शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

रंग

By admin | Updated: October 11, 2015 19:39 IST

डिस्टेंपरचं काम संपत आलं, की पेंटरमंडळी ऑईलपेंटकडे वळत. हल्ली आपण ‘डॅडो’ हा शब्द ब-याच वेळा ऐकतो. ही संकल्पना तशी जुनीच.

चंद्रमोहन कुलकर्णी
 
डिस्टेंपरचं काम संपत आलं, की पेंटरमंडळी ऑईलपेंटकडे वळत. हल्ली आपण ‘डॅडो’ हा शब्द ब:याच वेळा ऐकतो. ही संकल्पना तशी जुनीच. त्यासाठी ‘डॅडो’ हा शब्द वापरला जातो, हे फक्त मला तेव्हा माहीत नव्हतं. जमिनीपासून खिडकीच्या उंचीपर्यंतच्या (साधारणपणो तीन फूट) भिंतीला ऑईलपेंटचा पट्टा दिला जाई, त्याला म्हणायचं ‘डॅडो’! हा शब्द कुठून आला, त्याचा इतिहास काय, आणि तो इतका प्रचलित का झाला, ह्याबद्दल मला आजही कुतूहल आहे. आणि तेवढंच कुतूहल तो रंग तिथे, त्या तीन फुटांतच का दिला जाई, ह्याबद्दलही आहे. जमिनीपासून तीन फूट उंचीवरच्या भागातलाच रंग जास्त वापरामुळे, हाताळला गेल्यामुळे जास्त खराब होतो, असं असू शकतं; किंवा सोफ्यावर, पलंगांवर, खुच्र्यावर बसणा:या माणसाच्या डोक्याचं तेल लागून रंग खराब होऊ नये म्हणूनही ह्याची योजना असावी, असा माझा सर्वसाधारण कयास आहे. हा ऑईलपेंटचा पट्टा बहुतेक वेळेला निळ्या रंगाचा असे. आणि हा पट्टा बहुतेकदा बाहेरच्या म्हणजे बैठकीच्या खोलीतल्या भिंतींनाच लावलेला असे. स्वयंपाकघरात तसला पट्टा लावल्याचं मला आठवत नाही. सरकारतर्फेजो रंग लावला जाई, त्यात दाराखिडक्यांच्या ऑईलपेंटचा समावेश केलेला असे; पण तो फक्त बाहेरच्या बाजूनं. सरकारची भूमिका तेवढीच ठेवून दरवाजा आणि खिडक्यांची बाजू आपल्या ताब्यात घेतली जाई आणि मग त्या बाजूला कोणता रंग लावायचा ह्याचं स्वातंत्र्यही आपल्याकडेच!
दरवाजे-खिडक्यांच्या ह्या आपल्या ‘आतल्या’ बाजूंना रंग देताना प्रसंगी सरकारनं दिलेला तो स्टील ग्रे खरवडून टाकून आपल्या पसंतीचा रंग दिला जाई. सरकारच्या त्या ‘स्टील ग्रे’पेक्षा पूर्ण निराळा. बहुतेक वेळा निळा! निळा तर आमचा फार आवडता रंग. भिंतींना दिलेल्या फिकट निळ्याच्या शेडशी मिळताजुळता असा एखादा किंवा त्याला ‘कॉण्ट्रास्ट’ म्हणून एखादा गडद निळा निवडला जायचा आणि ऑर्डर सुटायची : ‘‘हा लावा!’’ 
मग घरातल्या लाकडाच्या आणि लोखंडांच्या असतील नसतील तेवढय़ा सगळ्या गोष्टी निळ्या रंगानं बरबटून निघायच्या! पेंटरला सूचनाच असायची तशी! मुख्य म्हणजे स्वयंपाकघरात एका कोप:यात तयार केलेलं देवघर. हे देवघर हल्ली विकत मिळतं, तशा लाकडाचं सुबक, कळस, खांब, कमानी वगैरे नक्षीदार असं नसायचं. तिथल्याच, डबेडुबे ठेवण्याच्या एका मांडणीत जराशी जागा करून, ओळखीच्या एखाद्या सुताराकडून लाकडाचं करून घेतलेलं असायचं. त्याला बिजाग:या लावलेले दोन दरवाजे. दोन्ही दरवाजे लाकडाचेच. मध्ये एकएक इंच जागा सोडून उभ्या ठोकलेल्या लोखंडी सळया. दोन्ही दरवाजांच्या मध्ये लोखंडाचीच छोटीशी कडी. देवघराला लावण्यासाठी एक छोटंसं किल्लीसहितचं कुलूपही तिथंच देवघरात आत एका कोप:यात ठेवलेलं असायचं. कधी कुठे गावाला गेलो आणि घराला कुलूप लावायची वेळ आली तर देवघरालाही कुलूप असलेलं बरं, म्हणून ही योजना असावी. देवघरात चांगल्याचांगल्या समया, निरांजनं, चांदीची छोटीशी का होईना एकदोन तबकं, देवाचे मुखवटे, एकदोन पितळी छानशा घंटा वगैरे मौल्यवान ऐवज असायचा. त्याची काळजी म्हणून हे कुलूप आहे, असं आईनं मला सांगितलं होतं. पण एकदाही देवघराला कुलूप लागलंय, असं मात्र माङया स्मरणात नाही. 
