शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

आव्हानवीर अन् विश्वविजेता

By admin | Updated: November 29, 2014 14:42 IST

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्‍वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कार्लसनने आनंदलाच पराभूत करून विश्‍वविजेतेपद काढून घेतले होते!

- जयंत गोखले 

 
जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेची सांगता दोनच दिवसांपूर्वी झाली आणि अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये झालेल्या विश्‍वविजेतेपदाच्या लढतीत पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कार्लसनने आनंदलाच पराभूत करून विश्‍वविजेतेपद काढून घेतले होते!
जगभरातील सर्वच बुद्धिबळ खेळाडूंसाठी, बुद्धिबळप्रेमींसाठी ‘विश्‍वविजेता’ हा एक खास असा विषयच असतो. बुद्धिबळाचे विश्‍वविजेतेपद मिळविलेल्या खेळाडूकडून सर्वांच्याच काही ना काही अपेक्षा असतात. पुढील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा होईपर्यंत या जगज्जेत्याकडून सर्व बुद्धिबळ जगताला भरीव आणि संस्मरणीय अशी कामगिरी हवी असते. बुद्धिबळ खेळ अजून समृद्ध करण्यासाठी हा नवीन जगज्जेता काय भर टाकणार, याचे औत्सुक्य असते. आणि आजपर्यंतची परंपरा बघता, प्रत्येक विश्‍वविजेत्याने आपल्या दर्जाला साजेशी अनमोल देणगी खेळाच्या स्वरूपातून बुद्धिबळ जगताला बहाल केली आहे.
या वेळची ही विश्‍वविजेतेपदासाठीची लढत अनेक गोष्टींसाठी वैविध्यपूर्ण होती. मागच्या वर्षीदेखील याच दोन खेळाडूंमध्ये ही लढत झाली होती आणि तेव्हा आनंद विश्‍वविजेता होता, तर कार्लसन आव्हानवीर! बरोब्बर, विरोधी भूमिकेतून या वेळची लढत लढताना दोघांवरही वेगळ्या प्रकारचे दडपण होते. कार्लसन प्रथमच विश्‍वविजेतेपद राखण्यासाठी खेळणार होता, तर आनंदला मागच्या वेळी झालेल्या पराभवाचा वचपा काढायचा होता. अर्थात, आनंदने कँडिडेट्स स्पर्धा जिंकल्यानंतर हे स्पष्ट झाले होतेच, की यंदाची लढत परत याच खेळाडूंमध्ये होईल आणि दोघेही खेळाडू त्यानुसार जय्यत जयारी करूनच आले होते.
इथे एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करायला हवी आणि ती म्हणजे, आनंदचे आव्हानवीर म्हणून परत येणे! मागील वर्षीच्या लढतीत कार्लसनकडून दारुण पराभव झाल्यामुळे बहुतेकांनी ‘आनंद आता संपला’ असे ठरवूनच टाकले होते. अगदी, मॅग्नस कार्लसनसाठीसुद्धा आनंदने ती स्पर्धा जिंकून आव्हानवीर म्हणून उभे राहणे पूर्णपणे अनपेक्षित होते. त्याने दिलखुलासपणे आनंदचे कौतुक करताना ही गोष्ट जाहिररीत्या कबूलदेखील केली होती..
आव्हानवीर म्हणून निवड झाल्यानंतर मात्र पुढच्या काही महिन्यांत आनंदचा खेळ त्याच्या दर्जाला साजेसा होत नव्हता. याउलट, कार्लसन मात्र विश्‍वविजेता होण्याच्या आधीपासूनच पूर्ण भरात होता आणि विश्‍वविजेतेपदाच्या लढतीआधी त्याने ‘रॅपिड’ व ‘ब्लिट्झ’ या दोन्ही जलद प्रकारांतील जागतिक अजिंक्यपदेदेखील मिळविली. आणि यामुळेच अशा वेळी यंदाची जागतिक लढतदेखील मागील लढतीप्रमाणेच एकतर्फी होणार, अशी भीती बुद्धिबळ रसिकांना वाटत होती. परंतु, या लढतीसाठी आनंदने केलेल्या सर्वांगीण तयारीची चुणूक दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘बिलबाओ’ स्पर्धेत बघायला मिळाली. आनंदने या स्पर्धेचे विजेतेपद आरामात मिळविताना आरोबियान कलआना-क्रॅमनिक या खेळाडूंवर ज्या सफाईने विजय मिळविले, ते बघून कार्लसनदेखील खडबडून जागा झाला होता आणि या वेळी आनंदचे पाणी वेगळे असणार आहे, याचा पुरेपूर अंदाज त्याला आला!
स्पर्धेच्या आधी काही दिवस उगीचच विविध वावड्या उठत होत्या, की कार्लसन खेळणार नाहीये.. काही दिवसांनी हा धुरळा शांत झाला आणि कार्लसन त्याच्या संघासह ठरल्याप्रमाणे ‘सोचीत’ दाखल झाला. आनंदला आता अशा मनोवैज्ञानिक डावपेचांची सवय झाली असल्यामुळे अशा अफवांवर कुठलीही प्रतिक्रिया न देता शांत राहणे त्याने पसंत केले.
एकूणच सामने रंगतदार झाले. आनंदचे प्रभुत्व डावातील मध्य भागावर आहे आणि जेवढी गुंतागुंत जास्त होत जाते, तेवढा आनंदचा खेळ खुलत जातो; परंतु त्यासाठी त्याने राजाच्या पुढच्या प्याद्याने सुरुवात करणे योग्य ठरले असते, असे बहुतेकांचे मत झाले होते. एक गमतीचा भाग म्हणजे, आनंदने त्याच्या एवढय़ा वैभवशाली आणि यशस्वी कारकिर्दीत कायमच राजाच्या पुढच्या प्याद्याने सुरुवात केली. अखेर हार-जीत हा खेळाचाच एक भाग असतो. कुणीतरी आव्हानवीर ठरतो आणि कुणीतरी विजेता.. आनंदचे आव्हानवीर म्हणून परतणे हे देखील तितकेच महत्त्वाचे मानायला हवे. कार्लसनच्या खेळीबद्दल त्याला दाद मिळायलाच हवी. 
हार-जीत कुणाचीही असो, खिलाडूपण जपले जाणे केव्हाही महत्त्वाचे. 
(लेखक छत्रपती पुरस्कार विजेते 
बुद्धिबळपटू आहेत.)