शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

अॅमस्टरडॅम!

By admin | Updated: May 14, 2016 13:38 IST

मला आजही ती दुपार आठवते. आपण खरे आतून कोण आहोत याची माझी स्वत:ची ओळख आणि स्वत:शीच झगडा त्वेषाने आतून चालू होता. मला वाटले होते की मी त्या दुपारी मनातल्या सुप्त भुका भागवून टाकीन. पण मी तसे काहीही केले नाही. स्वत:शी भांडत मी रस्त्यांवरून फिरत राहिलो. निरुद्देश. सूर्य मावळताना माझाच मला कंटाळा आला. राग आला. मी कोण आहे, कसा माणूस आहे याची ओळख पटल्याचा तो राग होता.

- सचिन कुंडलकर
 
पहिल्यांदा संपूर्ण एकटय़ाने असा केलेला प्रवास हा पॅरिसहून अॅमस्टरडॅमचा. ज्या प्रवासाला कोणतेही असे काहीही कारण नव्हते, ना मला त्या शहराची खूप माहिती होती. पॅरिसला मी शिकायला आलो होतो आणि याआधी विनाउद्देश एकटय़ाने अशी कोणतीही भटकंती मी आयुष्यात केली नव्हती. मी पुढे जे एकटय़ाने अनेक आणि उगीचच प्रवास केले त्यातला हा पहिला. आणि म्हणून त्या दोन दिवसांमधील सगळे अनुभव माङया मनावर अजूनही गडद उमटले आहेत. 
संपूर्ण रात्रभर बसमधून प्रवास करून मी पहाटे अॅमस्टरडॅममध्ये पोचलो तेव्हा ते शहर नुकतेच झोपायला गेले होते. एका होस्टेलमध्ये माझी राहायची सोय केली होती तिथे माङया बसच्या ड्रायव्हरने मला सोडले आणि तो निघून गेला. होस्टेलवर माझ्याच वयाच्या, विशीतल्या, जगभरातून आलेल्या मुलामुलींची तुफान गर्दी होती आणि मी खोलीत पाऊल ठेवले तेव्हा ते सगळे रात्रभर कुठेतरी नाचून झोपायला आले होते. माङयाशी बोलण्यात किंवा मी कोण आहे, कुठून आलो आहे हे असले काही गप्पांमधून विचारण्याची त्या कुणालाच शुद्ध नव्हती. खोलीत दहा बेड होते आणि बाहेर चार सामायिक बाथरूम्स होती. मी गुपचूप तयार झालो आणि सामान साखळीने पलंगाच्या पायाला बांधून, त्याला कुलुपे घालून, महत्त्वाच्या गोष्टी अंगावर घेऊन सकाळीच बाहेर निर्मनुष्य शहरात आलो. 
एकटय़ाने केलेल्या प्रवासात पहिल्यांदा अंगावर येऊन आदळतो तो अतिशय एकटेपणा. तो पेलायला भरपूर प्रवास करून शिकावं लागतं. त्या एकटेपणालाच घाबरून बहुतांशी लोक ओळखीच्या घोळक्याने प्रवास करतात. नव्या अनोळखी शहरात कितीही जादूमय गोष्टी असल्या तरी प्रथमदर्शनी तिथे एकटय़ाने पाऊल ठेवताच, विशेषत: पाश्चिमात्य शहरांमध्ये, आपल्याला पोटात खड्डा पडेल अशा रिकामेपणाला सामोरे जावे लागते. त्या सकाळचा माझा सगळा एकटेपणा घालवला व्हिनसेट व्हॅन गॉगने. अॅमस्टरडॅम येथे त्याच्या चित्रंचा समग्र आणि मोठा संग्रह आहे. मी अकराला उघडणा:या म्युङिायमच्या बाहेर साडेदहापासूनच  रेंगाळत होतो आणि ते उघडताच आत धावत जाऊन ‘पोटॅटो इटर्स’ या चित्रला भेटणारा मी पहिला होतो. सूर्यफुले, पिवळीधम्मक