शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

चीफ रिपोर्टर

By admin | Updated: January 9, 2016 14:51 IST

घराबाहेर पडताना कामाचे कपडे चढवावे, तसे पत्रकारपण चढवून काम संपले की ते उतरवण्याचा काळ पुष्कळ पुढे होता. इंटरनेटपूर्व काळातल्या त्या पत्रकारितेवर तंत्रज्ञानाचा नव्हे, तर आपले कर्तव्य चोख निभावण्यासाठी जिवाचे रान करणा:या माणसांचा ठसा होता. दिनू रणदिवे असोत, नाहीतर एक्स्प्रेसचे बी. एस. व्ही. राव, संपादकांनाही या चीफ रिपोर्टर्सविषयी नकळत का होईना, असूया वाटे..

- दिनकर रायकर
 
एकेक फोन लागावा म्हणून तासन्तास ताटकळत बसण्याच्या, टाइपरायटरवर बातम्या बडवताना बोटे दुखून येण्याच्या आणि जगात सोडाच; आपल्या देशात काय घडते आहे याच्या अपडेटसाठी वृत्तसंस्थांच्या फ्लॅशवर नाहीतर खरखरत्या बीबीसी रेडिओवर अवलंबून असण्याच्या काळातली पत्रकारिता पैशाने, टेक्नॉलॉजीने गरीबच होती.. तिला श्रीमंत केले माणसांनी!
‘चीफ रिपोर्टर’ म्हणून मी अनुभवलेला तो काळ आज आठवावासा वाटतो आहे, ते केवळ स्मरणरंजनाची हौस म्हणून नव्हे. ‘आम्ही अनुभवलेले ते जुने दिवस आता राहिले नाहीत’, अशा निर्थक उमाळ्यांसाठीही नव्हे!
- भूतकाळातल्या त्या पत्रकारांकडे आणि तेव्हाच्या राजकीय नेत्यांकडेही ‘वर्तमाना’ला देण्यासारखे बरेच होते. ते ‘देणो’ चुकवण्याचा एक प्रयत्न म्हणजे ही लेखमाला!
 
