शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

रंगभूमीवरील अजब रसायन

By admin | Updated: October 31, 2015 14:41 IST

दिग्दर्शन असो की अभिनय, बाईंचं सगळंच काम नेटकं, शिस्तशीर आणि त्यावर पुरेपूर मेहनत घेतलेली. त्यांची कमाल ही की, आपल्याला न आवडलेल्या नाटकांतही तितकंच उत्तम काम करण्याची त्यांची क्षमता!

दिग्दर्शन, अभिनय करताना, 
रंगभूमीवर आविष्कृत होत असताना, 
विजयाबरईनी स्वत:बरोबरच 
अनेकांना घडवलं.
इतकं की रंगभूमीवर त्यांचं स्वत:चं 
एक ‘घराणं’च तयार झालं.
आजही अनेक जण या घराण्याचा वारसा मोठय़ा अभिमानानं मिरवतात.
नाटककाराच्या प्रत्येक शब्द 
आणि विरामाला न्याय देताना, 
कलाकाराला ‘जिवंत’ करताना 
प्रत्येक संहितेचं त्यांनी सोनं केलं.
विजयाबाई मेहता नावाचं हे घराणं 
आता ऐंशीत पोहोचलंय. 
त्यानिमित्त..
 
राठीच नव्हे तर भारतीय रंगभूमीवरचं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्त्व विजया मेहता़ आमच्या विजयाबाई़ अभिनय, दिग्दर्शन, नाटय़प्रशिक्षण यांचा वस्तुपाठ़ विजयाबाईंचं नाव मी कधी ऐकलं आठवत नाही; पण समजायला लागल्यापासून त्या माङयासोबत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या आहेत़ आई-बाबांची मैत्रीण म्हणून आणि मुख्य म्हणजे रंगकर्मी म्हणूऩ विजयाबाईंचं नाव ऐकल्यापासून मनात एकच भावना होती- आदऱ आणि या आदरातून निर्माण झालेलं कुतूहल़ ‘सुंदर मी होणार’मधलं बाईंचं काम पुसटसं आठवत होतं; पण ‘संध्याछाया’, ‘अखेरचा सवाल’पासून पुढचं सगळं अगदी व्यवस्थित आठवतंय़ ‘अखेरचा सवाल’ या नाटकाच्या तालमींना मी कधीकधी जायचो़ विजयाबाईंनी डॉ़ मुक्ताची भूमिका अतिशय छान वठवली होती़ विजयाबाई, भक्ती बव्रे आणि मधुकर तोरडमल यांची उत्तम कामं हे त्या नाटकाचं वैशिष्टय़ होतं़ माङया बाबांनी दिग्दर्शित केलेलं कानेटकरांचं नाटक़ मला तेव्हा ते नाटक आवडलं नव्हतं, आजही फ ारसं आवडत नाही़ मला ते नाटक खूपच सेंटिमेंटल वाटतं़ अर्थात ही अगदी वैयक्तिक प्रतिक्रिया आह़े मला नंतर कळलं की, विजयाबाईंचं ‘अखेरचा सवाल’विषयीचं मत माङयासारखंच होतं़ मला हे कळल्यावर आश्चर्य वाटलं ते याचं की, नाटक न आवडूनसुद्धा बाई इतकं चांगलं काम कसं करू शकल्या?. विजयाबाईंची पूर्वी आवडलेली आणि आजही स्मरणात राहिलेली भूमिका म्हणजे ‘संध्याछाया’मधली नानी़ बाई आणि आमचे माधवराव वाटव़े त्या दोघांची कामं म्हणजे कमाल होती़ मला बाईंची कमाल वाटते ती यासाठी की, आपल्याला आवडलेल्या आणि न आवडलेल्या नाटकात तितकंच चांगलं काम करण्याची क्षमता़! 
बाईंची हळूहळू ओळख व्हायला लागल्यावर लक्षात यायला लागलं ते असं, एखादं काम हातात घेतल्यावर पूर्ण एकाग्रतेने, शिस्तीने आणि मेहनत घेऊन तडीला न्यायच़े बाईंसारखी माणसं रंगभूमीवर संख्येने जास्त असणं गरजेचं आह़े मला तेव्हा आणि त्यानंतरही अभिनेत्री विजया मेहतांनी कायम प्रभावित केलं आह़े बाई स्वत:ला अभिनेत्री - दिग्दर्शिका म्हणतात ते अगदी खरं आह़े 
‘अजब न्याय वतरुळाचा’, ‘बॅरिस्टर’, ‘मुद्राराक्षस’, ‘जास्वंदी’, ‘महासागर’, ‘हमीदाबाईची कोठी’ अशी एकापेक्षा एक सरस नाटकं बाईंनी दिग्दर्शित केली़ रंगायनच्या काळात वेगवेगळे प्रयोग करून पाहणारी दिग्दर्शिका़ लोकमान्य रंगभूमीवरसुद्धा (बाई व्यावसायिक रंगभूमीला लोकमान्य रंगभूमी म्हणतात) आपल्या वेगळेपणामुळे लोकप्रिय झाल्या होत्या़ मला बाईंचं कौतुक आणखी एका कारणासाठी वाटत होतं़ त्यांनी त्यांना पटलेल्या नाटकांचंच दिग्दर्शन केलं़ त्यांची काही नाटकं फसलीसद्धा़ बाई दिलखुलासपणो त्याही नाटकांवर बोलतात; पण त्या फ सलेल्या नाटकांची जबाबदारी मात्र झटकत नाहीत़ बाई त्यांच्या फसलेल्या नाटकांमधूनही खूप काही शिकत असाव्यात़ मला जाणवत होतं ते बाईंचं त्या सादर करीत असलेल्या कलेवरचं प्रेम़ बाईंबरोबर काम करण्याची इच्छा प्रबळ होती; पण संधी मिळत नव्हती़ बाईंची नाटकं इतरांच्या नाटकांपेक्षा वेगळी का असतात? प्रयोगात इतकी शिस्त कशी असते? त्यांच्या वास्तववादी नाटकात पात्रं त्यांच्या वृत्तीसकट उभी राहतात़ ती रंगमंचावर फ ारशा हालचाली करत नाहीत़ प्रेक्षक म्हणून नाटक बघताना ते कुठेही खटकत नाही़ किंबहुना, हालचालींची आवश्यकताच वाटत नाही़ बाई हे कसं साधतात? बाईंच्या नाटकातली पात्रं प्रेक्षकांकडे उगाचच बघून बोलत नाहीत़ हे आणि अशा अनेक गोष्टी़ मी जेवढी बाईंची नाटकं पाहिली त्यात दिग्दर्शिका असुरक्षित असल्याचं कुठेही जाणवत नाही़ मी नाटक दिग्दर्शित करताना अस्वस्थ होऊन अनावश्यक, बेतलेल्या हालचाली माङया अभिनेत्यांकडून करवतो़ बाईंचं असं कधीच झाल्याचं मला आठवत नाही़ याचं कारण बाईंना त्यांच्या नाटकातली पात्रं त्यांच्या स्वभावविशेषांसकट दिसतात़ मला वास्तववादी नाटकाच्या दिवाणखान्यात वावरणारी माणसं दिसतात़ त्यामुळे हालचाली आधी दिसतात आणि मग त्यातून व्यक्तिरेखा उभ्या राहतात़ बाईंशी चर्चा करताना याचं उत्तर मिळालं़ त्यांना प्रतिमा दिसतात आणि त्यातून त्या नाटक उभं करीत जातात़ बाईंशी चर्चा केल्यावर त्या काय म्हणताहेत ते समजलं; पण प्रत्यक्षात नाटक दिग्दर्शित करताना हे जमत नाही़ ‘मूर्त ते अमूर्त’ हा बाईंचा होणारा प्रवास इतका वैयक्तिक सजर्नशीलतेतून येतो, त्यामुळेच त्यांच्या शिष्यांनाही हे जमतंच असं नाही़ दिल्लीच्या श्रीराम सेंटरमध्ये मी दिग्दर्शित केलेल्या ‘ऐन वसंतात अध्र्या रात्री’ या नाटकाचा प्रयोग बघायला बाई आल्या होत्या़ मला विशेष आनंद झाला होता; कारण बाई पहिल्यांदाच माझं नाटक बघायला आल्या होत्या़ बाई पहिल्या रांगेत बसल्या होत्या़ मध्यंतरात स्टेजवर आल्या आणि मला म्हणाल्या, ‘अरे, नव्वद टक्केप्रेक्षकांना तुझं नाटक आवडतंय़ मी उरलेल्या दहा टक्क्यांमध्ये आह़े मुंबईत आलास की मला फोन कर, आपण बोलू.’ मी थोडासा नव्र्हस झालो़ मुंबईत येऊन बाईंना फ ोन केल्यावर त्यांनी गमतीशीर प्रतिक्रिया दिली़ त्या म्हणाल्या, ‘अरे, नाटकात थोडे गोंधळ होते; पण मला सांग, तुला वीस-पंचवीस तरुण मुलं मिळाली कुठून? मी गिरीश कर्नाडचं ‘नागमंडल’ करतेय़ मला जरा अॅक्टर्स मिळवायला मदत करशील?’ थोडक्यात काय, तर माझं नाटक बघत असतानाच त्यांना त्यांचं नाटक दिसायला लागलं असावं़ त्यामुळे माझं नाटक बघायला त्या प्रेक्षक म्हणून पूर्णपणो नाटकात गुंतू शकल्या नसाव्यात़ मी थोडासा नाराज झालो; कारण मला बाईंकडून अधिक सविस्तर प्रतिक्रियेची अपेक्षा होती़ माझं उत्तर नंतर मी शोधलं़ माझं नाटक सविस्तर प्रतिक्रिया देण्याच्या योग्यतेचं नसावं़ म्हणजे बाईंना खूश करायचं असेल तर याहून चांगलं काहीतरी करायला हवं़ 
विजयाबाई सहसा कुणाची नाटकं बघायला जात नाहीत़ बाईंनी नाटकं बघायला हवीत, असं माझं मत आहे; कारण त्या अतिशय उत्तम प्रेक्षक आहेत़ नाटकावर त्या नेमकेपणाने प्रतिक्रिया देतात़ मी हे सांगू शकतो; कारण मी त्यांना त्यांनी पाहिलेल्या नाटकांवर बोलताना ऐकलं आह़े बाई स्वत:च्या नाटकावर बोलतात, तेव्हाही प्रेक्षक परिणामकारक बोलताना, त्या प्रेक्षक होऊन जातात़ बाईंनी ‘ऐन वसंतात’नंतर माझी ‘नकळत सारे घडले’, ‘मित्र’ आणि ‘वा गुरू!’ ही तीन नाटकं पाहिली आणि त्यांना ‘लगAबंबाळ’ बघायचं आह़े मी स्वत:ला नशीबवान समजतो की, बाईंनी माझी इतकी नाटकं पाहिली़ प्रत्येक नाटकावर मला सविस्तर प्रतिक्रियासुद्धा दिली़ बाईंशी नाटकावर चर्चा करताना तुम्हाला नवीन काहीतरी मिळतंच़ बाईंना तसं सांगितल्यावर त्या नेहमी म्हणतात, ‘मग? हुशारच आहे मी’ आणि दिलखुलास हसतात़ ‘नकळत सारे घडले’ हे बाईंना अजिबात न आवडलेलं नाटक़ त्या मला म्हणाल्या, ‘कसं रे हे नाटक? सगळं ठरवलेलं, खोटं खोटं वाटतं़ नाटकाच्या रचनेत गडबड आह़े तू का केलंस हे नाटक?. 
‘मित्र’ नाटकाला आल्या आणि म्हणाल्या, ‘अशी काय रे रचना तुङया नाटकाची? स्क्रीन प्ले वाटतो, नाटक नाही़’ मी म्हटलं, ‘बाई, आपण एकदा नाटकाच्या संरचनेवर बोलू़’ त्या म्हणाल्या, ‘बोलू रे.’ पण, एका प्रवेशाचा परिणाम होण्यापूर्वीच काळोख होतो आणि पुढचा प्रवेश सुरू होतो़ त्यामुळे नाटकाचे खूप तुकडे पडतात़ 
‘वा गुरू!’ बघायला आल्या़ माङया पोटात गोळा होता़ प्रयोग बघून झाल्यावर मला फ ोन केला आणि म्हणाल्या, ‘तुङया नाटकात प्रा़ सप्रेंना स्टेजवर न मारण्याची आयडिया कुणाची?’ मी म्हटलं, ‘माङया किंवा लेखकाच्या मनात हा विचारच आला नाही की सप्रे सरांचा मृत्यू स्टेजवर दाखवावा़’ त्या म्हणाल्या, ‘तुझं आणि लेखकाचं अभिनंदऩ सप्रे सरांचा मृत्यू स्टेजवर न दाखवल्यामुळे तुझं नाटक भावनोत्कट झालं, भावनाविवश नाही आणि म्हणूनच ते मला आवडलं़’ मी खरंच खूप खुश झालो़ बाईंना नाटक आवडलं म्हणून; पण नाटक आवडल्याची प्रतिक्रिया देण्यातही नेमकेपणा होता़ नेमकेपणा त्यांच्या नाटकांमध्ये दिसायचा आणि म्हणूनच ती नाटकं इतर नाटकांपेक्षा वेगळी वाटायची़
 
