शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

सिनेमाची ताकद

By admin | Updated: October 14, 2016 15:11 IST

अतुल (कुलकर्णी) अतिशय हट्टी, आग्रही आणि किंचित रागीटही आहे. राणी (मुकर्जी) नुसती रागीटच नाही, पुरेशी भांडकुदळही आहे. चित्रपट बनवताना ज्यांच्यासोबत मी एकत्र काम केले, त्यातील हे दोघे.

-  सचिन कुंडलकर

अतुल (कुलकर्णी) अतिशय हट्टी, आग्रही आणि किंचित रागीटही आहे.राणी (मुकर्जी) नुसती रागीटच नाही,पुरेशी भांडकुदळही आहे.चित्रपट बनवताना ज्यांच्यासोबतमी एकत्र काम केले, त्यातील हे दोघे.दोघांचे स्वभाव वेगळे,कामाची स्टाईल वेगळी,पण परफेक्शन आणि शिस्तीच्या बाबतीत दोघेही एकदम काटेकोर.त्यांच्यातली ऊर्जा, जाणिवा, सामाजिक आणि व्यावसायिक भान ते आपोआपच इतरांमध्येपेरत जातात.त्यामुळे कामाची मजा तर येतेच,सगळ्यांचेच बळही वाढते..'मी'ज्या नटांसोबत चित्रपट बनवताना एकत्र काम केले त्यापैकी हे दोन नट त्यांच्या विशेष गुणांमुळे माझ्या मनात कायम महत्त्वाचे राहतील. ते नट आहेत अतुल कुलकर्णी आणि राणी मुकर्जी. आणि त्या दोघांमध्ये असलेले महत्त्वाचे गुण म्हणजे कामातला चोखपणा (परफेक्शन) आणि वेळेची शिस्त. ते दोघेही अतिशय ताकदवान अभिनेते आहेत आणि खूप प्रसिद्ध आहेत. असे असले तरी किंबहुना त्यामुळेच की काय ते जेव्हा एखादी फिल्म निवडतात तेव्हा ते चित्रपटाच्या दिग्दर्शकाला संपूर्ण सोबत देतात. ह्याचा परिणाम असा की तुमची काम करण्याची ताकद वाढते.सिनेमा बनवणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया असते. शिवाय ती अतिशय महागडी कला आहे. सिनेमाचे शूटिंग करणे, तो चित्रपट पूर्ण करून योग्य वेळी, योग्य पद्धतीने प्रेक्षकांसमोर घेऊन जाणे हे निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकारासाठी अतिशय कष्टाचे काम ठरते. अतुल कुलकर्णी चित्रपटाची निवड करताना अतिशय काळजीपूर्वक करतो. एखादा चित्रपट स्वीकारताना कथा आवडली तरी त्या दिग्दर्शकाला आपण वेळेची पूर्ण बांधिलकी देऊ शकणार आहोत ना? ह्यावर तो खात्रीशीर विचार करतो. एकाच वेळी खूप काम करत नाही. त्यामुळे चित्रपटाच्या तयारीपासून ते चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत तो निर्माता आणि दिग्दर्शकासोबत उभा राहतो. मी ँंस्रस्र८ ्नङ्म४१ल्ली८ ह्या चित्रपटाची पटकथा त्याच्याकडे वाचायला घेऊन गेलो. त्याने पटकथेच्या रचनेत अनेक मोलाचे बदल सुचवले. निरंजनचे पात्र साकारण्यासाठी त्याने व्यवस्थित व्यायाम सुरू केला. त्याच्या भूमिकेसाठी त्याच्या पोशाखात आणि केशभूषेत बदल करणे आम्हाला आवश्यक वाटत होते. त्याने काही महिने आधी सवय होण्यासाठी वेगळे कपडे, बूट वापरून पाहायला सुरुवात केली. त्याचा मला अतिशय आवडणारा गुण म्हणजे तो हे सगळे कोणताही गवगवा न करता फार शांतपणे आणि एखाद्या नव्या विद्यार्थ्याप्रमाणे उत्कंठतेने करतो. त्याला भूमिका साकारताना मिळणाऱ्या आनंदाइतकाच भूमिकेची तयारी करण्याचा आनंद खूप महत्त्वाचा असतो. प्रिया बापट ह्या त्याच्या सहकलाकारासोबत त्याने पटकथेची वाचने