शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

बिटविन द लाइन्स

By admin | Updated: April 12, 2015 16:46 IST

या दोघींशी संबंध आला त्यांच्या पुस्तकांच्या निमित्ताने. भेटी घडल्या. बोलणं झालं. पण काम संपलं आणि सारं संपलं, असं झालं नाही.

चंद्रमोहन कुलकर्णीया दोघींशी संबंध आला त्यांच्या पुस्तकांच्या निमित्ताने. भेटी घडल्या. बोलणं झालं. पण काम संपलं आणि सारं संपलं, असं झालं नाही.  मिळाल्या थोडक्या क्षणांमधलं खूप काही उरलं, मागे राहिलं. आई-आजीने तळहातावर ठेवलेल्या प्रसादासारखं !------------आज दोघींची आठवण.**पहिल्या रोहिणीताई भाटे. रोहिणीताईंच्या ‘ल ह जा’ पुस्तकाचं मुखपृष्ठ, डिझाइन आणि मांडणी माङयाहातची. त्या कामाच्यावेळी श्री. पु. भागवत म्हणाले होते, ‘..ते सगळंच तू त्यांच्याशी बोल, तुङयाकडेच स्टुडिओवर पूर्ण कर आणि मगच मौजेत पाठव. इकडे छपाईच्या दृष्टीनं एकदा बघू आणि घेऊ छापायला. पण डिझाइन लेव्हलवर पुस्तक पूर्ण होईपर्यंत तुझा स्टुडिओ म्हणजे मौजचं ऑफिसच समज. त्यांनाही बोललोय तसं मी.’- मग त्यानिमित्तानं रोहिणीताईंबरोबर राहिलो बरेच दिवस. ‘लहजा’मधे त्यांचा नृत्याबद्दलचा एकूणच विचार आहे. फार महत्त्वाचं पुस्तक.एकीकडे पुस्तक वाचत तर होतोच; शिवाय फोटो निवडणं, ठरवणं, रेखाचित्र, मांडणी हे सगळं चाललंच होतं, त्याबद्दल बोलणी होत होती. वारंवार भेटी होत. क्लासमधे, क्लासमधून घरी, घरनं क्लासमध्ये. कधी रोहिणीताईंच्या घरी हॉलमधे, तर कधी थेट डायनिंग टेबलावर! एखादा पदार्थ हातात ठेवता ठेवता नृत्याबद्दलचा एखादा विचारही प्रसादासारखा हातावर पडे.एकदा म्हणाल्या, ‘मनाची भूमिका महत्त्वाची असते कोणत्याही कलेत, नाही का? संवाद फार महत्त्वाचा असतो. नृत्य म्हणजे काही फक्त शरीराची भाषा नाही. नृत्य करतेवेळी तळपायाचा आणि जमिनीचा जो संवाद होतो नं, तो महत्त्वाचा!’..आज आपल्यात असत्या शरीरानं; तर नव्वद वर्षांच्या असत्या रोहिणीताई!**कमलाबाई ओगल्यांच्या ‘रुचिरा’ने किती पिढय़ांमधल्या नवविवाहित सुनांना आधार दिला असेल आजवर. कमलाबाईंच्या ‘रुचिरा’ या पुस्तकाच्या पन्नासाव्या आवृत्तीचं प्रकाशन नुकतंच झालं. आधीच्या आवृत्त्या किलरेस्कर प्रकाशनानं काढल्या. सध्याच्या नव्या आवृत्तीच्या निर्मितीच्या डिझाइन आणि फोटोग्राफीचं काम माङयाकडे सुरू होतं.  मी आणि माझा फोटोग्राफर मित्र कमलाबाईंच्या सदाशिव पेठेतल्या घरी रोज दुपारी जायचो. कमलाबाईंनी रोज चारपाच पदार्थ करायचे, आम्ही दुपारभर फोटोग्राफी करायची असं दहापंधरा दिवस चाललं. फोटोग्राफी संपेपर्यंत संध्याकाळ व्हायची. फोटोसाठी केलेले नमुन्याचे पदार्थ आम्ही संध्याकाळी खाऊनच आपापल्या घरी जायचं असा कमलाबाईंनी नियम केला होता. अर्थातच पदार्थांना लॉजिक काहीच नसायचं. काहीही कॉम्बिनेशन असायचं. म्हणजे उदाहरणार्थ खव्याच्या करंज्या, डाळिंबी उसळ, पुडिंग आणि चित्रन्न किंवा चकली आणि कवठाची चटणी आणि एकदम बिशिबेळीअन्ना!!