शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

आर्ट स्कल्प्चर शॉप

By admin | Updated: September 12, 2015 18:01 IST

मीही तसाच हॉटेलवर परतलो. एखाद्या अनोळखी गावात आपला तीनचार दिवस सलग मुक्काम असला, की एकदोन दिवसातच ते गाव आपल्या ओळखीचं होऊ लागतं. आपण ज्या हॉटेलात उतरलेलो असतो, ती खोली, तिथली कपाटं, पलंग, खिडक्या, दारं, पडदे हे सगळं दोनतीन दिवसांनी ‘आपलं’ वाटू लागतं

 चंद्रमोहन कुलकर्णी

 
मीही तसाच हॉटेलवर परतलो. एखाद्या अनोळखी गावात आपला तीनचार दिवस सलग मुक्काम असला, की एकदोन दिवसातच ते गाव आपल्या ओळखीचं होऊ लागतं. आपण ज्या हॉटेलात उतरलेलो असतो, ती खोली, तिथली कपाटं, पलंग, खिडक्या, दारं, पडदे हे सगळं दोनतीन दिवसांनी ‘आपलं’ वाटू लागतं. फार लवकर सवय होते आपल्याला त्या सगळ्याची.
हॉटेलचा परिसर, आजूबाजूचे रस्ते, गल्ल्या, तिथली घरं, रोज दिसणारी माणसं ह्यांच्यात नि आपल्यात एक प्रकारचं ताजं नातं निर्माण होतं. इतकंच काय, तर हॉटेलमधले वेटर, रिसेप्शनला असलेले मॅनेजर्स, तिथले त्यांचे सहकारी, रूम सव्र्हिसची सेवा देणारी मुलं, अगदी परक्या भाषेत बोलणारी असली, आणि आपल्याला ती भाषा समजत नसली, तरी खाणाखुणा आणि हावभावांवरनं भावना समजतात. काही तर त्या तेवढय़ा काळाच्या तुकडय़ापुरते आपले मित्रही होतात.
इथं महाबलिपुरममधे तर काय हॉटेल अगदी रस्त्यावरचंच होतं. मला आवडतं तसं! कोणत्याही गावात गेलं आणि हॉटेलमध्ये रहायची वेळ आली की मी ऐन गावातलं, मोठे रस्ते, बाजार, शक्यतो जुनी वस्ती असं सगळं जवळ पडेल, तिथं पायी फिरता येईल असं एखादं हॉटेल निवडणं पसंत करतो. रिसोर्टमध्ये किंवा गावापासून लांब असलेल्या कॉटेजवजा हॉटेलात छानछोकीत रहायला एखाद-दुसरा दिवसच ठीक वाटतं.
महाबलिपुरमचं हे हॉटेल आणि तिथला परिसर ओळखीचा झाला होता. तसंच आजूबाजूचे दुकानदार, किरकोळ विक्रेते, ठरावीक ठिकाणी रोज, विशिष्ट वेळेला पथारी टाकूृन बसणारे छोटे विक्रेते येता जाता हाक मारत, काही बोलत, स्मित हास्याची देवाणघेवाण होई, एखाद्या छोटय़ा किरकोळ वस्तूची खरेदी-विक्री होई.
असाच एक तरुण, बावीस-पंचवीस वर्षाचा मुलगा येता जाता ओळख दाखवी. त्याच्या भाषेत काहीतरी बोले. आपलं बोलणं मला समजत नाहीये असं लक्षात आल्यावर हिंदीत संभाषण करायला सुरुवात व्हायची. माझं पुणोरी आणि त्याचं तोडकंमोडकं हिंदी!
मोठा छान मनुष्य होता. महाबलिपुरमच्या पाषाणाच्या रंगाशी जवळीक सांगणारा अव्वल वर्ण, ब:याच बंगाली स्त्रियांचे असतात, तसे रेखीव पण लहान डोळे. बंगाली बायकांचे डोळे मोठे असतात, ह्याचे तसे नव्हते. छोटे होते, पण पाणीदार. डोळ्यांत एक विशिष्ट चमक. कुरळे, काळेभोर केस, नाजूक हातांनी करत असलेला त्याचा तो नमस्कार आजही आठवतो. बटूमूर्ती म्हणावी अशा उंचीचा तो मुलगा बाजारातनं ये-जा करताना सारखा दिसायचा. कधी मूर्तिकाम करताना, तर कधी त्याच्या त्या छोटय़ा दुकानात गि:हाईकांशी बोलत असलेला, दुकानदारी करताना दिसायचा. नजरानजर झाली की छान मोकळं हसायचा. मीही मग रेंगाळायचो तिथं त्याच्या दुकानात. मूर्ती बघायचो. हाताळायचो.