 विजयाबाईंबरोबर काम करण्याची संधी एकदाच मिळाली़ ‘लाइफ  लाइन’ या सिरियलमध़े मी सिरियलमधे काम केलं आणि बाईंचा असिस्टंटपण होतो- सुरुवातीचे तेरा भाग़ बाई अॅक्टर्सवर काम करायच्या़ खूप नावाजलेले अॅक्टर्स त्या सिरियलमधे काम करीत होत़े बाई ज्या पद्धतीने प्रत्येकाकडून काम करवून घ्यायच्या ते बघण्यासारखं असायचं़ मी त्या काळात खूप कनफ्युज्ड असायचो़ माझं असायला हवं तितकं कामात लक्ष नसायचं़ बाईंच्या ते बरोबर लक्षात यायचं़ बाईंनी बोलता बोलता माङया बाबांना सांगितलं होतं, ‘विजय काय करणार आहे रे पुढे? त्याचं कामात लक्ष नसतं.’ मला जबाबदारीची कामं देणं हळूहळू बंद केलं बाईंनी़ आणि दुस:या शेडय़ुलला मला असिस्टंट म्हणूनही बाजूला केलं़ आमचं वेस्टर्न आउटडोअरला डबिंग असायचं़ मला तेव्हा युनियन बँकेत नोकरी मिळत होती़ मी बाईंना म्हटलं, ‘मला नोकरी लागते आह़े’ क्षणाचाही विलंब न करता बाई म्हणाल्या, ‘कर कऱ नोकरी सोडू नकोस.’बाईंना काय म्हणायचं होतं ते माङया लक्षात आलं़ बाईंच्या बरोबर काम करण्याची संधी मिळूनही मी तिचा हवा तितका फायदा करून घेतला नाही़ आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या काहीतरी शिकवत असतात़ बाईंनी मला अप्रत्यक्षरीत्या खूप काही शिकवलं आहे; पण प्रत्यक्ष काम करताना त्यांनी माङयावर दाखवलेला अविश्वास, मला माङया एकूण प्रवासाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा वाटतो़ कलेच्या क्षेत्रत काम करीत राहण्याची शक्ती त्या अविश्वासाने मला दिली, असं आता मागे वळून बघताना वाटतं़ बाईंसारखी आपल्या कर्तृत्वाने आदर्श होणारी माणसं आजूबाजूला असण्याचे खूप फायदे असतात़ नंतरच्या काळात म्हणजे बाई एनसीपीएत गेल्यानंतर आमचे संबंध वाढल़े थोडक्यात काय, तर बाईंनी नाटय़दिग्दर्शन आणि अभिनय करायचं जवळजवळ बंद केल्यानंतर आमच्या गाठीभेटी जास्त व्हायला लागल्या़ मी एनसीपीएच्या तारखा वाटप कमिटीवर होतो़ त्यामुळे बाईंची भेट व्हायची़ नाटय़विषयक चर्चा व्हायची़ आता तर मी बाईंच्या फोनची वाटच बघतो़ त्या हक्काने मला सांगतात, माङयाबरोबर दिल्लीला एनएसडीत चल कम्पॅनियन म्हणूऩ किंवा त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मला बोलावतात़ मला खूप आनंद होतो़ बाई प्रत्यक्ष कार्यरत होत्या तेव्हा त्यांच्याबरोबर नाटकात काम करायला मिळालं नाही, याचं दु:ख आहे; पण ज्या विजयवर त्यांचा विश्वास नव्हता त्याला आज बरोबर काम करायला त्या बोलावतात याचा आनंद खूप मोठा आहे - कुठल्याही पारितोषिकापेक्षा़माङो बाबा आणि विजयाबाई यांच्या मैत्रीमुळे बाई माङया आयुष्यात आल्या़ आज त्या मैत्रीच्या हक्काने त्या मला हाक मारतात़ मी त्या हाकेला ‘ओ’ देतो़ मला जमेल तितकं त्यांच्या सान्निध्यात राहून माझी नाटय़विषयक समज वाढवायचा प्रयत्न करतो़ बाई यापुढे नाटक दिग्दर्शित करतील असं मला वाटत नाही; पण त्या नाटय़ प्रशिक्षण शिबिरं घेऊ शकतात़ ती बाईंनी घ्यावीत़ मदत करायला माङयासारखे खूप लोक तयार होतील; कारण नाटक ही आयुष्यभर शिकत राहण्याची गोष्ट आहे, असं माझं मत आह़े बाईंबद्दल माङया खूप तक्रारी आहेत़ त्यांनी नाटकांसाठी असं करायला हवं होतं, तसं करायला हवं होतं, असं मी नेहमी म्हणत असतो; पण त्या समोर आल्यावर त्यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वामुळे या सर्व तक्रारी विरून जातात आणि मी श्रवणभक्ती करायला लागतो़ असा चार्म आहे आमच्या बाईंचा़ 
विजयाबाई जेव्हा कुणालाही पत्र पाठवतात तेव्हा त्या विजया मेहता, अशी सही करतात; पण काही पत्रंवर मात्र त्या ‘बाई’ एवढंच लिहितात़ ती माणसं बाईंच्या जवळची असतात़ 
मला येणा:या सर्व पत्रंवर ‘बाई’ एवढंच लिहिलेलं असतं़ आमचे संबंध असेच राहावेत़.
(लेखक प्रसिद्ध नाटय़दिग्दर्शक आहेत.)