शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

ART TAKES COURAGE

By admin | Updated: June 21, 2015 13:05 IST

समाजात इच्छा रुजवण्याची क्षमता सिनेमामध्ये असते. बहुसंख्याकांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षाही कलेची ही अमूर्त ताकद अधिक परिणामकारी असते, हे बहुधा निवड समितीला कळलेले नाही

धम्मकीर्ती सुमंत

 
समाजात इच्छा रुजवण्याची क्षमता सिनेमामध्ये असते. बहुसंख्याकांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षाही कलेची ही अमूर्त ताकद अधिक परिणामकारी असते, हे बहुधा निवड समितीला कळलेले नाही आणि कळले असूनही हे पाऊल उचलले गेले असेल, तर मग हा उपहास आहे, असेच म्हणावे लागेल.
------------
‘जगत को किस वस्तू ने ढक रखा है?’ या यक्षाच्या प्रश्नाला ‘अज्ञान’ असे मानभावीे उत्तर देणारे, ‘आलस्य क्या है?’ ह्या यक्षाच्या प्रश्नाला ‘धर्म न करना आलस्य है’ असे उत्तर देणारे, महाभारत नावाच्या मालिकेत युधिष्ठिर हे पात्र गाजवणारे, त्यानंतर लगेचच्याच वर्षात ‘खुली खिडकी’ नामक एका सिनेमात तत्कालीन अभिलाषा या गाजलेल्या अभिनेत्रीबरोबर काम करणारे गजेंद्र चौहान यांची निवड  ‘फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया’च्या अध्यक्षपदी झालेली आहे. 
 सुरुवातीलाच नमूद करतो, इन्स्टिटय़ूटचा माजी विद्यार्थी म्हणून, नाटककार म्हणून आणि भारतासारख्या सिनेमाप्रेमी देशाचा नागरिक म्हणून मी सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध करतो. निवड झाल्याबरोबर गेला आठवडाभर या मुद्दय़ावर ‘एफटीआयआय’च्या विद्यार्थी संघटनेने अनिश्चित संप केलेला आहे. लेख छापून येईपर्यंत परिस्थिती बदलावी अशी इच्छा आहे. (फेसबुकवर ‘विस्डम ट्री’ नावाच्या पेजवर पोस्ट केलेल्या आनंद पटवर्धन, फरिदा मेहता, ओम पुरी, आनंद गांधी, एम. के. रैना, गिरीश कासारवल्ली यांच्या म्हणण्याशी मीही सहमत आहे.) शिक्षणासकट सा:याच व्यवस्थेचे भगवीकरण,  चौहानांची अपात्रता, निवड समितीतील ‘दुर्लक्षा’चे राजकारण, फिल्म इन्स्टिटय़ूटचे माजी अध्यक्ष आणि आताचे अध्यक्ष यामधील गुणात्मक दरी या मुद्दय़ांवर आतापर्यंत ब:यापैकी भाष्य झाले आहे. त्यामुळेच संपाला पाठिंबा देत मी माङया मुख्य मुद्दय़ावर येतो.  
  इन्स्टिटय़ूटमध्ये आणि नवीन हॉस्टेलमध्ये एक भयानक रहदारीचा रस्ता आहे, जो मला कायम रिअॅलिटी चेक वाटतो. तो क्रॉस करून तुम्ही हॉस्टेल किंवा  इन्स्टिटय़ूट असे कुठेही गेलात तरी भयानक कोलाहलाच्या विखारी सत्यातून एका स्वप्नात गेल्याचा अनुभव येतो. 
