शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
2
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
3
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
4
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
5
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
6
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
7
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
8
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
9
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
10
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
11
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
12
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
13
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
14
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
15
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
16
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
17
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
18
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
19
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
20
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्युअरली इंडियन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 06:05 IST

फ्रान्समधील कान चित्रपट महोत्सवात नेहमीप्रमाणे उत्तम चित्रपटांची रेलचेल होती. ज्येष्ठ दिग्दर्शक केन लोच यांचा ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ हा त्यातलाच एक. कौटुंबिक संघर्षाची टिपिकल कथा हाच या चित्रपटाचाही विषय असला तरी तो किती वेगळ्या पद्धतीनं मांडता येतो, याची शिकवण त्यातून मिळते.

ठळक मुद्देमाझ्या चित्रपटविषयक कार्यशाळांमध्ये मला जेव्हा मुलं विचारतात की,  ‘परदेशी आणि आपल्या चित्रपटात मुख्य फरक काय?’ ‘ तेव्हा माझं उत्तर असतं,   ‘ते आशय आणि गोष्टीबरोबर राहतात आपण विविध कारणांनी उगाचच इथे तिथे जातो. ’

- अशोक राणे

‘‘धिस इज प्युअरली अ इंडियन स्टोरी.’’कानच्या  स्पर्धा  विभागात  केन  लोच या प्रतिभावंत ज्येष्ठ दिग्दर्शकाचा ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ पाहिल्यानंतर सर्वभाषिक आणि सर्व थरातील भारतीय प्रेक्षकांची पहिली उत्स्फूर्त प्रतिक्रि या हीच होती. अत्यंत हलाखीच्या अवस्थेत कसंबसं  जगण्याचा  प्रयत्न करणार्‍या आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अधिकाधिक मेटाकुटीला येणार्‍या, सुटता सुटणार नाही असा कोंडीत सापडणार्‍या कुटुंबाची गोष्ट आपल्या गरीब देशात तर किती तरी सापडतील. त्या अर्थाने ही प्रतिक्रि या होती; परंतु काहींच्या या प्रतिक्रियेत शेवटी आणखी एक शब्द होता..