शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटकांना खुणावतेय झाडीपट्टीचे सौंदर्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 13:14 IST

वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात.

ठळक मुद्देनिसर्गसंपन्न भंडारा जिल्ह्यात पर्यटनाची संधी

ज्ञानेश्वर मुंदे

भंडारा:वैनगंगेच्या पावन स्पर्शाने सुपीक झालेला भंडारा जिल्हा निसर्ग संपन्न आहे. वनसंपती, वन्यजीव, ऐतीहासिक स्थळांसोबतच गावागावांतील तलाव पर्यटकांना खुणावतात. कोकणचा तोडीचा निसर्ग एकदा अनुभवला की येथील अप्रतिम सौंदर्याच्या प्रेमात कुणीही पडल्याशिवाय राहणार नाही. निसर्गाने मुक्तहस्त उधळण केलेला हा परिसर म्हणजे झाडीपट्टीचे खरे सौंदर्य.भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा जिल्ह्यात सम्राट अशोकाचे वास्तव्य होते. आजही पवनीत अशोककालीन अवशेष आढळून येतात. गोंड राजे बक्त बुलंदशाह यांनी १७०० मध्ये बांधलेला अंबागड किल्ला गत वैभवाचे साक्ष देतो. भंडारा शहरातील सध्या जिल्हा कारागृह असलेला किल्ला ही तेवढाच अभेद्य आहे. गोंडवाणा म्हणून पुर्वी ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशाला झाडीपट्टी म्हणून ओळखले जाते.साहित्य आणि संस्कृतीचा अनमोल ठेवा असलेला भंडारा जिल्हा निसर्ग समृध्दीने नटलेला आहे. झाडीपट्टीचा परिसर अतिशय विलोभनीय आणि मनाला भुरळ घालणारा आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वतमाला त्यात गायमुख, चांदपूर, गायखोरी डोंगराचा समावेश आहे. सातपुड्याची हिरवीगार किमया, घनदाट वनश्रीचा गालीचा, खळखळणाºया नद्या आणि शांत जलाशय येथील निसर्ग सौंदर्यात भर घालतात. पावसाळ्याच्या दिवसात तर निसर्ग बहरून येतो. अशा या भंडारा जिल्ह्याच्या सौंदर्याची अनेकांना भुरळ पडली आहे. देश विदेशातील पर्यटक पर्यटनासाठी येतात. मात्र सुविधा नसल्याने पर्यटनाचा विकास रखडला आहे. भंडारा जिल्ह्यातील तलावांचा उपयोग जल पर्यटनासाठी केला जाऊ शकतो. भंडारापासून हाकेचा अंतरावर असलेला रावणवाडी तलाव आता शुटींग पॉर्इंट झाला आहे. पुण्या-मुंबईतील चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक याठिकाणी येऊन चित्रीकरण करतात. यासोबतच जिल्ह्यात बंदरझरा, नागझिरा, हत्तीडोह असे अनेक तलाव असून या तालवाचा विकास केल्यास जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी संधी मिळू शकते.

टॅग्स :tourismपर्यटन