एक दिवस मला त्याच्या त्या विशिष्ट हेल असलेल्या हिंदीतनं त्यानं विचारलं,
‘‘सर आप आर्टिस्ट है क्या?’’
मी म्हटलं, ‘‘हाँ’’!
खरं तर आर्टिस्ट ‘दिसावं’ असे निदान तेव्हा तरी माङो आता वाढलेत तसे लांब वाढवलेले केस नव्हते, की चित्रकार राखतात तशी मी दाढीसुद्धा राखलेली नव्हती, की लांब, गुडघ्यार्पयत, रंगीत, मोठय़ा पिंट्रचा झब्बा आणि जीन्स असा पेहरावही नव्हता माझा. मी आपला झोपताना घालतात तसा एक टी शर्ट आणि पायजमा घालूनच सकाळी दाढी-अंघोळ करायच्या आधी सहज म्हणून एक चक्कर टाकायला, पायात सपाता अडकवून बाहेर पडलो होतो. त्या काळच्या चित्रकारांकडे असायची, तशी माङया खांद्यावर दोरीची शबनम किंवा हातात सिगरेटही नव्हती.
तरी त्यानं ओळखलं. मी त्याला कशावरनं चित्रकार वाटलो हे विचारल्यावर तो म्हणाला, ‘‘ऐसेही! आप जिस स्टाईलसे स्कल्प्चर हातमें लेते हो, रखते हो और स्कल्प्चर के साथ में बर्ताव करते हो उसके वास्ते हमको ऐसा लगता है सर, की आप आर्टिस्ट हो.’’
मी म्हणालो, ‘‘वो सब ठीक है, लेकिन हमको और भी कुछ चीजे दिखावो. अंदर लेके चलो हमको तुम्हारे स्कल्प्चर स्कूल में!’’
असं म्हटल्यावर त्यानं मला क्षणाचाही वेळ न दवडता त्याच्या दुकानापासून थोडंसं लांब असलेल्या एका झोपडीवजा घरात नेलं. झोपडीवजा दिसत असलं तरी जागा होती मोठी प्रशस्त! भरपूर शिल्पं होती. आधी सांगितलं तशी देवदेवता, हत्ती, घोडे, स्त्री-पुरुष, नक्षीचे खांब, कमळं, फुलं, नक्षीच्या पट्टय़ा. काही विचारू नका!
एकापेक्षा एक सुरेख नमुने! डोळे विस्फारून मी ते बघत होतो. माङया खिशाला परवडेल आणि वाहनाच्या डिकीत मावेल इतक्या आकाराची काही स्कल्पर्स मीे बघून ठेवली होती, पण मुद्दाम घ्यावीत, इतक्या लांबून मद्रास ते पुणो इतका मोठा प्रवास घडवून घरी न्यावीत इतकी ती काही ‘विशेष’ वाटली नाहीत. तेव्हा त्या खरेदीचा विचार तात्पुरता स्थगित ठेवून मी त्याला म्हणालो, ‘‘और कुछ दिखाओ. ये तो सब कॉमन है. मेरेको मालूम है की तुम्हारे पास और भी कुछ है.’’
म्हणाला, ‘‘और कुचबी नै है सर! चाहे तो आप मेरे घर आ सकते है, लेकिन उदर बी कुच नै है.’’
संधी साधत मी म्हणालो, ‘‘तो चलो.’’ अशा एखाद्या साध्यासुध्या अनोळखी माणसाच्या घरी जायला मला फार आवडतं. एखाद्या माणसाचं घर कसं असेल, ह्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनात नेहमीच एक कुतूहल असतं.