बट! पण! म्हणजे भारतीय वास्तवात अशा गोष्टी सापडतील परंतु त्याकडे केन लोच ज्याप्रकारे पाहतात तसं आपले चित्रपटकर्ते पाहू शकतील का ? गुंतागुंतीचा आणि काहीसा अंगावर येणार्‍या या मुद्दय़ाच्या संदर्भात लगेचच एक स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे एखाद्या विषयाची  पटकथेत  मांडणी  करताना  आपण  एका  मागून एक अशी प्रसंगांची मालिका तयार करतो. तसं करताना व्यक्तिरेखा आकाराला आणत त्यातून नॅरेटिव्ह - कथन - तयार होणं आणि त्यानं आपली वाट काढीत पुढे जाणं याकडे आपलं दुर्लक्ष होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आशय आणि कथा यावर नको त्या गोष्टीला आपण स्वार होऊ देतो. माझ्या चित्रपटविषयक कार्यशाळांमध्ये मला जेव्हा मुलं विचारतात की,  ‘परदेशी आणि आपल्या चित्रपटात मुख्य फरक काय?’ ‘ तेव्हा माझं उत्तर असतं,   ‘ते आशय आणि गोष्टीबरोबर राहतात आपण विविध कारणांनी उगाचच इथे तिथे जातो. ’ केन लोच यांचा दिग्दर्शिय दृष्टिकोन जो त्यांच्या याच नव्हे तर अनेक चित्रपटांतून जाणवला तो मला माझ्या याच निरीक्षणाला बळ देतो.इटालियन रिएलिझम या दुसर्‍या महायुद्धानंतर चित्रपट माध्यमात आणलेल्या नव्या क्रांतिकारक विचारधारणेने प्रेरित झालेल्या केन लोच यांनी त्यातील व्हितोरिओ डिसिका यांचा   ‘बायसिकल थिव्हज’ने आपल्याला या माध्यमाकडे पाहण्याची दृष्टी दिली आणि प्रेरणा दिलीय असं म्हटलंय. ते म्हणतात,‘‘डिसिकांच्या या चित्रपटाने, चित्रपट हा सर्वसामान्य आणि त्यांचा जीवन संघर्ष यावरदेखील केंद्रित करता येतो. त्यासाठी स्टारपणाची झूल अंगावरून न उतरणार्‍या स्टार्सची आणि त्यामुळे येणार्‍या फिल्मीपणाची गरज नसते. वास्तव प्रभावी असतं, प्रेरणा देणारं असतं. ’’ ‘सॉरी, वुई मिस्ड यू’   त्यांच्या या विधानाची पुरेपूर साक्ष देतं. मला तो पाहिल्यानंतर विजय तेंडुलकरांचं एक निरीक्षण आठवलं. ते म्हणायचे,‘‘गच्च भरलेल्या लोकल्समधून ज्याप्रकारचे हाल काढत मुंबईकर रोजच्या रोज प्रवास करतात आणि संध्याकाळी पार विकल अवस्थेत परतीचा प्रवास करत दुसर्‍या दिवशी ज्या नव्या उत्साहाने लोकलच्या त्याच गर्दीत जिवाच्या आकांताने घुसतात ते अवाक् करणारं आहे.’’  सर्वसामान्यांचा हाच संघर्ष ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ या चित्रपटाचा आशयबिंदू आहे. कितीही मरा, परिस्थितीत फारसा फरक पडत नाही आणि तरीही सर्वसामान्य माणूस आपला संघर्ष चालू ठेवतो त्याला तोड नाही.रिकी आणि अँबी हे जेमतेम चाळिशी पार केलेलं जोडपं आणि त्यांची दोन मुलं यांच्या वाट्याला हेच वास्तव आलं आहे. नव्या मुक्त अर्थव्यवस्थेत नोकर्‍यांची परिस्थिती अधिकच बिकट झालेली आहे. नोकर्‍या सहजी मिळत नाहीत, मिळालेल्या कधी हातच्या जातील हे सांगता येत नाही असं आजचं वास्तव आहे. रिकीच्या नोकर्‍याही अशाच येतात-जातात. आता त्याला स्वतंत्रपणे व्यवसाय करायची संधी प्राप्त होते. एका कुरियर कंपनीत ड्रायव्हर कम डिलिव्हरी मॅन अशी  ‘स्वतंत्र’  व्यवसायाची ही संधी असते. त्यासाठी त्याला स्वत:ची व्हॅन असणं आवश्यक असते. ती घ्यायची तर बायकोची कार विकणं याशिवाय दुसरा पर्याय नसतो. एका एजन्सीद्वारा घरोघरी जाऊन वृद्धांची देखभाल करण्याचं काम करणार्‍या अँबीला दिवसभर शहरभर चारी दिशांनी धावावं लागतं. त्यासाठी तिला कार आवश्यकच असते; परंतु नवर्‍याचाही कामधंदा सुरू होईल आणि दोघांच्या उत्पन्नातून