एक प्रकारचा फूड फेस्टिव्हलच म्हणा ना!कमलाबाई ओगले फूड फेस्टिव्हल!!मग आम्ही दोघं जेवणार, म्हणून कमलाबाई पटकन आणखी एखादा जास्तीचा पदार्थ करत. डायनिंग टेबलावर आमच्या समोर आम्हाला हवं नको बघत, जेवण होईपर्यंत बसून राहत.   ‘मनातल्या मनात मांडे खाणं’ ही म्हण मराठीत प्रचलित आहे. काळाच्या ओघात हा पदार्थ आता जवळजवळ नष्ट झाल्यासारखाच असला तरी मी मात्र मांडे मनातल्या मनात न खाता, खरोखरचे, प्रत्यक्ष कमलाबाईंच्या हातचे, त्यांनीच पानात आग्रह करकरून वाढलेले, त्यांच्यासमोर बसून खाल्लेत.  मांडे करायचे होते त्या दिवशी म्हणाल्या होत्या,  ‘‘आज जास्त करता येणार नाही दुसरं आज मांडे करायचेत आणि कसेही झाले तरी ते तुम्ही दोघांनीच संपवायचेत! बायकांना घरी सांगून या, तसं हवं तर.’’  खूप वेळ खपून म्हातारीनं जे मांडे केले होते ते उच्च प्रतीच्या चवीचे तर होतेच, - शिवाय फोटोजेनिक!!नंतरच्या दिवशी इडली - वडा- डोसा- उत्तप्पा असा साऊथ इंडियन मेन्यू ठरला होता. हे दाक्षिणात्य पदार्थ करताना, पीठ आदल्या दिवशी भिजवून, आंबवून वगैरे ठेवावं लागतं. आदल्या दिवशी तशी थोडी तयारी करावी लागते.  त्यामुळे आज करू, उद्या करू असं करता करता शेवटच्या दिवसार्पयत ते पीठ भिजवणं वगैरे प्रकरण कमलाबाईंकडून काही झालं नाही. फोटो काढण्याचा दिवस आला. आम्ही फोटोग्राफीची तयारी सुरू केली तर म्हणाल्या,  ‘‘आज नाही काही केलं रे मुलांनो. कंटाळून गेलेय मी गेले आठवडाभर स्वयंपाक करून करून! आपण एक काम करू, शेजारच्या उडप्याकडून आणू विकतच हे सगळे दक्षिणोतले पदार्थ. आणि आपण कितीही केलं ना, तरी हॉटेलसारखा इडली-डोसा काही घरी होत नाही. घरच्याची चव चांगली होते, पण दिसायला जरा बेंगळुरूच दिसतात आपले घरी केलेले डोसे. आणि कॅमे:याला चव कुठे कळणार आहे? आपण आणू विकतच! तुम्ही छान सजवा डिशमधे, सुरेखशी मांडणी करा आणि काढा सुंदर सुंदर फोटो. मी जरा आज आराम करते.’’.तर अशा या प्रॅक्टिकल कमलाबाई.त्यांचं नाव निघालं की आठवते ती त्यांची प्रसन्न मुद्रा आणि मुख्य म्हणजे आठवतो, तो पदार्थ करतानाचा त्यांचा कॉन्फिडन्स! अहो, छान छान पदार्थ करताना, इंच-एमएम-ग्रॅमसारखी वजनंमापं नाकारून, थेट वाटी-चमच्याचं घरगुती माप वापरण्यासाठी कॉन्फिडन्स लागतो, ऐ:यागै:याचं काम नाही ते. - आज बाजारात रोजच्या रोज स्वयंपाकावरची  बेसुमार पुस्तकं येत असताना अणि टीव्हीवरच्या कुकरीशोजचा रात्रंदिवस भडिमार सुरू असताना  माङया घरातल्या किचन कॅबिनेटमध्ये ठेवलेल्या रुचिराच्या प्रतीमधून आत्मविश्वासानं हसत असते, कमलाबाईंचीच छबी!!