ऐतिहासिकदृष्टय़ा कलेच्या संस्था या कायमच आहेरे वर्गाचे प्रतिनिधित्व करणा:या संस्था मानल्या जात होत्या. वस्तुसंग्रहालये, कलासंस्था या सार्वजनिक अवकाशात (म्हणजे सर्वच वर्गासाठी) खुल्या असायच्या. आहेरे वर्गाची नाळ समाजातल्या सर्वच स्तरांशी जोडलेली आहे असे दाखवण्याचा तो एक पुरावा होता. लोकशाही व्यवस्थेत आणि आहेरे-नाहीरे वर्गात स्पष्ट दरी असताना, सार्वजनिक अवकाश नावाची गोष्ट तशी पुष्कळच सरमिसळीची, एकाच चेह:या-स्वभावाची अशी होती. (अशाच काहीशा काळात फिल्म इन्स्टिटय़ूटची स्थापना झाली.) त्यामुळे आहेरे वर्ग आणि तो अस्तित्वात असलेला विशिष्ट सामाजिक अवकाश यांच्यात एक थेट ताण होता. (कलासंस्था आणि समाज असा.)
नंतर मात्र परिस्थिती बदलत गेली. ‘कला’ नावाच्या गोष्टीची व्याख्या बदलली, कलेची साधने बदलली, कशाला कला म्हणायचे ही व्याख्याही बदलत गेली, तसेच कलासंस्थाही बदलत गेल्या.
आणि आता तर सार्वजनिक अवकाश नावाच्या गोष्टीला एक सरसकट संबोधन वापरणोही अवघड झाले आहे. या एकाच अवकाशात निरनिराळे अवकाश आता तयार झाले आहेत. 
वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर ‘माय नेम इज खान’ बघणा:या लोकांचा एक सार्वजनिक अवकाश असतो, ‘इश्कीया’ बघणा:यांचा एक सार्वजनिक अवकाश असतो, ‘शिप ऑफ थिसीयस’ बघणा:यांचा एक वेगळा अवकाश, त्याचवेळी नैनसुख (अमित दत्ता) बघणारेही असतात. 
- बरं, या निरनिराळ्या अवकाशांना एकमेकांविषयी काहीच पडलेलं नसतं असंही नाही; पण त्यांच्यात फार संवाद असतो, देणं-घेणं असतं असंही नाही. हे वेगवेगळे अवकाश एकमेकात मिसळतातदेखील. 
अशा एका विखंडीत वास्तवात, फिल्म इन्स्टिटय़ूट  पुणो शहराच्या मध्यात उभी आहे. मागे टेकडी, टेकडीच्या एका बाजूला झोपडपट्टी, बाजूला प्रभात रोड आणि नदीपलीकडे पाच किलोमीटरच्या अंतरावर प्यासा बार, बुधवारपेठ. थोडे अधिक पुढे गेले तर डाव्या हाताला स्टारबक्स आणि मॉल्सची गर्दी झालेला फग्यरुसन रोड आणि मग केपी. 
‘ही शहराच्या मध्यातली माणसं थोडी वेगळी - जराशी सटकलेली आहेत.’  - इन्स्टिटय़ूटविषयी ही अशी भावना  इन्स्टिटय़ूट-शेजारच्या हॉटेल्ससकट थेट अगदी पोलिसांपर्यंत आहे.
मात्र या सगळ्याच जागा, हे सगळेच प्रवाह, फिल्म  इन्स्टिटय़ूटसारख्या कलाशिक्षण देणा:या संस्थेमध्ये एकमेकांबरोबर घुसळत असतात. इथे ‘फिल्म’ बनत असते, जी अनेकदा कलाबाह्य लोकांवर केली जाते. इथे निर्माण होणा:या कलाकृती कलाक्षेत्रशी निगडित नसणा:या लोकांना दाखवणोही गरजेचे असते. ते प्रत्यक्षात होत जरी कमी प्रमाणात असले, तरी त्यावर विचार होतो. त्यासाठी विद्याथ्र्याना घडवलेही जाते. त्यामुळे अर्थकारण, समाजकारण, व्यवस्थापन, तत्त्वज्ञान या सगळ्यांचेच इथे शिक्षण दिले जात असते.  
एका बाजूला कबीर कला मंच या उदार मतवादी संघटनेला नक्षलवादी ठरवले गेले म्हणून फिल्म  इन्स्टिटय़ूटमधली मुले त्यांच्या बाजूने उभी राहिलेली दिसतात. त्यासाठी त्यांना अभाविपसारख्या संस्थेतर्फे झालेल्या हिंसेलाही सामोरे जावे लागते. त्याविरुद्धचा त्यांचा निषेध यशस्वीही होतो. साधारण त्याच वेळी त्याच वर्षी 31 डिसेंबरची पार्टी लांबते आणि तक्रार थेट पोलिसांत जाते.
