शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

कोरोना : सृष्टीची चपराक, माणसाची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 22:43 IST

कोरोना व्हायरसमुळे सध्या जो हाहाकार माजला आहे त्याला घाबरून न जाता अत्यंत धीराने तोंड देणे गरजेचे आहे. तो धीर येण्यासाठी सामान्य जनतेला याबाबत काही मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊ यात की व्हायरस म्हणजे नेमकं काय असतं?

बॅक्टेरिया, व्हायरससारख्या जीवाणूंचे जेव्हा संक्रमण आपल्या शरीरात होते तेव्हा त्यांचा प्रतिकार करण्यासाठी दोन बटालियन आपल्या शरीरात कार्यरत असतात. त्यात पहिली म्हणजे आपली मूळ रोगप्रतिकार प्रणाली; ज्यात आपल्या रक्ताच्या पांढऱ्या पेशी, प्रतिरक्षी घटक, लिंफॅटिक, प्लीहा, बोनमॅरो, थाममसग्रंथी, म्युकस, बल्गम इत्यादी विविध घटकांचा समावेश होतो. यांचे कामच मुळी घातक संक्रमणांचा हल्ला परतवून लावणे असते. दुसरी डिफेन्स लाईन म्हणजे आपल्या शरीरातील पूरक जीवाणू - आपल्या फायद्याचे बॅक्टिरियोज.या पूरक जीवाणूत आपले सिंबायोटिक बॅक्टेरिया व बॅक्टेरिओफेज म्हणजे व्हायरस यांचा मुख्यत्वे समावेश होतो. बॅक्टेरिओफेज व्हायरस हा धोकादायक संक्रमणाच्या बॅक्टेरियांना मारून टाकतो. त्यामुळे कुठल्याही जीवाणूंचा सामना करण्यासाठी मूळ प्रतिकार प्रणालीसोबतच आपल्या रक्षणासाठीसुद्धा एक पूरक जीवाणूंची फौज असते, याची जाण ठेवली तरी या प्रलयाचा सामना करण्यासाठी भरपूर धीर येण्यास काही हरकत नाही. पण या दोन्ही रोगप्रतिकार प्रणाली अत्यंत सक्षम असणे गरजेचे आहे.कोरोना व्हायरसची दाहकता यामुळे आहे की तो नवीन जीवाणू असल्यामुळे त्याचा अँटिबॉडीज (प्रतिरक्षी घटक) आपल्या शरीरात नाहीत. वरून तो झपाट्याने उत्परिवर्तित होऊन आपले स्वरूप बदलतो आहे. तरीही धास्ती न बाळगता खबरदारी भरपूर घ्यावी, कारण घाबरल्याने रोगप्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते.मंगोल लोकांकडून अशा व्हायरसची जास्त उत्पत्ती मंगोलस् म्हणजेच चीन, तैवानसारख्या लोकांकडेच असे जीवघेणे जीवाणू उत्पन्न होण्याचे प्रमाण जास्त आढळते. त्यास मुख्य कारण म्हणजे युमामी चवीची चटक. युमामी हा चवीचा पाचवा प्रकार आहे. गोड, खारट, आंबट, कडू या चार चवींव्यतिरिक्त पाचवी युमामी चव ही मांसाची वा त्यातील अमिनो अ‍ॅसिडचीअसते. वेगवेगळ्या मांसांतील विविध प्रोटिन्स, विविध प्रकारचे चीज याची चव युमामी चव म्हणून ओळखल्या जाते. चिनी लोकांना कुठल्याही जीवाच्या मांसाची चव घेण्याची म्हणजे विविध युमामी चव चाखण्याची सवयच जणू लागली आहे. त्यामुळे ते कुठलेही जीव साप, उंदीर, अळ्या, किडे वगैरे चाखण्याची सवयच जडली आहे. त्यातही शिजलेले कमी अन् कच्चे मांस भरपूर खाल्ल्या जाते. या विविध प्रकारच्या कच्च्या मांसासोबतच त्यांचे व्हायरससुद्धा त्यांच्या पोटात जातात. असे झाल्याने कुठल्या तरी विपरीत संकटामुळे असे जीवघेणे व्हायरस उत्पन्न होण्याची शक्यता बळावत असते. त्यामुळे प्राणिजन्य प्रोटिन्स निवडावा. सृष्टिसुलभ म्हणजे इकोफेंडली प्रोटिन्स निवडणे केव्हाही उत्तम. भारतात हा पर्याय उपलब्ध असल्यामुळे कोरोनासारखा प्रकार आपल्याकडे उत्पन्न होण्याची शक्यता अगदी नगण्य आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.फक्त बाहेरून बाधा होऊ नये याची खबरदारी योग्य घेतली तरी पुरेसे आहे आणि बाधा चुकून झाली तरी सक्षम उपचार यंत्रणा आपल्याकडे कार्यरत आहे. शासनही दक्ष आहे. त्यामुळे खचून जाऊ नका. मास्क वापरणे, स्पर्श टाळणे, सॅनिटायझर हातावर घेणे, स्वच्छता राखणे, गर्दी टाळणे यांसारखी खबरदारी सजगपणे घेतली तर घाबरण्याचे कारण नाही. थोड्याच काळात यावरील लस व औषधेसुद्धा येऊ घातलीत त्यामुळे फिकीर नॉट!कोरोनावस्थामुळे दारुणावस्थास्वबळी ठेवावी आस्थाकरू नका हिंमत खस्ता

  • डॉ. संजय गाडेकर

वरिष्ठ शल्यचिकित्सक, नागपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर