शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
2
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
3
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
4
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
5
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
6
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
7
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
8
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
9
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
10
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
11
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
12
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
13
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
14
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
15
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
16
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
17
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष
18
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
19
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
20
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)

व्यवहार

By admin | Updated: May 30, 2015 14:20 IST

परवा कुठेतरी जे. कृष्णमूर्तीचा फोटो पाहिला आणि कॅप्टन रोंची आठवण झाली.

 चंद्रमोहन कुलकर्णी

 

परवा कुठेतरी जे. कृष्णमूर्तीचा फोटो पाहिला आणि कॅप्टन रोंची आठवण झाली. 

कॅप्टन रो म्हणजे हस:या  चेह:याचा मोठा झकास माणूस. त्यांच्याबद्दल लिहिण्यासारखं खूपच आहे. ते कधीतरी कुणीतरी लिहीलच, कदाचित कुणीतरी लिहिलं असेलही; पण मला मात्र त्यांची आठवण झाली, की पाठोपाठ एक शब्द आठवतो  Excuisite
त्याबद्दल  :
कॅप्टन रो! नावाचा उच्चर झाल्याबरोबर त्यांना ओळखत असणा:या अनेकांच्या नजरेसमोर उभी राहील ती त्यांची सकाळच्या कोवळ्या उन्हासारखी उल्हसित, हसरी मुद्रा. एके काळी पुण्यातल्या अॅडव्हर्टाय¨झगचं क्षेत्र या नावातल्या अक्षरांशिवाय पूर्ण व्हायचं नाही.
दादा माणूस.
ऐंशीच्या दशकात प्रतिभा अॅडव्हर्टाय¨झग ही पुण्यातली सर्वात मोठी, महत्त्वाचं काम आणि मोठा व्यवसाय करणारी अॅड एजन्सी. क्रिएटिव्ह काम करणा:या  पुण्यातल्या ब:याचशा कलावंतांची नावं या एजन्सीशी जोडलेली. तर हा कॅप्टन रो नावाचा हरहुन्नरी मनुष्य प्रतिभा अॅडव्हर्टाय¨झगसाठी कॉपीरायटिंगचं काम करीत असे. मोठा लोकप्रिय मनुष्य.  जगातल्या जवळजवळ सगळ्या महत्त्वाच्या भाषा ह्याच्या  लेखणीवर नृत्य करीत. जिभेवर सरस्वती. वागणं-बोलणं गोड. मिलिटरीची बॅकग्राउंड असल्यानं देहबोलीत एक प्रकारची ऐट आणि आत्मविश्वास. 
आम्ही सगळे तेव्हा बारके होतो. अॅप्लाइड आर्टच्या  दुस:या वर्षाला शिकत होतो. थोडे फार पैसे मिळवण्यासाठी वर्गात शिकत असूनही विद्यार्थी (काही शिक्षकही) कमर्शिअल आर्ट म्हणजे प्रेस अॅडची डिझाइन्स, लोगो, सिंबॉल, ब्रोशर्स, फोल्डर्स वगैरे कामं कॉलेजच्या कामाच्या वेळात करत. त्याला  शब्द होता  ‘बाहेरचं काम’!  हे सांगण्याचं कारण म्हणजे बाहेरचं काम करण्याचा हा किडा आमच्या मित्रमंडळीतही होता. कुठून कुठून ओळखीतनं काही ना काही काम निघायचं. काही जण विद्याथ्र्याना मदत म्हणूनही काम देत. त्यातून आमचं थोडं काम, थोडे पैसे, थोडी मजा असं चालायचं. आर्ट मटेरिअलचा खर्च भागून, वर्षाची फी वगैरे भरून झाली की खिशात थोडे पैसेही खुळखुळत!
असंच एकदा पुण्यात ज्यांची दोन-तीन हॉटेल्स होती, अशा (पण मराठी, शेट्टी नव्हे!) एका हॉटेलच्या मालकांनी मला बोलावलं, तेही त्यांच्या घरी.
गेलो.
कॉलेजच्या  जवळच घर होतं. हॉटेल विश्व, कल्पनाच्या  समोरच. घर साधं नव्हतं. चांगला मोठाच्या मोठा ऐसपैस, प्रशस्त बंगलाच होता. हॉटेलच्या  मालकांचं घर असतं ही कल्पनाच मला तेव्हा नवीन होती. म्हणजे, हॉटेलच्या मालकांचं घर असतं, ह्याबद्दल मी त्या आधी कधी विचारच केलेला नव्हता. मला वाटायचं, झोपत असतील तिथेच कुठेतरी, हॉटेल बंद करून, रात्री! 
स्वच्छ पांढरा पायजमा कुर्ता, पायात सपाता घालून मालक एका मोठय़ा सोफ्यावर बसले होते. मला दारात पाहताच थोडंसं दरडावूनच म्हणाले, ‘‘जाहिरातीचं डिझाइन करायचं, करशील ना?’’
उत्तर द्यायच्या आधी त्यांच्या दरडावण्याला न घाबरता मी इतर तपशील विचारले. 
बंगल्याच्या आवारातच त्यांना एक इटिंग स्पॉट काढायचा होता. त्या काळात फास्टफूड आताइतकं बोकाळलं नव्हतं, पण सुरुवात झाली होती. चवदार असे काही शाकाहारी-मांसाहारी झटपट पदार्थ मिळण्याचा स्पॉट अशी काहीशी कल्पना होती. 
मी विचार करून होकार दिला. 
जाहिरातीत इटिंग स्पॉटच्या नावाच्या अक्षराचं छानसं डिझाइन करायला सांगून कोंबडय़ाचं एखादं ग्राफिक टाकायला विसरू नका, असंही त्यांनी जाता जाता सांगितलं; आणि भेटीची पुढची वेळ ठरवून मालक उठले. 
मलाही आर्टवर्क करायची घाई झाली होती. तेव्हा अगदी एखादं काम करायची फार उत्सुकता असायची आणि उत्सुकतेपोटी घाई! कधी एकदा एखादं काम करतोय असं व्हायचं! 
जाता जाता त्यांनी कोंबडय़ाच्या चित्रसाठी ‘ग्राफिक’ असा शब्द वापरला होता, याचा आनंद वाटून जरा जास्तच उत्साहानं कामाला लागलो. वर्तमानपत्रत जाहिरात करायची होती. बजेट फार मोठं नसलं तरी दोन कॉलम बाय बारा सेंटीमीटर हेही अॅप्लाइड आर्टच्या दुस:या इयत्तेतल्या माङयासारख्या विद्याथ्र्याला काही कमी आव्हान नव्हतं. जाहिरातीचं आर्टवर्क तर मी करायचंच होतं; पण कॉपीरायटिंग वगैरे मीच सगळं बघायचं होतं. पैशांबद्दल मी काही बोलायच्या आधीच मला या  कामाचे ‘अडीचशे रुपये मिळतील’, असंही त्यांनी स्पष्टपणो मला सांगितलं होतं. अडीचशे ही रक्कम मला खूपच होती. मी खूश होतो.
 
बाकीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. मुख्य प्रॉब्लेम होता कॉपीरायटिंगचा! इथे कॉपी कुणाला लिहिता येत होती? 
जाहिरात मराठीत करायची असती तर फारसा प्रश्न नव्हता. काहीतरी जुळवाजुळव करता आली असती इकडून तिकडून, पण त्यांना जाहिरात हवी होती इंग्रजीत! 
आता आली का पंचाईत!
इंग्रजी कॉपीरायटिंगसाठी कुणाला पकडावं अशा विचारात असताना अर्थातच कॅप्टन रो हे नाव आठवलं. नाव जितक्या झटक्यात आठवलं त्याच्या दुप्पट झटक्यात मी  ते झटकलंसुद्धा! मनात विचार केला, आपल्यासारख्या कॉलेजमध्ये शिकणा:या  सामान्य विद्याथ्र्यानं एवढय़ाशा किरकोळ कामासाठी इतक्या मोठय़ा माणसाला ‘कॉपीमॅटर लिहून देता का’ असं विचारणं हे जरा अतिच होतंय! पण मग कुणीतरी सांगितलेलं आठवलं, ‘काम हे काम असतं, आणि लहानातलहान कामसुद्धा मोठं समजून करायचं असतं. तरच ते दर्जेदार होतं. कोणतंही काम फालतू नसतं, वगैरे वगैरे..’ 
- पण तरी कॅप्टनकडे जायचं धैर्य काही होईना. हे म्हणजे लक्ष्मीरोडवरच्या एखाद्या कापड दुकानदारानं एका ताग्यासाठी धीरुभाई अंबानींकडे जाण्यासारखं होतं! 
दुसरीकडे वाटत होतं, काम तर ग्रेट झालं पाहिजे, कारण काम साधंसुधं नव्हतं, प्रेस अॅड होती! माझं काम वर्तमानपत्रत छापून येणार होतं. 
मनाचा हिय्या केला. डेक्कनवरचं कॅप्टनचं घर शोधून काढलं, आणि गेलो एके दिवशी थेट घरीच!! 
विचार करत बसलो असतो तर कामही फापललं असतं, त्याबरोबर इज्जतही गेली असती वर फाके पडले असते. फी भरायची होती. थोडाफार खर्चही होता. अडीचशे रुपये छोटी अमाउंट नव्हती.
डेक्कन जिमखान्याच्या परिसरात कॅप्टनच्या त्या जुन्या पद्धतीच्या पिस्ता ग्रीन कलरच्या दोनमजली बंगल्याच्या मागच्या दारानं वरती गेलो. बाहेर उजेड असला तरी आत ठार अंधार होता. दरवाज्यावर टकटक केलं.
हँ ?
आतल्या  कोणत्यातरी खोलीतून गंभीर आवाज आला. 
मी कोण वगैरे काय ते मी बाहेरूनच सांगितलं.
ूेी कल्ल
पुन्हा गंभीर आवाज. 
अंधारातून वाट काढत कसाबसा चाचपडत आवाजाच्या दिशेनं चाहूल घेत, अंदाजानं एका खोलीत पोहोचलो. दिवस असूनही खोलीत पिवळसर उजेडाचा बल्ब लावलेला. इराण्याच्या हॉटेलमध्ये असतं तसं, पण एक भलं मोठं राउंड टेबल. त्याभोवती चारपाच अस्ताव्यस्त खुच्र्या टेबलावर कोरे, लिहिलेले कागद पसरलेले, टाइपरायटर, पत्ते, रमच्या सोडय़ाच्या बाटल्या, काचेचे ग्लास, एकदोन अॅश ट्रे, असंख्य पुस्तकं, वह्या, पेनं, पेन्सिली, पेनस्टॅण्ड, फोन, नकाशे असं अनेक वस्तूंचं कोलाज. 
 
एक देखणा माणूस एका खुर्चीवर बसून मोठय़ा डोळ्यांनी माङयाकडे बघून म्हणाला, 
‘‘हॅलो यंग मॅन. काय  पाहिजे? मी  कॅप्टन’’.
इतका देखणा मनुष्य मी त्याच्याआधी फक्त  फोटोत पाहिला होता. फोटो होता जे. कृष्णमूूर्तीचा!
धारदार नाक, पाणीदार, मोठे डोळे, नाजूक जिवणी आणि आइन्स्टाइनसारखे मोठे पांढरे केस असलेला तो माणूस मला फार आवडला. 
मंद स्मित करत होता तो माणूस.
अचानक उठला, माझा हात हातात घेतला नि मला तिथल्या एका खुर्चीवर बसवलं. हा माणूस कॅप्टन रो होता हे काही कुणी वेगळं सांगायला नको होतं.
हेच ते कॅप्टन रो.
मला हाताला धरून बसवलं होतं, आणि चेह:यावर मिश्कील भाव ठेवून कुतुहलानं माङयाकडे पहात होते, की हा कोण पोरगा आलाय आपल्याला भेटायला.
मी पुन्हा माङयाबद्दल आणि कामाबद्दल त्यांना सांगितलं आणि थेट विचारलं, ‘‘द्याल का लिहून?’’
पुढे अॅप्लाइड आर्टमधलं लोकप्रिय वाक्य बोललो, ‘‘र्अजट आहे!’’
कॅप्टन माङयाकडे बघत होते, जणू माङया बोलण्याकडे लक्ष नसून मला न्याहाळत होते. चेह::यावर मिश्कील भाव तसेच.
र्अजट आहे वगैरे बोलून मी बहुतेक गाढवपणा केला असावा. मी अज्ञानी होतो. उत्साहाच्या भरात जरा जास्तच बोललो होतो. खूप जास्त. पण अशा वेळी मला इतर दुसरं काय बोलायचं असतं, ते माहीत नव्हतं. मी आपलं तिथं येण्याचा उद्देश थेट आणि लगेचच सांगून टाकला होता. पुण्यातल्या सर्वोच्च अॅड एजन्सीशी संबंधित असलेल्या, जगातल्या जवळजवळ सर्व महत्त्वाच्या  भाषांमधनं जाहिराती करणारा तो विद्वान माणूस मला म्हणाला,
‘‘ओके माय बॉय , कम टुमारो. उद्या चालेल ना? की उशीर होईल?’’
मी खजिल झालो. भीतीनं थरथर कापू लागलो. मला वाटलं, कॅप्टन कुत्सितपणानं बोलतायत. आपलं बोलणं त्यांना आवडलेलं दिसत नाही. शरमेनं माझी मान खाली गेली, आपण जरा जास्तच बोललो, ह्याची जाणीव होऊन मी रडवेला झालो, चेह:यावर त्याच  भावनेची ङोरॉक्स  उमटली. 
कॅप्टन उठून उभे राहिले. माङया खांद्यावर प्रेमानं हात ठेवून मऊ आवाजात म्हणाले,
‘‘नो, नो, माय बॉय, डोण्ट क्राय. आय अॅम सीरियस. खरंच ये तू उद्या, देतो तुला लिहून.’’
(क्रमश:)
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)