शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मंदारविचार

By admin | Updated: December 19, 2015 15:36 IST

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल.

मनाला भावलेलं सगळं, मनात खदखदत असलेलं सगळं. काही परिचित, तर काही वेगळं. कदाचित कुणीही छापायला तयार नसलेलं आणि कुणीही ऐकून न घेतलेलं. इथे तुम्हाला असं सगळं वाचायला मिळेल. ‘दिसामाजी काहीतरी ते लिहावे.. ’ असं रामदासस्वामी म्हणून गेले असले, तरी वैयक्तिकआणि कार्यालयीन आयुष्यात तसंच लष्कराच्या भाक:या भाजण्यात व्यग्र असल्याने कधी काही तर कधी काहीच्या काही वाचण्याची तयारी असू द्यावी एवढा मोठा इशारा देणा:या मंदार जोशी यांचा हा ब्लॉग. 2010 पासून ते लिहित आलेत. प्रारंभी सिनेमांची समीक्षणे येत. नंतर विविध विषयांवर ते लिहित गेले. कोणताही विषय वज्र्य न मानता. 
काका-आजोबा आणि अशोककुमार यांच्या चेह:यात साम्य लक्षात आल्यानंतर अशोककुमार यांच्यावर अभ्यासपूर्ण पोस्ट जोशी लिहितात. बोचरा विनोद, व्यंग त्यांना साधता येतो. विडंबन कविता (कविता-काहीच्या काही) हे या ब्लॉगचे वैशिष्टय़ ठरावे. ‘बघ, देश बुडतो की नाही?’ टग्यामहाराज, आवर्जून वाचाव्या अशा. भाषा हवी तेव्हा टोचकी, पण खुमासदार.
 http://mandarvichar.blogspot.in/    
 
दिसामाजी काहीतरी 
‘संदर्भाच्या कुशीतून खुडलेले पोरके शब्द त्यांचा अर्थ चटकन गमावतात’. समर्थांच्या टवाळा आवडे विनोद या उक्तीचा आपण चुकीचा अर्थ घेतो हे सांगण्यासाठी इतके सहज सुंदर विधान करणारा हा ब्लॉगर ‘पामर’ हे नाव घेऊन लेखन करतो आहे, तेही गेली दहा वर्षे. भोपळेवाडीतील कोड- तोडय़ाची गोष्ट तशी मार्मिकच. म्हातारा सुनांना भोपळ्याच्या बिया देतो. प्रत्येक सून त्याचे जे करते त्यानुसार तिच्यावर जबाबदारी तसेच आयटी क्षेत्रत होत असते. प्रामाणिक (ला)कूडतोडय़ाची गोष्ट नव्या काळातील लाकूडतोडय़ा उभा करते. कु:हाडीच्या जागी लॅपटॉप ठेवलाय फक्त. ‘कुठे न्यायची सोय नाही तुला’ तर भारीच. मुलगा आपल्याकडे शि:यात केशर नाही याचा मित्रकडे बोभाटा करतो म्हणून घरी आल्यावर त्याला आई बदाडते. पुढे तो विदेशात गेल्यावर आई मित्रकडे तक्रार करते हा संपर्क ठेवत नाही म्हणून. ‘तुला कुठे न्यायची सोय नाही’ हे आईला ऐकवण्याची आता त्याची पाळी असते. तो तिला सांगतो, स्काईपलाही नेट कनेक्शन लागते आणि तूच तर ते काढून टाकले होतेस. मग कशाला सांगत फिरतेस मी संपर्क ठेवत नाही म्हणून? सचिनवर राजू परु ळेकरांनी लिहिलेल्या लेखाचा समाचार मुळातून वाचायला हवा. अपरांताचा दौराही बारीक तपशील पेरत जाणारा. भाषा सुभग. 
  http://paamar.blogspot.in/