 
गेल्या आठवड्यात एक्क्याण्णव वर्षाचे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे भेटले. जुने ज्येष्ठ मित्र. महाराष्ट्र राज्य पत्रकार परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात रणदिव्यांनी जुन्या काळच्या पत्रकारितेत सर्वाना फिरवून आणले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळातले अनुभव रणदिव्यांकडून ऐकणो मोठे हृद्य होते. आपला काळ अक्षरश: रस्त्यावर जगलेले दिनू रणदिवे हाडाचे पत्रकार. कामातून निवृत्त झाल्याला तीन दशके उलटलेली; तरी त्यांच्यातला  ‘चीफ रिपोर्टर’ अजून तसाच. टक्क जागा. आणि घाईतला. अस्वस्थ. त्या काळातली पत्रकारिता रक्तातच उतरत असे माणसाच्या. 
1974 ची गोष्ट. जॉर्ज फर्नाडिस यांनी यशस्वी केलेल्या 26 दिवसांच्या ऐतिहासिक देशव्यापी रेल्वे संपाच्या काळातली. तेव्हा डी. डी. साठे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते. संपाच्या काळात स्वत: साठे आणि पश्चिम-मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रोज एकत्र पत्रकार परिषद घेत. संप अयशस्वी झाल्याचा दावा स्वाभाविकपणो त्यात केला जाई. पण रणदिवे नुसते ‘पीसी’त जे ऐकले त्याची ‘कॉपी’ खरडणारे रिपोर्टर नव्हते. एके दिवशी ते बाहेर पडले आणि अख्खा दिवस दादर स्टेशनवर मुक्काम ठोकला. प्रत्यक्षात नेमकी किती गाडय़ांची वाहतूक होते हे पाहण्यासाठी रणदिवेंनी एकेक गाडी मोजली. 
संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत शे-दोनशे गाडय़ा  सुटल्याचा दावा केला गेल्यावर रणदिव्यांनी ठणकावून सांगीतले, आज फक्त 34 गाड्या सुटल्या. मी मोजल्या. आता पुढे बोला.
- त्यावर कोणाकडेच उत्तर नव्हते! 
इंडियन एक्स्प्रेसमध्ये काम करताना मी दीर्घकाळ अनुभवलेला हाडाचा चीफ रिपोर्टर म्हणजे एक्स्प्रेसचे बी. एस. व्ही राव! ते  हाताखालच्या रिपोर्टर्सना टाकीचे घाव घातल्याप्रमाणे घडवत असत. त्या पद्धतीने आज कोणी कुणाला घडवू जाईल, तर ते आजच्या तरुण पत्रकारांना सहनही होणार नाही.  पण राव यांच्या तालमीत तयार होणो ही भाग्याची गोष्ट होती. गंमत म्हणजे त्यांचा धाकटा भाऊ शेषगिरी राव हा तेव्हा टाइम्समध्ये चीफ रिपोर्टर होता. प्रतिस्पर्धी वृत्तपत्रतल्या या सख्ख्या भावांनी एकमेकांशी अतिशय निकोप स्पर्धा केली. राव तेव्हा ‘बॉम्बे इज माय बीट’ असा एक स्तंभ लिहीत. त्यांना मुंबईची खडान्खडा माहिती होती. गर्भश्रीमंतापासून फूटपाथवर झोपणा-यापर्यंत, टॅक्सी चालवणा:यापासून मोठय़ातल्या मोठय़ा नोकरशहापर्यंत सगळयांशी त्यांचा संवाद असे. 
प्रत्येकाने आपले काम मन लावून केले पाहिजे आणि आपल्या बातमीचा मसुदा अचूक असायला हवा, असा राव यांचा आग्रह असायचा. बातमीच्या इन्ट्रोतच चूक दिसली कीे ती बातमी ज्याने लिहिली त्याच्यासमोरच त्याच कागदाने ते आपला चेहरा पुसत. पुढच्याच क्षणी तो कागद बोळा करून समोरच्या केराच्या टोपलीत जाई. नेमकी काय चूक झाली असावी,या विचाराने  हैराण झालेला तो बातमीदार राव यांच्यासमोर अवघडून उभा असे. पण चूक काय आणि ती कशी दुरुस्त करावी हे राव यांनी कधीही सांगितले नाही. आपली चूक ज्याने त्याने शोधायची, हीच त्यांची  ‘शिकवण्या’ची पध्दत होती. हातातला बातमीचा बोळा कच:यात फेकताना भेदरून समोर उभ्या असलेल्या बातमीदाराकडे पाहून ते फक्त एकच शब्द उच्चारत, ‘डब्बा!’
 एखादी बातमी आवडली नाही, तर वैतागाने हात हवेत उडवून राव आम्हाला ‘पोर्टर’ म्हणायचे आणि तेच तेच पुन्हा लिहिता म्हणून तुम्ही रि-पोर्टर असा विनोदही करायचे. 
बड्या लोकांच्या आणि सत्तास्थानांच्या सानिध्ध्यात वावरायला मिळणो हा आपण पत्करलेल्या व्यवसायाचा भाग आहे; त्याने हुरळून जाऊन कुणा पत्रकाराने स्वत:ला समाजाहून वेगळे समजू नये, असा राव यांचा आग्रह असे.. आणि त्यासाठी ते आपल्या सहका:यांच्या डोक्यावर नेमकी वेळ साधून काठ्या मारण्यात वाकबगार होते. ‘आपल्या व्यवसायात कसे आणि किती हार्ड वर्क असते’ असे उल्लेख आम्ही बोलताबोलता सहज करत असू. राव यांना ते अजिबात आवडत नसे. त्यावरून डोक्यावर बसलेली एक नेमकी काठी मी आयुष्यभर विसरलो नाही. एकदा मी राव यांच्यासोबत एक्सप्रेस टॉवरला लागून असलेल्या एअर इंडियाच्या गगनचुंबी इमारतीखाली उभा होतो. रंगकाम चालू होते. साधारण 23-24व्या मजल्यावर लटकत्या झुल्यावर तोल सावरत उभा असलेला एक तरुण रंगारी इमारतीला रंग लावत होता. मान उंच करून त्याच्याकडे बघत राव वाहत्या रस्त्याच्या कडेला तसेच उभे राहिले. मग मला म्हणाले, लूक अॅट हीम. याला म्हणतात हार्ड वर्क! तुम्ही रिपोर्टर करता त्यात कसलं आलंय हार्ड वर्क ? - मी काही बोललो नाही.