केली. सगळ्यांना अतिशय अगत्याने आपल्या मुंबईजवळील शेतावरच्या सुंदर घरी घेऊन गेला आणि तिथे एकत्र राहून सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना चित्रपटाची तयारी करण्यासाठी एक छोटे ६ङ्म१‘२ँङ्मस्र आयोजित केले. अतुलसाठी चित्रपट म्हणजे फक्त त्याचे शूटिंग असे नसते. तो चित्रपटसंस्कृतीत मुरलेला नट आहे. शूटिंगच्या अलीकडे आणि पलीकडे अनेक प्रक्रिया घडतात ज्यात चित्रपट आकार घेत असतो हे त्याला कळते. त्यामुळे त्याच्यासोबत दिग्दर्शक म्हणून काम करताना तुम्हाला नवी ऊर्जा सतत मिळत राहते. तो सर्व वेळी सतत सूचना करत असतो आणि बदल सुचवत असतो. असे असले तरी दिग्दर्शकाचा शब्द शेवटचा आहे हे मानण्याची त्याची नेहमी तयारी असते. त्याचे वाचन चौफेर असते. मी ज्या सर्व कलाकारांसोबत कामे करत आलो त्यात अतुल माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यात एक अतिशय लहान मूल दडलेले आहे. ते लहान मूल अतिशय हट्टी आणि आग्रही आहे. शिवाय ते थोडे रागीटसुद्धा आहे. भांडकुदळ अजिबात नाही. त्याचा उत्साह सेटवर इतरांना खूप ऊर्जा देत राहतो. तो काम करताना माझ्यावर रोज रागावतो आणि रोज तो राग विसरतो. दररोज शूटिंग संपले की सर्व कलाकारांना आणि तंत्रज्ञांना तो गाडीत घालून कुठेतरी मस्त जेवायला घेऊन जातो. कोणताही शॉट कितीही वेळा पुन्हा करून पाहतो. एकदाही कामाचा कंटाळा करत नाही. प्रत्येक शॉट मनासारखा मिळावा म्हणून अतिशय कष्ट घेतो. सोबतच्या सहकलाकारांची तो फार प्रेमाने काळजी घेतो. एकदा आम्ही त्याच्यासोबत प्रचंड थंडीत पहाटे तीन वाजेपर्यंत काम करत होतो तेव्हा त्याने स्वत: मोठी शेकोटी पेटवली होती आणि युनिटमधल्या सर्वांना तो तिथे बोलावून उत्साह देत होता. त्याने भारतातील अनेक भाषांतील चित्रपटांत काम केले आहे. अनेक वेळा नव्या ठिकाणी जाऊन तो नवी फिल्म करून आला की आवर्जून सगळ्यांना त्या चांगल्या अनुभवाबद्दल सांगतो. दोन सिनेमांच्या मध्ये तो देशभर आणि जगभर मोकळे प्रवास करतो आणि अनेक गोष्टी पाहून शिकून परत येतो. अतुलसोबत चित्रपट करून संपला आणि आपण पुन्हा वेगळ्या माणसांकडे वळलो की आपल्या लक्षात येते, अतुलची किती महत्त्वाची सोबत आपल्याला होती. ह्याचे कारण ह्या माणसाची व्यावसायिक जाणीव आणि ऊर्जा, त्याला असलेले भान आणि ज्ञान हे पंचविशीच्या माणसाइतके शार्प आणि ताजे आहे. राणी मुकर्जीने अनुराग कश्यपच्या सांगण्यावरून माझा ‘गंध’ हा चित्रपट पाहिला आणि मला घरी चहासाठी बोलावले. तिला गंध अतिशय आवडला होता. आमच्या पहिल्या भेटीपासून ते आमचा ‘अय्या’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या साडेतीन वर्षांच्या काळात त्या मुलीने सळसळत्या उत्साहाने मला भारून टाकले होते. त्या काळात एकदाही माझ्या आयुष्यात कंटाळ्याचा क्षण नव्हता. तो तिचा खास गुण आहे. ती आजूबाजूच्या माणसांना अतिशय सरळ सोप्या थेट संभाषणाने मोकळे वागवते. राणीने मला चित्रपटाला होकार द्यायला काही महिने घेतले. मला त्या काळात असे वाटत राहिले की ती बहुधा माझा चित्रपट करणार नाही. एकदा माझ्यासोबत