तर, ह्या लाकडाच्या देवघराला आतूनबाहेरून संपूर्ण निळा रंग लावला जाई. देवघराला रंग देणं हे माणसांच्या घराला रंग देण्यापेक्षाही किचकट काम..! कारण, देवघराला रंग द्यायचा म्हणजे देवांची काहीतरी व्यवस्था व्हायला हवी! देवाचे मुखवटे, छोटा बाळकृष्ण, अनेक लहानमोठय़ा तसबिरी, घंटा, उदबत्तीचं घर, कापसाच्या वाती, निरांजनं, समया अशा एक ना अनेक गोष्टी एखाद्या छानशा रेशमी (बहुतेकदा लाल!) कापडात गुंडाळल्या जाऊन देवांचं घर रिकामं केलं जाई. साफसफाई करून त्याला छानसा निळा ऑईलपेंट दिला, की देवांची त्यांच्याच घरात पुन्हा प्रतिष्ठापना होई.
घरात, विशेषत: स्वयंपाकघरात लाकडाच्या फळ्या फार! लाकडाची एखादी मांडणी, दुधाचं एखादं छोटंसं जाळीचं कपाट, जेवताना बसण्यासाठीचे पाट, विळ्या आणि असंख्य लाकडी वस्तू. बाथरूममध्येही एकदोन फळ्या, बाहेरच्या खोलीत जरा जास्त फळ्या. टीव्ही आला तेव्हा टीव्हीसाठी करून घेतलेली शोकेस, त्याआधी रेडिओ होता, त्याची फळी. (त्या फळीवर त्या काळात सुप्रसिद्ध असलेल्या गरुडाच्या आकाराच्या मद्याच्या दोन बाटल्या. ह्या गरु डाच्या मानेपासूनचा वरचा भाग म्हणजे त्याचं तोंड. हे तोंड म्हणजे एक पेग मेजर असायचं. (सिक्स्टी एमएल!) (आणि बाटलीचं झाकणही तेच असायचं.) शोभेसाठी वेळोवेळी आणलेल्या शोभेच्या इतर वस्तूंसाठी आणखी एकदोन छोटय़ामोठय़ा फळ्या ठोकलेल्या. स्वयंपाकघरातल्या, बाथरूममधल्या, हॉलमधल्या आणि घरात असतील नसतील तेवढय़ा सगळ्या लोखंडाच्या आणि लाकडाच्या वस्तूंना निळा रंग दिला जाई. सगळ्या वस्तू निळ्या. खुच्र्या निळ्या, कपाटं निळी, फडताळं निळी, निळ्या मांडण्या, देवघर निळं, विळी निळी, फळी निळी.
डिस्टेंपर आणि ऑईलपेंटचं काम हातावेगळं करून पेंटर मोकळे होत. रंग देताना जमिनीवर रंग सांडू नये म्हणून कितीही काळजी घेतली, जमिनीवर वर्तमानपत्रं पसरवून ठेवली, तरी जमिनीवर सगळा राडा झालेलाच असे. ‘इदं न मम’ असं म्हणून पेंटर त्यातून अंग काढून घेत. झालेल्या व्यवहाराचे पैसे खिशात टाकून तोंडातल्या बिडीचा फकाफका धूर सोडत पेंटर निघून जात. त्यामागोमाग एखाददुसरा दिवस फरशी धुवून घेण्यात जाई. पुन्हा सामानाची हालवाहालव, जुळवाजुळव, मांडामांड. स्थावर जंगम इस्टेट जागच्याजागी.
लख्ख निळ्या उजेडात काही दिवस, महिने छान जात. नव्यानं दिलेल्या रंगाचा वास घरभर पसरून राही.
रंगाच्या कंपनीकडून टाय लावलेला एक्ङिाक्युटिव्ह परवाच शेडकार्ड देऊन गेलाय. पुढच्या आठवडय़ात घरी रंगाचं काम सुरू होईल. पेंटर येतील. भिंती खरवडतील. घासतील. प्लास्टर-पल्टी करतील. सीलिंग ‘मारतील’. पहिला हात देतील. मग दुसरा हात देतील. मग फिनिशिंग होईल. 
शेड कोणती असेल, हे माहीत नाही पण निळी नसेल. रंग ऑइलबॉण्ड किंवा अॅक्रिलिक इमल्शन असेल, वॉटरप्रूफ असेल, वॉशेबल असेल. लस्टर किंवा वेल्वेट असेल.
माङया मनातली शेड मात्र निळी असेल आणि रंग असेल : डिस्टेंपर! आणि निळ्या डॅडोसाठी ऑईलपेंट.
मग डिस्टेंपरच्या वासात मिसळलेला निळ्या ऑईलपेंटचा तो निळा वास माङया भोवती रेंगाळेल, रंगाचं पुढचं एस्टिमेट येईपर्यंत.
 (समाप्त)
 
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
chandramohan.kulkarni@gmail.com