रिपोर्टर्सना वेळ कमी मिळतो. थोडी जरी उसंत मिळाली, तरी तेवढ्या वेळात प्रत्येकाने काहीतरी वाचत राहिले पाहिजे, असा राव यांचा आग्रह- हट्टच असे. एकदा मी ऑफिसात मोकळाच बसलो होतो. हे बघून राव म्हणाले, ‘डू समथिंग, कीप रिडिंग आय टोल्ड यू!’
- नुसते बोलून थांबले नाहीत. टेलिफोन डिरेक्टरीचा भलामोठा ठोकळा उचलून माझ्या पुढ्यात टाकला आणि म्हणाले, वाच हे!
डिरेक्टरीत काय वाचायचे? - मला कळेना. उगीचच पाने उलटत राहिलो.. थोडय़ा वेळाने त्यांचा डोळा चुकवून तिथून काढता पाय घेण्याचा माझा बेत त्यांच्या तीक्ष्ण नजरेमुळे फसला. मग झाली झाडाझडती.. वाचली का डिरेक्टरी? 
मी म्हणालो, हो, वाचली.
मला म्हणाले, ‘व्हेरी गुड, देन गेट मी सिकॉम.’
- सिकॉमचा नंबर कुठे शोधावा, हे चटकन उमजेना. शेवटी सिकॉम सरकारी उपक्रमांच्या यादीत सापडणार ही ट्यूब पेटली आणि फावल्या वेळात पत्रकाराने टेलिफोन डिरेक्टरी का वाचावी हेही कळले. अशा कितीतरी गोष्टी राव यांनी न शिकवता शिकवल्या!
 हा माणूस खरोखर अहर्निश पत्रकार होता. जगभरातल्या घडामोडींबाबत कमालीचा सजग आणि त्या ‘इंटरनेटपूर्व, व्हॉट्सअॅपपूर्व’ काळातही माहितीच्या बाबतीत अप टू डेट. बातमीचे महत्त्व आणि अग्रक्रम हे प्रत्येक बातमीदाराच्या रक्तातच उतरले पाहिजे, त्यात अनवधानाने देखील चूक झालेली ते खपवून घेत नसत. माणूस जितका कठोर, तितकाच लाघवीसुद्धा होता. आमच्या चुकलेल्या बातम्यांचे बोळे संतापून केराच्या टोपलीत भिरकाण्याएवढे रागावत, पण वेळ येई तेव्हा वडिलकीच्या नात्याने पाठीशीही घालत. 
त्यांना खास सवय होती. सोळा आणे म्हणजे नंबरी सोने या मोजमापाच्या न्यायाने ते आम्हाला  ‘दो पैसा’ म्हणत. ‘ए दो पैसा, इधर आओ’ अशी हाळी द्यायचे. ते नेहमी ऐकणा-या एका बाहेरच्या माणसाने राव यांना एकदा सहज विचारले,  ‘तुमचा तो दो पैसा रिपोर्टर आज दिसत नाही’
त्यावर ते जे भडकले की सांगायची सोय नाही. ‘दे आर माय बच्चज, दो पैसा इज माय टर्म, यू हॅव नो विझनेस टू कॉल देम दो पैसा’.. असे ठणकावून त्यांनी त्या इसमाला एक्सप्रेस टॉवर्समधून हाकलून बाहेर काढले होते.
माणूस आपल्या कामात चोख असला की त्याला त्याचा स्वाभिमानही किती सहजतेने जपता येतो याचे राव हे मूर्तिमंत उदाहरण. एक्सप्रेसचे ऑफिस ससून डॉकला असतानाचा एक प्रसंग. एका दुपारी खुद्द रामनाथ गोएंका ऑफिसच्या पाय:या उतरून खाली येत होते आणि त्याचवेळी आलेले राव वर चढत होते. दोघे एकमेकांशेजारून गेले. राव यांनी रामनाथजींना ना कुठल्या शब्दांतून अभिवादन केले, ना कृतीतून. शेवटची पायरी उतरता उतरता गोएंकांनी वर पाहत राव यांना विचारले,
‘मी कोण, हे तुम्हाला ठाऊक आहे का?’ 
राव म्हणाले,‘ येस, यू आर मिस्टर गोएंका!’
- हे औद्धत्य नव्हते. राव यांनी चोख कामातून कमावलेल्या स्वाभिमानाचे प्रतीक होते.
या प्रसंगानंतर राव सहजतेने ऑफिसमध्ये गेले आणि रामनाथजीही हसत हसत आपल्या गाडीकडे वळले. 
त्या जुन्या काळात व्यावसायिक निष्ठेचे मापदंड ही माणसे इतकी कसोशीने पाळायची, की ऐकणा:याचा विश्वास बसू नये. कधी टाइम्सवर बातमीच्या बाबतीत इंडियन एक्सप्रेसने कुरघोडी केली, की आमच्या सगळ्यांच्या समोर न्यूजरूममधूनच आपल्या भावाला फोन करून ते सांगत, ‘अरे शेषा, एक्सप्रेस हॅज बीटन यू टुडे!’
- तो काळ वेगळा होता हेच खरे. त्या काळातल्या पत्रकारितेवर जगाला कवेत घेणा:या तंत्रज्ञानाचा नव्हे, तर आपले कर्तव्य चोख निभावण्यासाठी जीवाचे रान करणा:या राव यांच्यासारख्या माणसांचा ठसा होता.. त्यामागे होती दिनू रणदिवे अणि बी. एस. व्ही. राव यांच्यासारख्या अनेकांची कर्तबगारी!
 
चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.
dinkar.raikar@lokmat.com