बसून तिने मला, चित्रपट निवडताना नुसते कलात्मक निकष लावून चालत नाहीत, अजूनही काही गोष्टींची निर्मात्याकडून खात्री करून घ्यावी लागते, हे समजावले. ती काम करत असेल तर तो चित्रपट एका विशिष्ट प्रकारे देशभर आणि जगातील बारा-तेरा देशांमध्ये प्रदर्शित होतो. ते करण्याची निर्मात्याची ताकद आहे का ह्याची ती खात्री करून घेत होती. एकदा चित्रपटाला होकार दिल्यावर मात्र ती अतिशय शिस्तीने आणि गांभीर्याने भूमिकेची तयारी करू लागली. तिने मराठी माणसे हिंदी बोलतात त्याचा विशिष्ट हेल शिकून घेतला. अमृता सुभाषला तिने घरी बोलावून तिच्या आवाजात हिंदी संवाद रेकॉर्ड करून घेतले म्हणजे तिला मराठी चाल अंगीकारणे सोपे जाईल. पृथ्वीराज सुकुमारन हा मल्याळी नट आणि सुबोध भावे हा मराठी नट हे तिचे सहकलाकार असणार होते. तिने त्या दोघांना भेटण्याआधी त्यांचे चित्रपट पहिले. त्या दोघांना आपापल्या राज्यात चित्रपट क्षेत्रात मानाचे स्थान आहे हे ओळखून ती त्यांच्याशी अतिशय सोपेपणाने आणि मैत्रीने वागली. राणीचा स्वभाव फार वेगळा आहे. ती नुसती रागीट नाही तर पुरेशी भांडकुदळ आहे. ती समोरच्याला मनातले सगळे बोलून मोकळी होते. तिने फार कष्टाने तिची जागा तयार केली असल्याने तिला आपल्या प्रत्येक निर्णयाच्या परिणामाची अचूक जाण असते. आपल्यामुळे इतर कलाकारांना आणि युनिटमधील नव्या तंत्रज्ञांना बिचकायला होऊ नये म्हणून तिने शूटिंगपूर्वी सगळ्यांना स्क्रिप्ट वाचनाच्या एका ६ङ्म१‘२ँङ्मस्र ला एकत्र बोलावले. त्या दिवशी मोठे जेवण आयोजित केले. सेटवर तिच्यासोबत काम करणे अजिबात सोपे नसते. ती सेटवर असली की सेटवर आग लागल्यासारखे वातावरण असते. पण एकदा का कॅमेरा ङ्मल्ल झाला की राणी रंग बदलते. तिचे डोळे एका क्षणात बदलतात आणि ती पटकन भूमिकेत शिरते. कामाविषयी आणि वेळेविषयी ती कमालीची शिस्त पाळते. एकाही दिवशी ती उशिरा आल्याचे मला आठवत नाही. तिच्यासोबत काम करताना एकही दिवस मला कंटाळा आला नाही. तिने तो येऊच दिला नाही. शूटिंग संपले तरी ती सर्व टीमसोबत वर्षभर काम करत होती. चित्रपटाच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंगला हजर असायची, ी्िर३्रल्लॅ बारकाइने पाहायची, पोस्टर तयार करताना, ट्रेलर बनवताना रात्रभर जागून सर्व टीमसोबत राहायची. तिच्यात अपरिमित उत्साह आणि कमालीची ताकद आहे. तिच्यासोबत काम करून आता चारेक वर्षं झाली असतील, मला तिच्याइतकी ऊर्जा, प्रामाणिकपणा आणि अभिनयाची समजूत असलेली माणसे फार भेटलेली नाहीत. मी असे का ह्याचा विचार करतो तेव्हा मला हे लक्षात येते की, ही माणसे काळासोबत बदलण्याची फार मोठी ताकद घेऊन जन्माला आलेली असतात. ती त्यांच्याकडून शिकण्यासारखी फार मोठी गोष्ट आहे. शिवाय व्यावसायिक सुरक्षिततेतून ही माणसे स्वत:ला सतत बाहेर काढून, नवनवी आव्हाने घेत नव्या पिढीच्या दिग्दर्शकांसोबत कायम काम करत राहतात. सिनेमा बनवणे अवघड असले तरी अशा काही माणसांमुळे तो बनवण्याची मजा सतत येत राहते. म्हणूनच तर आपण प्रत्येक सिनेमाच्या दमवणुकीनंतर, पुन्हा दुसरा सिनेमा सुरू करतोच.