घर काही फार लांब नव्हतं. एकदोन गल्लीबोळ आणि मुख्य रस्ता पार करून थोडसं अंतर पार करून आम्ही दोघं आजूबाजूला छान झाडंबिडं लावून नीटनेटक्या राखलेल्या त्याच्या घरी गेलो. बाहेर छोटंसं फाटक वगैरे होतं. आत गेलो, तर घरातही थोडीफार शिल्पं होती. पाहुणा होतो, म्हणून त्यानं मला बसायला जागा करून दिली. स्वत:ही समोर बसला, पण संभाषण काही होईना! आम्ही दोघं नुसतेच एकमेकांसमोर बसून राहिलो. तीन-चार खोल्यांच्या त्या छोटय़ाश्या सुरेख घरात आपुलकीचं वारं खेळत होतं. वातावरण प्रसन्न, सकाळचं कोवळं ऊन आणि गोड वा:याच्या झुळुका! मलाही आणखी काही नकोच होतं. आतल्या खोलीतनं कुणी एक स्त्री येऊन पाणी देऊन पुन्हा आतमध्ये लुप्त झाली. अण्णानं मला ‘काफी’बद्दल विचारलं. हातानं ‘नको, राहू दे’ अशी खूण करून मी त्याच्या घराच्या परसबागेकडे वळलो.
हाही आला मागोमाग.
बघतो तर काय, त्याच्या त्या परसबागेत असंख्य शिल्पं पडली होती, सगळी भंगलेली! मला हवी असलेली! मी खूश झालो. मला हेच हवं होतं.
भंगलेल्या शिल्पाचं का, कोण जाणो मला फार म्हणजे फार आकर्षण वाटतं. काम करता करता अर्धवट राहिलेल्या शिल्पाचंही तसंच. पूर्ण झालेल्या शिल्पकृतीपेक्षा अर्धवट राहिलेल्या किंवा पूर्ण होऊन अर्धवट उरलेल्या शिल्पकृतींशीे आपलं काही एक विशेष नातं जुळतं. विशेष संवेदना जाग्या होतात, विशेष गप्पा होतात अशा शिल्पांशी!
माङया वाहनातून नेता येतील अशा पुष्कळ मूर्ती होत्या तिथं. एखाद्या नर्तकाच्या हाताची मनगटापासून तुटलेली एखादी मुद्रा, एखादं कबंध, एखादं शिर, घोडय़ाचं एक मुख होतं. दगडाचे हस्तिदंत होते!
मी म्हटलं, ‘‘इसका क्या प्राइस है, ये देदो हमको, हमको ये चाहिये.’’
तो थबकला. माङयाकडे नुसताच बघत राहिला. 
मी म्हटलं, ‘‘बोलो ना भय्या!’’
‘‘नही साब, वो देने का नही है!’’
‘‘क्यूँ?’’
‘‘नही साब, वो तो सब ब्रोकन है, देनेका नही है, अच्चा है ना उधर शॉपमे. उदर का लेलो जो चाहिये वो.’’
मला ते नको होतं. मला हे हवं होतं, अर्धवट, तुटलेलं, अर्ध काम करायचं राहिलेलं..!
मी एक दोन शिल्पं हातात उचलून घेतलीदेखील! माझा जीव पडला होता त्या कलाकृतींवर.
मी त्याला पटवण्याचा प्रयत्न केला. नाहीतरी ही शिल्पं कशी अर्धवटच आहेत, आणि ती तू तुङया दुकानाच्या व्यापात कधी पूर्ण करणार वगैरे सांगून त्या अर्धवट शिल्पांची मी पूर्ण शिल्पांच्या किमतीएवढीच, किंबहुना थोडीशी जास्तच किंमत द्यायला कसा तयार आहे, हे सगळं त्याला पटवून देण्याचे माङो सगळे प्रयत्न त्यानं नम्रपणानं धुडकावून लावले. मला त्याची कोणतीच कारणं ‘खरी’ वाटेनात. मी त्याला तसं सांगितल्यावर मनाचा हिय्या करून अंतिम वाक्य बोलावं तसा तो म्हणाला,
‘‘सर, वो देने का नही है, क्यों की वो हमार है, सर!’’
मला त्याचा प्रॉब्लेम लक्षात आला. ती सगळी मालमत्ता ‘त्याची’ होती, आणि प्रश्न पैशांचा नव्हता. कितीही पैसे दिले तरी त्याला ते विकायचं नव्हतं.
