शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

भारत का अपना फोन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 06:05 IST

डिझाइनची ताकद काय असते, याची कल्पना काही वर्षांपूर्वी गाजलेल्या नोकिया 1100 या फोननं येऊ शकेल. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे  कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा  एक उत्कृष्ट नमुना समजला जातात.   मोबाइलच्या इतिहासात पहिल्यांदाच  35 वेगवेगळ्या रंगछटांत मिळणार्‍या या फोनची किंमतही  त्या काळातील इतर मोबाइलच्या मानाने परवडेल अशी होती.  डिझाइन आणि तंत्नज्ञान यांचा अतुलनीय मिलाफ असलेल्या  या मोबाइलच्या 25 कोटीपेक्षाही जास्त प्रति  संपूर्ण जगभरात केवळ चार वर्षांत विकल्या गेल्या.  फक्त मोबाइलचाच नाही, तर आजतागायत  विकल्या गेलेल्या कुठल्याही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा  हा जागतिक विक्रम आहे.

ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषिकेश खेडकर

भारत का अपना फोन ! हे वाचताक्षणी काय आलं तुमच्या डोळ्यांसमोर ? थोडं आठवून पाहा, नक्की दिसेल मी काय म्हणतो आहे ते. ‘नोकिया 1100’! आठवलं का काही आता? आजची मिलेनिअल जनरेशन सोडली तरी बहुतेक आपल्या सगळ्यांना या मोबाईल फोनच्या काहीना काही आठवणी जरूर असतील. वाचकांपैकी काही जणांकडे हा फोन त्यावेळीस नसेल कदाचित, पण तुमच्या आसपास हा फोन वापरणारी माणसं तुम्हाला नक्कीच भेटली असणार. इथे मी फक्त तुमच्या आठवणींना उजाळा देत नाहीये, तर डिझाइनची ताकद कशाला म्हणतात याची कल्पना देतो आहे. आपली डिझाइनची गोष्ट आज या परिचित, पण तितक्याच अनोख्या वस्तूचा मागोवा घेणार आहे. हे करण्यामागे दोन उद्देश आहेत; एक म्हणजे आपण आजपर्यंत डिझाइन विश्वाचे विविध पैलू बघितले, आता डिझाइनचे आपल्या आयुष्यावर प्रभाव पाडण्यामागचे सार्मथ्य बघूयात आणि दुसरं  म्हणजे या सार्मथ्यामागची डिझाइनची गोष्ट जाणून घेऊयात.  गोष्ट चालू होते 2003 साली ; जेव्हा नोकिया कंपनीने जागतिक बाजारपेठेत पहिल्यांदा नोकिया 1100 हा मोबाइल फोन आणला. त्यानंतर या फोनने भारतातच नाही तर संपूर्ण जगात पुढचे चार वर्ष जो काही धुमाकूळ घातला त्याला इतिहास साक्षीदार आहे. नोकिया कॉर्पोरेशन ही फिनलॅँडस्थित दूरसंचार क्षेत्नातली 1865 सालापासूनची अत्यंत नावाजलेली कंपनी. मोबाइल फोन बनवण्यात हातखंडा असणार्‍या या कंपनीने 1995 साली भारतात पहिला मोबाइल फोन आणला. पेजरच्या त्या जमान्यात मोबाईल विकत घेणे तर सोडा, पण तो असतो काय हेदेखील सर्वसामान्य भारतीयाला माहिती नव्हते. माहिती तंत्नज्ञानाने भारावलेल्या त्या वेळेचा भारत या दूरसंचार प्रणालीने जवळ येऊ पाहत होता; आणि हीच अनुकूल परिस्थिती बघून नोकिया कंपनीने भारतात मोबाईल फोनची मुहूर्तमेढ रोवली. 1995 ते 2003 या आठ वर्षांच्या काळात नोकिया कंपनीने अनेक फोन भारतीय बाजारपेठेत आणले; बदलत्या तंत्नज्ञानाबरोबर फोनमध्येदेखील काही सुधारणा होत गेल्या, पण तरीही ‘र्शीमंत देशांसाठी बनवलेली गेलेली वस्त’ अश्या समजामुळे जगातील मोठ्या विकसनशील देशांमधल्या बाजारपेठेत मोबाइल फोनला म्हणावं तसं यश मिळत नव्हतं. याच गोष्टीची दखल घेत नोकिया कंपनीने विकसनशील देशातील ही मोठी बाजारपेठ समजून घेण्याचं ठरवलं. या कामासाठी कंपनीने ज्यान चिपचेस नामक एका ह्यूमन बिहेवोरीयल