स्वत:चं छोटंसं का होईना घर घेता येईल या आशेवर ती कार विकते. कारने जाऊन एकेक घरं गाठत जात मुडी, आजारी वृद्धांची सेवा करणार्‍या अँबीची आता चांगलीच दमछाक होते. अनेक ‘टर्म्स अँड कंडिशन्ड’च्या बोलीवर करायला घेतलेल्या व्यवसायात रिकीचीही तेवढीच फरफट होते. ठरलेल्या वेळेत डिलिव्हर्‍या होऊन ठरलेले पैसे पदरात पडावेत, लेट डिलिव्हरीचा कसलाही दंड बसू नये म्हणून तो त्याच्या छोट्या मुलीचीही मदत घेतो. या सर्व फरफटीत वयात येणार्‍या त्यांच्या मुलामुळे घरात सतत भांडणं, त्रागा, चिडचिड होत राहते. त्यांचं कारण अगदी तसं सोप्पं आहे. बापबेट्यात कसलाच संवाद नाही. तो करायला उसंत आहे कुठे बापाकडे? आणि मुलाच्या मनात बापाविषयीची अढी ! रिकी हा व्यवसाय सुरू करतो तेव्हा त्याचा एक सहकारी त्याला पाण्याची रिकामी बाटली देतो. रिकीला कळत नाही.‘‘कुरियर वेळच्या वेळी पोचवताना लघवीलाही वेळ मिळत नाही. त्याची ही सोय.’’  रिकी त्यावेळी बॅड ज्यॉक म्हणून त्यावेळी हसण्यावारी नेतो. परंतु पुढे तेव्हा या व्यवस्थेची गरज भासतेच. परदेशात कुठेही रस्त्यावर हा विधी कुणालाच उरकता येत नाही.व्हॅनच्या आडोश्याला रिकी तो पार पाडत असताना काही गुंड त्याच्या व्हॅनमधला माल पळवतात. विरोध करणार्‍या रिकीवर प्राणघातक हल्ला करतात. त्यात जो जबर जखमी होतो. नंतरच्या दृश्यात तो सरकारी इस्पितळात रक्ताळलेल्या अवस्थेत बसलेला दिसतो. शेजारी त्याची बायको. त्याचवेळी कुरियर कंपनीतून त्याला फोन येतो. झालेल्या एकूण नुकसानीची भरपाई आणि वर अमूक एक दंड असं त्याला सुनावलं जातं तेव्हा तो गयावया करत बोलत राहतो. शेजारी बसलेली अँबी फोन घेते आणि तो नको नको म्हणत असताना त्या कुरियरवाल्याला चांगलंच फैलावर घेते. त्यावेळी ज्या भोगातून ती आणि तिचं कुटुंब जात असतं त्यातला सारा संताप बाहेर येत राहतो. हे दृश्य कधीच विसरता येणार नाही असं आहे.  वर जे म्हटलंय की घटना, प्रसंगापेक्षा व्यक्तिरेखा आणि त्यांचे परस्पर संबंध यातून आशयबिंदू विस्तारत जातो त्याचा इथे प्रत्यय येतो.‘द विंड दॅट शेक्स द बार्ली’   (2006) आणि ‘आय दॅनियल ब्लॅक’ (2016) या दोन चित्रपटांसाठी कान महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पाम द ओर प्राप्त करणार्‍या केन लोच यांचा   ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ कुणीच मिस करू नये अशी सर्वांगसुंदर कलाकृती आहे.यंदाचा ‘पाम दी ओर’ पुरस्कार प्राप्त ‘पॅरासाइट’ हा कोरियन चित्रपटदेखील सर्वसामान्यांच्या याच संघर्षाची गाथा ऐकवतो. बोंग यून हो या अतिशय यशस्वी दिग्दर्शकाबाबतही केन लोच यांच्याविषयी बोललो तेच लागू पडतं. व्यक्तिरेखातून आशयबिंदू आणि कथा फुलवत नेत त्यांनीही आदिम तत्त्वाला हात घातला आहे. ‘सॉरी, वुई मिस्ड यू’ प्रमाणेच कसलाच कामधंदा नसलेल्या आणि म्हणून जगण्याचा अविरत संघर्ष वाट्याला आलेल्या कुटुंबाचीच गोष्ट इथे आहे. फरक इतकाच आहे की  ‘पॅरासाइट’ मधल्या कुटुंबाने या संघर्षाला सामोरं जाण्याचा वेगळाच मार्ग चोखाळला आहे. इथेही चौकोनीच कुटुंब आहे. तरुण मुलाला त्याचा एक मित्र एक काम सुचवितो. एका मोठय़ा आय.