शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

फसव्या मेल, कॉल्सपासून सावधान

By admin | Updated: October 8, 2016 14:10 IST

परदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा!

US VISA मदत खिडकी : पाचपरदेश प्रवास आणि तोही अमेरिकेचा प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येऊन बरेच दिवस लोटले. शिक्षणापासून पर्यटन आणि नोकरीपर्यंत अनेक कारणांनी अमेरिकेला जाऊ इच्छिणाऱ्यांच्या मार्गातला प्रमुख प्रश्न म्हणजे अमेरिकेचे प्रवेशपत्र : व्हिसा! - याबाबतीतल्या प्रश्नांचे निराकरण करणारा हा विशेष पाक्षिक स्तंभ मुंबईतील अमेरिकन वकिलातीच्या सहकार्याने!अमेरिकेतल्या एका कंपनीकडून मला एक ईमेल आला आहे. ही कंपनी मला नोकरी देऊ करते आहे, पण व्हिसाची प्रोसेस करण्यासाठी कंपनी माझ्याकडून मोठी फी मागत आहे. व्हिसा लवकर मिळण्यासाठी जादा फी द्यावी लागते का?- अजिबात नाही. मुळात अशी आॅफर करणं हेच कायद्याच्या विरुद्ध आहे. हल्ली असे फसवे मेल येण्याचं प्रमाण खूपच वाढलं आहे. हे संशयास्पद ईमेल अशा प्रकारच्या ‘आॅफर’ देतात की त्या जणू खऱ्याच वाटाव्यात. पण अशा फसव्या मेल्सना बळी पडू नये.खरंतर काही मूलभूत गोष्टींकडे बारकाईनं लक्ष पुरवलं तर जादा पैशांच्या मोबदल्यात पटकन व्हिसा देऊ करणारे ईमेल कसे खोटे आहेत हे पटकन ओळखता येतं. व्हिसाच्या बाबतीत पहिला नियम म्हणजे ज्या व्यक्तीने व्हिसासाठी अर्ज केला आहे, त्याला व्हिसा मिळण्याआधी वकिलातीत स्वत: मुलाखतीला यावं लागतं. या नियमाला बगल देताच येत नाही. तरीही कोणी ईमेल करून जादा पैसे भरा आणि व्हिसा पटकन मिळवा असं म्हणत असेल तर ती शुद्ध फसवणूक आहे. दुसरा नियम म्हणजे मुलाखतीच्या आधीच आपल्याला व्हिसा मिळेल अशी खात्री अमेरिका दूतावासातील किंवा वकिलातीतील कोणीही, कोणत्याही परिस्थितीत देऊ शकत नाही. अशी खात्री जर कोणी ठामठोकपणे देत असेल तर ती फसवणूक आहे, यात काहीतरी गडबड नक्कीच आहे असे समजा.सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे अमेरिकेच्या व्हिसासाठीची फी ही अमेरिकी सरकार ठरवत असते. व्हिसाच्या वर्गीकरणानुसार ती फी ठरत असते. आणि त्यात लवकरात लवकर व्हिसा मिळण्यासाठी अमुक तमुक जादा फी अशी कोणतीही तरतूद नसते. अमेरिकेच्या व्हिसासाठीची फी, ती फी भरण्याची पद्धत याविषयीची माहिती आॅनलाइनही मिळते. ttp://www.ustraveldocs.com/in/. या वेबसाइटवर ही माहिती मिळू शकते. जे नियम फसव्या ईमेलच्या बाबतीत लागू पडतात तेच नियम फसव्या फोन कॉल्सलाही लागू पडतात. जो कोणी फोन करून स्वत:ला अमेरिकेच्या दूतावासातून किंवा वकिलातीतून बोलतो आहे असं म्ह्णून जलद व्हिसा मिळण्यासाठी अमुक एक रक्कम भरा असं म्हणत असेल तर ती आपली फसवणूक करते आहे हे लक्षात घ्या. कोणी असे फोन करीत असेल किंवा मुख्य प्रकिया डावलून काहीतरी फसवे दावे कोणी करत असेल तर त्यांच्याविरुद्ध सरळ स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवा. त्या एफआयआरची प्रत मुंबई येथील अमेरिकी वकिलातीला खालील आयडीवर मेल करा. mumbai_visa_fraud@state.gov
अधिक माहितीसाठी वेबसाइट : 
 
http://www.ustraveldocs.com/in
 
व्हिसासंबंधी प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल :
 
support-india@ustraveldocs.com