शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

चराति चरतो भग:

By admin | Updated: October 31, 2015 14:25 IST

प्रवासाच्या कित्येक दिवस आधीपासूनच सार्थवाहाची लगीनघाई सुरू होई. सर्वात कठीण प्रवास वाळवंटातला! तिथे विषारी वनस्पती, चावरे प्राणी असत. मृगजळांचा भूलभुलय्या भरकटत नेई. अख्खा माणूस गिळणारी फसवी दलदल असे. प्रवासात पुरेसा पाण्याचा साठा तो बरोबर घेई. ‘एकटंदुकटं भटकू नये’, ‘थेंबन्थेंब जपून वापरावा’ हे जीवनावश्यक शहाणपण तो सगळ्या प्रवाशांच्या गळी उतरवी आणि दिवसाची चणचणीत उन्हं कलली, वाळू निवली की वाळवंटी वाटचाल सुरू करी.

- डॉ. उज्ज्वला दळवी
 
त्याने पुन्हा पुन्हा सारं ठीक असल्याची खात्री करून घेतली. ‘तक्षशिला’, ‘गांधार’ ही नावं तो ऐकून होता. कधीतरी तिथवर जाऊन आपला कापडाचा व्यापार स्वत:च तिथे करायचं त्याचं स्वप्न आता साकार होणार होतं. रानावनातून, वाळवंटातून महिनोन्महिने चालणा:या त्या प्रवासात येणा:या संकटांची, हालअपेष्टांची त्याला कल्पना होती. पण त्याला आपला माल कुणा भाडोत्री मुकादमाकडे सोपवायचा नव्हता. त्यासाठी त्याने सर्वस्व पणाला लावलं होतं. घरचं सगळं सोनंनाणं श्रेष्ठीकडे जमा करून त्याने हुंडी घेतली होती. श्रेष्ठीच्या नावाला गांधारातही मान होता. हुंडी वटायची निश्चिंती होती. ‘एकला चालो रे’ही नव्हतं. मालाचे पन्नास गाडे घेऊन बडय़ा व्यापा:यांचा काफिला निघाला होता. त्यांच्या आधाराने त्याचा एक गाडा बिनघोर जायला हरकत नव्हती.
तशा साहसी भारतीय व्यापा:यांच्या अनेक कथा बौद्ध वा्मयात वाचायला मिळतात. त्यांच्या काफिल्यांना व्यवस्थित न्यायची जबाबदारी घ्यायला ‘सार्थ’ म्हणजे त्या काळातली ट्रान्सपोर्ट एजन्सी धावून येई. महाभारतात तशा ‘महासार्थां’चा उल्लेख आहे. महासार्थांकडे हजारो जनावरं, वाहनं आणि कामगार असत. तशी एजन्सी भारतापासून मध्यपूर्व, ग्रीस, चीन वगैरे देशांपर्यंतही आपल्या ग्राहकांची सर्वतोपरी काळजी घेत असे. एजन्सीने नेमलेला अनुभवी व्यावसायिक नेता म्हणजे ‘सार्थवाह’. तांडय़ातला प्रत्येक माणूस त्याच्या आ™ोत वागे. काफिल्याचं सुखरूपपणो मुक्कामाला पोचणं, मोहीम फत्ते होणं आणि अपेक्षेप्रमाणो नफा मिळवणंसुद्धा सार्थवाहाच्या कर्तृत्वावर अवलंबून असे.
प्रवासाला निघायच्या कित्येक दिवस आधीपासूनच सार्थवाहाची लगीनघाई सुरू होई. सुस्थितीतल्या अनेक गाडय़ा, त्या ओढायला पुरेशी तगडी जनावरं आणि त्यांचं चारापाणी. या सा:या गोष्टी आवश्यक असेच पण मुक्कामाला लागणारा शिधा, सरपण, गरजेचं औषधपाणी यांचीदेखील जमवाजमव करावी लागे. सगळ्या तांडय़ाच्या पिण्या-धुण्या-न्हाण्याच्या पाण्याची तरतूद करणं सगळ्यात महत्त्वाचं असे. इतर किरकोळ कामांनाही अंत नसे. त्यासाठी अनेक हरकामे गडी सोबत घ्यावे लागत. काफिल्याच्या पुढे जाऊन रस्त्यांची निगा राखणारे इंजिनिअर्स असत. गाडय़ा-जनावरांची काळजी घेणारा खास अधिकारी असे. काफिल्यांबरोबर पादचारी यात्रेकरूही असत. त्या काठीवाल्या अनवाणी कापडय़ांना तीर्थयात्रंच्या निमित्ताने सा:या देशाची पायओळख असे. 