टी. कंपनीच्या मालकाच्या मुलीचं ट्यूशन करायचं आहे; मात्र त्यासाठी विद्यापीठाची डिग्री पाहिजे. ती याच्याकडे नाही; परंतु पदवीचं असं सर्टिफिकेट त्याची धाकटी बहीण त्याला करून देते आणि इथूनच या रास्कल कुटुंबाची ओळख होते. याला त्या र्शीमंत माणसाच्या आलिशान बंगल्यात प्रवेश मिळतो. ती पोरगीही याच्या प्रेमात पडते. मालकाच्या बायकोला तिची कामं करायला एक सेक्रेटरी हवी असते. हा आपल्या बहिणीला तिथे आणून बसवतो. अर्थातच बहीण असल्याचं न सांगताच. ही चतुर बहीण आपली चतुराई वापरून मालकाच्या तरुण ड्रायव्हरला बदनाम करून त्याची नोकरी घालवते आणि तिथे बापाची वर्णी लावते. अर्थातच आपलं नातं लपवून. त्या घरात दिवसभराची सारी कामं करणारी एक पन्नाशीची मोलकरीण असते. ही तिघं मिळून तिला घराबाहेर काढतात आणि तिथे आईला आणून ठेवतात. चौघंही त्या घरात मालक- मालकिणीचा विश्वास संपादन करून ठिय्या देतात. तर असे हे आयजीच्या जिवावर बायजीप्रमाणे पॅरासाइट म्हणून आपल्या सर्वप्रकारच्या अभावहीन, संघर्षमय जीवनातून मार्ग काढतात आणि छान   ‘सेटल’   होतात. त्यांची ही हाव पुढे कल्पना करता येणार नाही अशा वळणांनी वाट काढत राहते. एकदा अचानक कळतं की आधीच्या मोलकरणीने तिच्या नवर्‍याला या घराच्या तळघरातच आर्शय दिलेला आहे. इथून ही कथा हिंसक वळण घेते. कारण स्वाभाविकच आहे - अस्तित्वाची लढाई ! या चौघांची आणि त्या दोघांचीही ! ‘पॅरासाइट’ पाहताना गेल्याच वर्षी इथे कामध्येच पाहिलेला जपानचा ‘द शॉप लिफ्टर्स’ आठवला. आपल्या गरिबीतून  मार्ग  काढण्यासाठी  चक्क  चोरीचा मार्ग! घरातले एकूण एक चोर ! त्यांचं चौर्यकर्म सुध्दा कमालीचं कल्पक ! नगीसा ओशिमा या दिग्गज जपानी दिग्दर्शकाचा पन्नासच्या दशकातला ‘द बॉय’ याच धर्तीचा. कसलाच कामधंदा नसणारं एक कुटुंब आपल्या आठेक वर्षाच्या मुलाला एका कामात तरबेज करतं. सुसाट येणार्‍या गाडीचा धक्का बसल्यासारखं त्या मुलाने रस्त्यावर पडायचं आणि आईबापाने तमाशा करत रोखीत भरपाई करून घ्यायची.या तीनही चित्रपटातली माणसं आपण काही गैर वागतोय, काही अनैतिक करतोय या मानसिकतेची नाहीच आहेत. त्यांच्या अस्तित्वाच्या, जगण्याच्या लढाईत नीती-अनीतीची चैन त्यांना परवडणारी नसते. मुळात इथपर्यंत जायची त्यांना गरज भासतच नाही. रामगोपाल वर्माच्या  ‘रंगीला’ मध्ये रस्त्याने जाता जाता मुन्ना केळ्याच्या गाडीवरचं एक केळं उचलतो. केळेवाला त्याला झापतो तसा तो ‘एकही केला लिया ना, तेरी पुरी गाडी तो नही खा गया’   असा युक्तिवाद करतो. आपलं काही चुकलंय हे त्याच्या गावीच नाही. या तीनही चित्रपटात हाच मुद्दा आणि त्या अनुषंगाने या व्यक्तिरेखांचं चित्रण होतं. चूक की बरोबर हे आहेच महत्त्वाचं, परंतु यांनी आपल्या अस्तित्वासाठी हाच मार्ग शोधला आहे. अनीतीचा आरोप सर आँखो पर ! हे वाचताना थोडं इकडे तिकडे पहा. भोवताली अशी किती तरी माणसं आहेत. ज्यांच्याकडे पिढय़ान् पिढय़ा पुरून उरेल इतका पैसा आहे, त्यांना मोह आवरता येत नाही. इथे तर जगण्याचाच प्रश्न आहे !ashma1895@gmail.com(लेखक ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत.)