मग मी फार आग्रह धरला नाही. शिल्पांचा आणि शिल्पकाराचा निरोप घेऊन मी परत फिरलो. नाराजीनं हॉटेलवर परतलो.
अर्धवट शिल्पांच्या मी प्रेमात पडलो होतो, पूर्ण शिल्पांकडे पाहवेना, विकत घेण्याचा तर विचारही करू शकत नव्हतो. मला हवी होती अर्धवट, तुटकी शिल्पं.
एकदोन दिवसांनी मुक्काम संपवून घरी परतण्याची वेळ झाली. एव्हाना शिल्पांचा विचार मागे पडला होता. शेवटच्या दिवशी, चेकअप करताकरताच शिल्पकार महाशय हॉटेलच्या लॉबीत उभे! तेच ते चमकदार डोळे, अंगात बनियन आणि गुडघ्यार्पयत खोचलेली लुंगी! हातात एक अगदी छोटं कागदाचं पुडकं.
‘‘सर, धिस इज फॉर यू!’’
हातातलं पुडकं माङया हाती देत शिल्पकार म्हणाला. मी घाईघाईनं हातातलं पुडकं सोडण्याच्या बेतात असतानाच तो म्हणाला,
‘‘सर, डोण्ट ओपन सर! बादमें खोलो, सरप्राइज है, गिफ्ट है!!’’
‘‘कशाला गिफ्ट वगैरे, मी तर तुङयाकडनं विकत काहीच घेतलं नाही, तुझा वेळही घेतला मी, शिवाय तूच मला पुन्हा गिफ्ट वगैरे कशाला देतोस? उलट तुङयाकडनं काही घेतलं नाही याचंच खरं तर मला किंचितसं वाईट वाटतंय. अजूनही तू म्हणत असलास तर तुङया घरनं एकदोन शिल्पं मी घ्यायला तयार आहे. पण मला ‘ती’ शिल्प हवीत, तुटकी!’’ असं मी त्याला माङया पुणोरी हिंदीत समजावलं.
त्यांन अर्थातच माझं काही ऐकलं नाही. माङया हातात पुडकं सरकावून म्हणाला, ‘‘वैसा, कुच्च नै साब. आपसे बात करके हमको भौत अच्च लगा. आप आर्टिस्ट है करके हमारा ये गिफ्ट लेलो. तुम हमको बहुत अच्च लगा. तुम हमारा घरमें आया, बैठा और हमसे प्यारसे बात किया. हमको और कुच्च नही चाहिये साब,’’
असं म्हणून पाठ फिरवून निघूनही गेला!
त्याची पाठ फिरताच तिथंच हॉटेलच्या काऊंटरवर बायको हॉटेलचं बिल वगैरे सेटल करत होती. तेवढय़ात मी उत्सुकतेनं पुडकं उघडून घाईघाईनं पाहिलं तर आत होता, दोन्ही हाताच्या ओंजळीत मावेल इतक्या छोटय़ा आकाराचा मऊ दगडात कोरलेला, पुस्तक वाचणारा श्री गणोश! कधी नव्हे ते कुणी माङया हातात देवाचं शिल्प दिलं होतं. मला देवाच्या मूर्तीपेक्षा त्या मनुष्याच्या भावनेचं मोल जास्त होतं. मोठय़ा कृतज्ञतेनं मी ती मूर्ती स्वीकारली, स्टुडिओवर आणली.
स्टुडिओतल्या पुस्तकांच्या सान्निध्यात, पुस्तक वाचणारा तो छोटा गणोश आजही वाचनात मग्न असतो. उजवा पाय डाव्या पायाच्या गुडघ्यावर टाकून आणि डाव्याच हातात पुस्तक धरून उजव्या हातावर रेलून बसलाय.
अखंड वाचतो आहे. दहा वर्षापूर्वी वाचतच होता, शंभर आणि एक हजार वर्षापूर्वीही तो वाचतच होता, एक लाख किंवा वीस कोटी वर्षापासून तो ते पुस्तक वाचत आलाय, इथून पुढे वीस कोटी र्वष तो वाचत राहणार आहे.
मी नसेन, माझा स्टुडिओ नसेल, तुम्ही नसाल, पुस्तक असेल आणि कुणीतरी ते वाचत असेल!
(‘आर्ट स्कल्प्चर शॉप’ या लेखाचा उत्तरार्ध)
 
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)
 
chandramohan.kulkarni@gmail.com