म्हणजेच मानवी वर्तनाचा अभ्यास करणार्‍या शास्त्नज्ञाची नेमणूक केली. शास्त्नज्ञ म्हटल्यावर आपल्या मनात पांढरा कोट परिधान करून प्रयोगशाळेत काम करणार्‍या व्यक्तीची जी प्रतिमा येते त्याला साफ छेद दणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्यान चिपचेस. स्वत:चं साधं ऑफिसदेखील नसलेल्या या शास्त्नज्ञाची प्रयोगशाळा म्हणजे पूर्ण जग. वेगवेगळ्या माणसांची संस्कृती, त्यांचं राहणीमान, त्यांची जीवनशैली, त्यांचे दैनंदिन व्यवहार आणि त्यात वापरल्या जाणार्‍या वस्तूंचे निरीक्षण आणि अभ्यास हेच चिपचेसचे नित्य प्रयोग. ह्यूमन सेंटर्ड म्हणजेच मानव केंद्रित डिझाइनचे  संशोधन करून त्याचा उपयोग भविष्यातील वस्तू बनवण्यासाठी कसा करण्यात येईल, यात चिपचेसचा हातखंडा आहे. नोकिया कंपनीबरोबर काम करत असताना ज्यान भारत, चीन, ब्राझील,आफ्रिका अशा अनेक देशांमध्ये माणसांचे निरीक्षण करत फिरला. त्याचे काही लेख वाचले किंवा त्याला ऐकले की या प्रवासात त्याला आलेले विलक्षण अनुभव आपल्याला कळतात. घरातून बाहेर पडताना लोक किल्ली, पैसे आणि मोबाइल या तीन वस्तू हमखास बरोबर का नेतात? विकसनशील देशात लोक मोबाइलचा उपयोग फक्त दूरसंचारासाठी म्हणून नाही तर पर्यायी बँकिंग व्यवस्थेसारखा कसा करतात? बिघडलेला मोबाइल लोक स्वत: किंवा रस्त्याच्या कडेला बसलेल्या रिपेअरिंगच्या दुकानातून कसा दुरु स्त करतात? मोबाइलकडून लोकांना काय अपेक्षा आहेत?. या आणि अशा इतर काही प्रश्नांच्या चिपचेसनी शोधलेल्या उत्तरात नोकिया 1100 या मोबाइलच्या यशाचा मंत्न लपलेला आहे. नोकिया 1100 हा पहिला फोन आहे; ज्यात मागच्या बाजूला टॉर्च दिला गेला; या कारणामुळे इतर लोकांबरोबरच रात्नी शेतात काम करणारे शेतकरी आणि ट्रक चालवणारे ड्रायव्हर यांचा मोठा वर्ग या फोनचा चाहता झाला. स्वत: बनवलेल्या सात रिंगटोन साठवून ठेवण्याची क्षमता असणार्‍या या फोनने त्यावेळच्या तरु णाईला वेड लावलं होतं. धुळीपासून संरक्षण करणारे या फोनचे कि-पॅड आणि स्क्र ीन आजही डिझाइनचा एक उत्कृष्ट नमुना समजला जातात.  मोबाईलच्या इतिहासात पहिल्यांदाच 35 वेगवेगळ्या रंगछटांमध्ये मिळणारा हा नोकिया 1100 कोणाला आवडला नसता तरच नवल. या सगळ्यांत कहर म्हणजे त्या काळात उपलब्ध असणार्‍या इतर मोबाइलच्या मानाने याची किंमतदेखील बहुतांश विकसनशील देशांमधील ग्राहकाला परवडेल अशी होती. डिझाइन आणि तंत्नज्ञान यांचा अतुलनीय मिलाफ साधून बनवल्या गेलेल्या या मोबाइलच्या 250,000,000 पेक्षाही जास्त प्रति संपूर्ण जगभरात केवळ चार वर्षांत विकल्या गेल्या. फक्त मोबाइलचाच नाही, तर आजतागायत विकल्या गेलेल्या कुठल्याही कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूचा हा जागतिक विक्र म आहे. एखादी कंपनी वस्तू बनवण्याआधी आपल्या ग्राहकाचा किंबहुना ती वस्तू वापरणार्‍या उपभोक्त्याचा किती संवेदनशीलतेने विचार करते; इतकंच नाही तर तो विचार प्रत्यक्ष डिझाइनमध्ये वेगवेगळ्या प्रकारे उतरवते, तेव्हा काय इतिहास रचला जातो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नोकिया 1100 आहे, यात शंकाच नाही. जेव्हा डिझाइनची ताकद अशाप्रकारे जनसमुदायाला बदलत असते किंवा घडवत असते तेव्हा डिझाइनची गोष्ट या क्षणाची दखल न घेता पूर्ण होऊच शकत नाही.

hrishikhedkar@gmail.com(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)