- हा अंतर्विरोध इन्स्टिटय़ूटमधल्या विद्याथ्र्याना आणि त्या विद्याथ्र्याकडे प्राणिसंग्रहालयातल्या प्राण्यांना पाहिल्यासारखे बघणा:या बाहेरच्या लोकांनाही पचवणो अवघड जाते. 
आणि मग हे सारे जिथे घडते, त्या शहराची स्वत:च्याच हातात रिमोट असलेला ह्युमन बॉम्ब झाल्यासारखी अवस्था होते. 
ह्या अंतर्विरोधाचा फायदा आता सत्तेत असलेले सत्ताधीश, सरकारी लोक करून घेतात आणि पूर्वी कधीतरी घडलेल्या घटना उकरून काढून विद्याथ्र्याना देशद्रोही, नक्षलवादी असे वाटेल ते म्हणतात.
- त्यामुळे (वर नमूद केलेले) विविध सार्वजनिक अवकाश जणू काही नाहीच आहेत आणि एक देश एक धर्मच या देशात सत्तेतही आहे आणि सफरही होतो आहे अशी काहीशी विसंगत (अब्सर्ड) मांडणी होताना दिसते. सारेच अंतर्विरोध झाकून त्यावर एकच रंग चढवण्याचे काम होते. फिल्म इन्स्टिटय़ूट ह्या कला-शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थी अशा आरोपांमधून जात. आता या घटकेला ‘एकाच (उजव्या) विचारसरणीचे पाच सदस्य एखाद्या कला संस्थेच्या कार्यकारिणीवर कसे’ हा मुद्दा घेऊन कलासंस्थांच्या स्वायत्तीकरणाच्या विरोधात उभे आहेत. ते ठाम आहेत, पण सरकारची निवड तत्त्वत: अगदीच कमकुवत आहे. (त्यातून या सरकारची कला-संस्थांकडे बघण्याची उदासीनता, निष्काळजी किंवा सिनेमा काय करू शकतो याबद्दल असलेली शून्य जाण दिसतेच.) 
सरकार याहीपेक्षा स्मार्ट वागू शकते. पण यापेक्षा ‘थोडेसे’ स्मार्ट वागणारे सरकार आपण ‘चालवून घेणार आहोत’ का? - हा आणखीच कळीचा प्रश्न! म्हणजे (विद्याथ्र्याच्या मते सुमार कुवतीचे) गजेंद्र चौहान नकोत, पण मग अजून ‘थोडेसे’च पुढे जाऊन (गजेंद्र चौहानांपेक्षा बरे असे) विनोद खन्ना चालतील का?
- हे असे ‘चालवून घेणो’ आपल्या अंगवळणी पडणार असेल वा पाडले जाणार असेल, तर अशी अवस्था पूर्ण दमनापेक्षाही वाईट ठरते. ती पूर्ण विखंडनाची अवस्था असेल. कारण कोणाला कोणाविरुद्ध विरोध करण्याचे काही कारणच मग उरणार नाही.  
आत्ता सुरू झालेला वाद हा अधिकाधिक व्यापक व्हावा आणि तो कोर्स करताना केलेल्या फिल्म्समधून व्यक्त व्हावा. 
इथे जीङोकचा कोट वापरायचा मोह आवरत नाही - The problem with our desire is how do we know what we desire? (इच्छा नेमकी कशाची आहे हेच न कळणो हीच इच्छेच्या मार्गातला खरी अडचण असते)  हीWe are taught to desire. Cinema is an ultimate pervert art. It doesn't satisfy your desire, It tells you what to desire. 
 समाजात ही इच्छा रुजवण्याची क्षमता सिनेमामध्ये असते. बहुसंख्याकांच्या शक्तिप्रदर्शनापेक्षाही कलेची ही अमूर्त ताकद अधिक परिणामकारी असते, हे बहुधा निवड समितीला कळलेले नाही आणि कळले असूनही हे पाऊल उचलले गेले असेल, तर मग हा उपहास आहे, असेच म्हणावे लागेल.
 
(लेखक नव्या पिढीतील प्रयोगशील रंगकर्मी आहेत)