शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

बिंज वॉचिंग - झुकू नका, ‘ताठ' राहा! - कसं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 10:50 IST

बिंज वॉचिंग करताना स्क्रीनसमोर 'डोळे वटारून' बसताना आपल्या आरोग्याचे कसे तीन तेरा वाजतात

बिंज वॉचिंग करताना स्क्रीनसमोर 'डोळे वटारून' बसताना आपल्या आरोग्याचे कसे तीन तेरा वाजतात, हे आपण मागच्या भागात पाहिलं. विनाव्यत्यय एकामागोमाग एक अनेक शोज, सिरीज पाहाणं आपल्याला सोयीचं वाटत असलं, तरी हे एक प्रकारचं व्यसन आहे. त्यातून वेळीच बाहेर पडणं आपल्याला जमलं पाहिजे.

स्क्रीन पाहाण्याचं हे प्रमाण मर्यादेत असेल तर ठीक, पण बऱ्याचदा आपल्याला त्याचं भानच राहत नाही. जेव्हा आपण आपल्या जबाबदाऱ्या टाळायला लागतो, आपली कामं पुढे ढकलायला लागतो, कुटुंब आणि मित्रांबरोबर घालवण्याचा वेळही या बिंज वॉचिंगमध्ये जायला लागतो, तेव्हा समजायचं, आपलं स्क्रीन पाहाणं आता व्यसनाकडे वळू लागलं आहे. त्याच्यापुढे झुकण्याऐवजी पण 'ताठ' राहिलं पाहिजे.

बिंज वॉचिंग कसं आणाल नियंत्रणात?१. स्वत:वर नियंत्रण ठेवाकुठलेही शोज, सिरीज पाहण्याच्या आधीच मनाशी ठरवून ठेवा, मी आज एक किंवा दोन एपिसोड पाहणार आहे. तेवढं झालं की लगेच आपला स्क्रीन ऑफ करा आणि दुसरी कुठलीही कृती करा.

२- वेळेवर नियंत्रण ठेवादुसरा प्रकार म्हणजे आपण किती वेळ एपिसोड्स पाहणार आहोत, त्या वेळेवर नियंत्रण ठेवा. त्यासाठी अलार्म किंवा टायमर लावून ठेवा. बेल वाजली की स्टोरी कितीही रंगात आलेली असली, तरी स्क्रीनपासून लांब व्हा.

३. समतोल ठेवास्क्रीन पाहाणं आणि आपल्या इतर कृती यात समतोल राखा. तुम्ही स्क्रीन पाहत असाल तरीही वाचन, व्यायाम,छंद, मित्र, कुटुंब यांच्यासोबतचा वेळ अवश्य राखून ठेवा.

४- स्क्रीनला 'सामाजिक' वळण द्याआपल्याला सिरीज वगैरे पाहायच्या असतील, तर त्यासाठी शक्यतो आपले मित्र, नातेवाइक यांनाही त्यात सामील करा. वेळ ठरवून घ्या. त्यांच्यासोबतचं मनोरंजन तुम्हाला अधिक आनंद देऊन जाईल आणि स्क्रीनच्या वापरावरही मर्यादा राहील.

५. झोपेची वेळ लक्षात ठेवामनोरंजन करीत असताना आपल्याला झोपायचं आहे, झोपण्याची वेळही आहे, हे लक्षात ठेवा. मनोरंजनाच्या नादात झोपेला दांडी मारू नका. केव्हा झोपायचं यासाठी अलार्म लावा. त्यावेळी आपला स्क्रीनही झोपला पाहिजे.