणार?

हाताला काम असेल का?भुकेला घास मिळेल का?

कधीतरी, पुन्हा स्वप्नं बघता येतील का?सुखाने श्वास घेता येईल का?शेजारच्या प्रत्येकाकडे संशयाने पाहणं,कधीतरी थांबेल का?

कधीतरी पुन्हा एकदाजीवलग मित्रांना घट्ट मिठी घालता येईल का?

..हो!हे असं होईल!!पुन्हा एकदासारं पहिल्यासारखं होईल.हा उदास, हताश काळ सरेल,आणितुंबलेलं पाणी पुन्हा वाहतं होईल!

कारण,जे आज आहे,ते उद्या नसेल!!आजचा दिवस उद्या असणार नाही!काहीही झालं, तरीमाणूस हिंमत हरणार नाही!!!

rjd@lokmat.com(लोकमत वृत्त-समूहाचे एडिटर इन चिफ)