तांबडं फुटताफुटताच गाडय़ांची शिस्तबद्ध रांग लाकडी चाकं खडखडवत, धुरळा उडवत प्रवासाला लागे. धुरळ्याने डोळे चुरचुरत, घसा खवखवे. मोहिमेचा सर्वेसर्वा असलेल्या, जबाबदार सार्थवाहाला तसा प्रकृतीचा त्रस कसा परवडणार? म्हणून तो युक्ती करत असे. वारा समोरून आला तर पहिल्या गाडीत आणि वारा मागून असला तर शेवटच्या गाडीत राहून तो धुरळ्यापासून स्वत:चा बचाव करी.
कुठल्याही गावा-शहरात शिरताना लहानसा कर भरून गावात फिरायचा परवाना मिळे. बाहेरून येणारी माणसं सगळ्या राज्यकत्र्यांना हवीच असत. त्यामुळे ते व्हिसादान उपकार नसून स्वागताचं प्रतीक असे. परवानाधारक प्रवाशाला तिथल्या पंचक्र ोशीत अभय देणं हे शासनकत्र्याचं कर्तव्य असे.
वस्तीपासून दूर असताना वाटेतल्या सरायांत श्वापदांपासून संरक्षण, पाणवठा आणि निजायला स्वच्छ लाकडी जमीन लाभे. पण लवाजम्यात जीव गुंतलेला सार्थवाह काफिल्याच्या कुशीत, उघडय़ावरच निजे. दिवस मावळला की जनावरं आणि माल मधोमध ठेवून त्यांच्याभोवती सगळेजण रिंगणात, सजग निजत. रात्रभर पाळीपाळीने जागता पहारा दिला जाई. रिंगणासभोवारच्या चुली अन्नही शिजवत आणि श्वापदांनाही दूर ठेवत. 
 काफिला नदीकाठी पोचला की तिथे मुक्काम ठोकावाच लागे. खरं तर त्या काळात कसबी सुतारांची वाण नव्हती. नगराबाहेरच्या खंदकांवर पूलही असत. पण कुठल्याही नदीवर मात्र पूल नव्हते. पायी पार करण्याइतपत नदीचं पात्र कुठे उथळ असेल ते जाणत्या सार्थवाहाला पक्कं ठाऊक असे. तो आपल्या सगळ्या लवाजम्याला काळजीपूर्वक नदीपार घेऊन जाई. खोल, पण अरु ंद पात्रवर तात्पुरता साकव बांधायला काठावरच्याच झाडांचा वापर होई. रुंद आणि खोल प्रवाह ओलांडायला मात्र तराफेच बांधावे लागत. ङोलमचा वेगवान प्रवाह ओलांडायला शिकंदराने स्थानिक भारतीय सुतारांकडून भारतीयच लाकडाची होडगी बांधून घेतली होती!
वाट रानावनातूनही जाई. तिथे उघडेबंब राहणारे, विषारी बाणांनी बिनचूक लक्ष्य वेधणारे वन्यजन राहत. त्यांच्या देवतांना एकटय़ादुकटय़ा प्रवाशाचा नरबळी आवडत असे. पण पहारेक:यांसमवेत चाललेल्या काफिल्याच्या ते वाटेलाही जात नसत. शिवाय जंगलात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळ्या असत. ते गनिमी काव्याने हल्ला करून मालावर डल्ला मारत. त्यांच्यापुढे सार्थवाहाचा ताफाही हतबल होई. पण बहुतेक ठिकाणी जवळच्या गावांतले शिपाई काफिल्याच्या संरक्षणाला धावून येत. 
