शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
8
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
9
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
10
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
11
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
12
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
13
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
14
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
15
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
16
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
17
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
18
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
19
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
20
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश

काला पत्थर

By admin | Updated: May 14, 2016 12:52 IST

इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची नऊ वर्तुळं तो सांगतो

 
सुधारक ओलवे
 
इटालिअन कवी दान्तेनं 14 व्या शतकात लिहिलेलं ‘इन्फर्नो’ हे महाकाव्य. ‘द डिव्हाईन कॉमेडी’ या त्याच्या कवितेत आत्म्याचा परमात्म्यार्पयतचा प्रवास रेखाटताना दान्तेनं एक रूपक वापरलं आहे. पृथ्वीच्या पोटातल्या गुडूप अंधारात एकामागून एक चक्राकार असणारी नरकाची नऊ वर्तुळं तो सांगतो. पापं करणा:या प्रत्येकासाठी या वतरुळात वेगळी शिक्षा आहे, वेगळ्या प्रकारची यातना आहे. पृथ्वीच्या पोटात खोल खोल काळोख्या खड्डय़ात शरीरासाठीच नाही, तर मनासाठीही अनंत यातना आहेत! 
हे सारं वाचताना एखादं काव्यात्म रूपक आपण वाचतोय असा आपला समज झालाच तर तो कोळशाच्या खाणीत खोल उतरलं की एकदम चक्काचूर होऊन जातो.
पृथ्वीच्या पोटातल्या या नऊ नरक चक्रांचं वर्णन मी शब्दश: अनुभवलं ते झारखंडमधल्या धनबादमध्ये, तिथल्या काळ्या, तप्त अंधा:या कोळशाच्या खाणीत मी जाऊन पोहचलो. माङो डोळे आगाग करत चुरचुरत होते. कपडय़ांवर खाणीतली काजळी, धूळ चढली होती. खाणीत विषारी वायूंचा उग्र दर्प जाणवत होता. त्या हवेत श्वास घेणंसुद्धा मी टाळत होतो. आपण या खोल खाणीतच अडकलो आहोत या भावनेनं अस्वस्थही वाटत होतं. माङया डोक्यावरच्या तकलादू टोपीलाच लागलेला एक इवलासा बल्ब मिणमिणत होता. त्या टोपीखाली आपलं डोकं सुरक्षित आहे असं समजून मी त्या मिचमिच्या प्रकाशात खाणीतलं जग पाहू लागलो. छोटे रेल्वे ट्रॅक्स पावलाखाली दिसत होते आणि वळणावळणानं ते त्या अंधा:या खोल खाणीत दूर कुठंतरी गुडूप होत होते. कोळसा वाहून नेणा:या रिकाम्या नी भरलेल्या ट्रॉल्या त्या ट्रॅकवरून सतत ये-जा करत होत्या. त्या पाहून मला दान्तेच्या कवितेतली बोट आठवली. नरकातली नदी पार करणारी ती बोट. त्या बोटीत बसूनच नरकातले शापित आत्मे आक्रंदन करतच नदी पार करत असत. इथं मी पाहिलेलं जगही यापेक्षा वेगळं नव्हतं.
खोबणीला चिकटलेले काळेभोर डोळे माङयाकडे रोखून पाहत होते, आतल्या आत आक्रोशत असावे जसे. खाणीत काम करणा:यांच्या अंगावर गच्च ओला घाम, त्या घामाला अंगभर चिकटून बसलेली काजळी देहावरच्या त्वचेचा भाग झाल्यासारखी मुरलेली. सुरकुतलेले, काडेमुडे हातपाय आणि थकलेलं शरीर सांगतच होतं त्यांना रोज सोसाव्या लागणा:या वेदनांची, दु:खाची कहाणी. दान्तेच्या महाकाव्यातले आत्मे जसे कायमचे त्या नरकात सडतात, यातना-छळ सोसतात आणि नियतीच्या नियमाप्रमाणं कायमचे त्याच अवस्थेत वेदना सहन करत राहतात, तशीच या खाणीतली माणसं.
त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एकतर हे जे मिळतंय ते काम करत जगायचं, नाही तर उपासमारीनं मरायचं. त्यांनी जगायचा पर्याय स्वीकारला आणि आपल्या शरीराचा, आरोग्याचा बळी देत हे खाणीतलं जगणं स्वीकारलं. त्या जगण्यात ना कुठली सुरक्षितता ना खात्री. जेमतेम साधनांच्या मदतीनं सतत धोकादायक अवस्थेत काम करत राहायचं.
धनबाद हे झारखंडमधलं अत्यंत प्रदूषित शहर. देशातल्या सर्वाधिक कोळसा खाणी इथंच आहेत. शहरात प्रवेश करताच वातावरणात काळपट धूळ जाणवते. जसजसे कोळसा खाणींच्या दिशेनं जाल तसतशी सर्वत्र ती काळी धूळ दिसते. रस्त्यावर, घरांवर, दुकानांवर सगळीकडे काळ्या धुळीचं किट्टण दिसतं. लोकांचे कोरडे, भकास चेहरे तुमच्याकडे रोखून पाहतात. खरंतर त्यांच्या आणि आपल्या त्वचेचा रंग सारखाच असतो पण तरी एखादा गोरा विदेशी दिसावा, तशी माणसं आपल्याकडे पाहतात. कारण या काळपट धुळीनं त्यांच्या त्वचेचा रंगच पालटून टाकलेला असतो. आपल्या त्वचेचा मूळ रंग कसा होता हेच इथं आता कुणाला आठवत नाही इतकी ती काळी धूळ कातडीत मुरली आहे. इथल्या कोळसा खाणींनी दोन भयानक आपत्तीही अनुभवल्या आहेत. 
1965 साली झालेल्या अपघातानं 268 लोकांचा बळी घेतला होता. आणि दुसरी घटना 1975 सालची. त्या भयानक अपघातानं 372 लोक खाणीच्या पोटात गाडले गेले. त्यावर बेतलेला अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हाचा ‘काला पत्थर’ सिनेमा गाजला. 
‘काला पत्थर’ हे शब्द जरी अपमानास्पद वाटत असले, तरी या व्यवसायात काम करणा:या आणि खाणीतून कोळसा बाहेर काढणा:या माणसांना मात्र त्यातून फारसं काहीच मिळत नाही. गरिबी, उपासमार, बेरोजगारी या चक्रातच त्यांचं आयुष्य फिरतं. चार पैशासाठी काहीजण मग खाणीतून कोळसा चोरतात आणि तो सायकलवर लादून शहरात आणून विकतात. सगळ्यांसमोर उघड चालतो हा व्यवहार. त्या माणसांना ‘कोयला चोर’ म्हणतात. पण हीदेखील खाणीत काम करण्याची अपरिहार्यताच. 
..ना उद्याची आशा, ना आजची खात्री, ना कुठं निघून जायची सोय. धनबादच्या त्या नरकातच ते राहतात आणि तिथला छळ मुकाट सहन करतात. त्यांनी खाणीतून काढलेल्या कोळशातून जगभरातली किती घरं रोज उजळत असतील; पण या माणसांच्या काळजात धगधगणारी आग मात्र कधीची मरून गेलेली आहे. कायमची!
 
(छायाचित्रणाच्या माध्यमातून समाजकार्याबद्दल पद्मश्री पुरस्कारप्राप्त छायाचित्रकार ‘लोकमत’ समूहाचे 
फोटो एडिटर आहेत.)