शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Bageshwar Maharaj: ‘स्मार्ट बाबा’ची उठाठेव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 13:16 IST

Bageshwar Maharaj: प्रत्येक गोष्ट विवेक व विज्ञानाच्या कसोटीवर घासून घेण्याच्या युगातही देशात साधू-महंतांचे गारुड कायम आहे. त्यामुळेच मध्य प्रदेशातील धीरेंद्र कृष्णशास्त्री गर्ग ऊर्फ बागेश्वर बाबांची जोरदार चर्चा आहे. 26 वर्षांच्या बाबांचा दबदबा इतका की दरबारासाठी छतरपूरमध्ये मंगळवार व शनिवारी चेन खेचून रेल्वे थांबवल्या जातात.

-  गणेश देवकर (मुख्य उपसंपादक)खजुराहो मंदिरापासून ३५ किलोमीटरवर गढा हे त्यांचे गाव. आईचे नाव सरोज, तर वडिलांचे नाव रामकृपाल. हे थोरले, आणखी एक भाऊ आणि बहीण. घरची गरिबी. शाळा आठवीतच सुटलेली. चंदलाचे माजी आमदार आर. डी. प्रजापती सांगतात, इथे शंकर मंदिराच्या बाजूला हनुमानाची मूर्ती होती. तिथे धीरेंद्र यांचे वडील पूजापाठ करीत. घरदार नव्हते, जवळच्या समाजमंदिरात राहात. हळूहळू त्यांनी तिथे दरबार भरवणे सुरू केले. वर्गमित्र सांगतो, ‘तो अचानक एक वर्ष गायब झाला, परतला तेव्हा बदलला होता. पाच वर्षांपूर्वी सायकल, बाइकवर फिरायचा.’ आता चित्र वेगळे आहे. बाबा खासगी विमानाने फिरतात, ते निघाले की मागे-पुढे डझनभर गाड्यांचा काफीला चालतो.

लोकप्रियतेसाठी बाबांनी सोशल मीडियाचा खुबीने वापर केला आहे. त्यांचे ३७ लाख फॉलोअर्स आणि ५४ कोटींहून अधिक सब्सस्क्रायबर्स आहेत. फेसबुकवर धामचे ३० लाख, ट्विटरवर ६० हजार, तर इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. रोज १० ते १५ हजार भक्त धामला येतात. बाबांच्या दर्शनासाठी दीड-दोन लाख लोक येतात. ऑनलाइन टोकन मिळालेल्यांना प्रवेश दिला जातो. गढा गाव आणि परिसरात दुकाने, हॉटेल्स वाढून जमिनीला सोन्याचे दर आले आहेत. गावचा तलाव आणि स्मशानभूमीवर बाबांनी कब्जा केल्याचा आरोप स्थानिक करतात. बाबांच्या दरबारात अनेक बड्या राजकीय नेत्यांनी हजेरी लावली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या श्याम मानव यांनी बाबांना जनतेसमोर चमत्कार दाखवण्याचे आव्हान दिले होते. यानंतर बाबांचा बोलबाला आणखी वाढला. नेताजी म्हणाले होते, ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’, मी म्हणतो, ‘तुम मेरा साथ दो, हम हिंदू राष्ट्र बनायेंगे’, असे ते बोलत आहेत. ‘आता बांगड्या भरून घरात बसू नका, हा बागेश्वर धामवर हल्ला नव्हे तर प्रत्येक सनातन्यावर आहे,’ ही लाइन बाबांनी हुशारीने धरली.

कथावाचक जया किशोरी यांच्याशी लग्नाची अफवाबाबा आणि आध्यात्मिक व्याख्याने देणाऱ्या जया किशोरी यांच्या लग्नाची अफवा उडाली. ही पसरवणाऱ्यांवर कारवाईचा त्यांनी इशाराही दिला. सध्यातरी लग्नाचा विचार नाही; पण जेव्हा लग्न करेल, तेव्हा ते वाजतगाजत करेन, असे ते सांगतात. जया किशोरी सोशल मीडियावर चांगल्याच प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यांचा जन्म राजस्थानमध्ये १३ जुलै १९९५ रोजी झालेला आहे. ९व्या वर्षापासून त्या कथावाचन करतात. त्या बी. कॉम. झालेल्या आहेत.

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धाम