सर्वात कठीण प्रवास असे तो वाळवंटातला! तिथे विषारी वनस्पती आणि चावरे प्राणी असत. मृगजळांचा भूलभुलय्या एकटय़ादुकटय़ाला भरकटत नेई. अगदी ओयासिसच्या जवळपासही पाऊल-पाऊल रुतवून अख्खा माणूस गिळणारी फसवी दलदल असे. वाळवंटी संकटांचा असहाय्य एकटेपणा अंगावर आला की माणूस सैरभैर होई. त्याच्याकडून अतक्र्य चुका घडत. त्या सा:या मानसिकतेचा सार्थवाहाला अंदाज असे. तसले अनर्थ टाळायला तो वाळवंटात शिरायच्या आधीपासूनच दक्षता घेई. आधी तो पूर्ण वाळवंटी प्रवासात पुरेल इतका पाण्याचा साठा बरोबर घेई. ‘एकटंदुकटं भटकू नये’, ‘अनोळखी फळ-फूल-पान उष्टावूही नये’, ‘पाण्याचा थेंबन्थेंब जपून वापरावा’ हे जीवनावश्यक शहाणपण तो सगळ्या प्रवाशांच्या गळी उतरवी आणि मग दिवसाची चणचणीत उन्हं कलली, वाळू निवली की त्यानंतरच वाळवंटी वाटचाल सुरू करी.
बिनचेह:याच्या अफाट वाळवंटात जमिनीवर काहीही खाणाखुणा नसत. दिशांचं भान द्यायला रात्रीच्या वेळी सूर्याचीही मदत नसे. सगळी मदार नक्षत्रंवरच असे. त्यामुळे नक्षत्रंचं उत्तम ज्ञान असलेल्या आणि रात्रभर जागत, पाठीवर उताणं पडून, डोळे ताणून तारांगणाचं निरीक्षण करणा:या वाटाडय़ाच्या म्हणजेच ‘थलिनय्यामका’च्या भरवशावरच सगळा प्रवास चाले. तो नक्षत्रं न्याहाळून जी सांगेल तीच पूर्वदिशा असे. त्याबद्दल त्याला भरभक्कम पगार दिला जाई. पण माणूसच तो! कधीतरी त्यालाही डुलकी लागे. मग काफिल्याच्या गाडय़ांची सगळी रांग भलतीकडे भरकटत जाई. पुन्हा वाट सापडणं तर कठीण असेच पण अन्नपाण्याचा सगळाच हिशेब चुके. नशीब बलवत्तर असलं तरच कुठेतरी विहीर सापडे आणि निभाव लागे. नाहीतर दुर्घटनेची साक्ष द्यायला काफलेकरांचे सांगाडेच उरत. तसं झालं तर त्या मोहिमेत भांडवल गुंतवणा:या श्रेष्ठींनाही जबरदस्त खोट बसे.
गौतम बुद्धांनी धर्मोपदेशासाठी बराच प्रवास केलेला होता. त्यांना त्यातले धोके चांगलेच ठाऊक होते. सर्वसाधारण माणसांना संसारातली मोहमाया समजवायला त्यांनी तशा मोहिमांतलीच रूपकं वापरली. ती व्यापा:यांना पटली. प्रवासात सार्थवाहाची आज्ञा इमानेइतबारे पाळणा:या व्यापा:यांनी तथागताचा उपदेशही तितक्याच भक्तिभावाने पाळला. व्यापारासाठी खडतर प्रवास करून संपत्ती मिळवणा:या व्यापा:यांना सांसारिक अडचणींतून वाट काढून मोक्षाचं घबाड मिळवणं त्यामुळेच सोपं झालं.
 
पेशाने वैद्यकीय डॉक्टर असलेल्या लेखिका गेली तीस वर्षे सौदी अरेबिया आणि त्याआधी इंग्लंडमध्ये 
वास्तव्याला होत्या. ‘जेनेटिक्स कशाशी खातात?’ 
आणि ‘सोन्याच्या धुराचे ठसके’ 
ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. 
‘मानवाचा प्रवास’ हा गेली दोन दशके त्यांच्या वाचनाचा, 
संशोधनाचा विषय आहे.)
 
ujjwalahd9@gmail.com