शिवारे, चांदण्यांनी भरलेले रात्रीचे आभाळ, स्वत:ची खोली. माङया अंगावर काटा उभा राहिला. आजपर्यंत पाहत होतो त्या चित्रंच्या प्रिंटमधून व्हॅन गॉग हा चित्रकार मला ऊर्जा देत होता, पण आज त्याची चित्रे प्रत्यक्ष पाहताना अंगातून वीज जावी तसे काही होत होते. मी धडपड करत इथे आल्याबद्दल मला खूप बरेच वाटले. ‘पोटॅटो इटर्स’ बघताना माङया डोळ्यात पाणी आले. असे सगळे त्यावेळी प्रवास करताना सतत होत असे. आता कधीच इतके भावुक काही वाटत नाही. पण त्यावेळी असे वाटे की कोण कुठले आपण, आपली परिस्थिती नसताना कुठून इथे येऊन उभे राहिलो आणि हे काय सुंदर दिव्य आपल्यासमोर साकारले जाते आहे. 
मी संपूर्ण चित्रंचा संग्रह तीनदा फिरून पाहिला आणि मनामध्ये साठवून ठेवला. त्या काळी असे वाटत असे की परत इथे येऊ न येऊ, सध्या वाटतो तसा सहज आत्मविश्वास आणि सोपेपणा माङया मनात त्यावेळी जरासुद्धा नव्हता. नुसतेच अप्रूप. सगळे अनुभव एकदाच मिळणार आहेत असे वाटायचे आणि सगळ्याच चांगल्या गोष्टींचा उपभोग घेताना मन आसुसून जायचे. मला आज तो भाबडेपणा फार आठवतो. कारण मी वयाने मोठा झालो तसा तो गमावून बसलो आहे. टय़ुलिपची फुले पाहायला जाण्याइतका पुणोरी मी तेव्हाही नव्हतो. त्यामुळे आमच्या बसमधील त्या सहलीला ‘नाही’ म्हणून मी एकटय़ाने पायी शहर भटकायचे ठरवले. 
दुपार झाली तसे माङया मनात असलेल्या धाडसाचे बीज रस्त्याच्या कोप:यावर उगवू लागले. मी गेल्या रविवारच्या लेखात लिहिल्याप्रमाणो मला स्वत:च्या आखीव शहाण्या मनाचा कंटाळा आला होता. आणि सुप्तपणो अॅमस्टरडॅमला एकटय़ाने निघून यायचे कारण हे व्हॅन गॉग आणि रेम्ब्रा चित्रे बघणो हे नसून सेक्स आणि ड्रग्ज या दोन बाबतीत सगळे युरोपात जाऊन करतात ती अॅडव्हेन्चर करणो हे होते. आता दुपार झाली तसे आपण इथे का आलो आहोत याची आठवण मला माङो मन करून द्यायला लागले. शहर आता फुलू लागले होते. कोप:याकोप:यावर हव्या त्या प्रकारची शरीरे उपलब्ध होती. मी एकटा होतो. निर्णय माझा होता. आता कोणतीही तक्र ार करायला जागा नव्हती. साध्या पब्समध्येसुद्धा हवी ती ड्रग्ज मिळतात हे माङया ड्रायव्हरने मला सांगितले होते. 
इंग्लिश चित्रपटात तरु ण मुले प्रवासात जगताना दाखवतात ते पाहून आपण वर्षानुवर्षे चेकाळून गेलेलो असतो तसे माङो झाले होते. मला आजही ती अॅमस्टरडॅममधील दुपार आठवते. कारण आपण खरे आतून कोण आहोत याची माझी स्वत:ची ओळख आणि माझा माङयाशीच झगडा त्वेषाने आतून चालू होता. मला वाटले होते की मी त्या दुपारी मनातल्या सुप्त भुका भागवून टाकीन. पण मी तसे काहीही केले नाही. स्वत:शी भांडत मी रस्त्यांवरून फिरत राहिलो. निरुद्देश. जे दिसले ते पाहत. पण जे ते धाडसाचे एक पाऊल असते ते उचलून, विकत घेतलेले सेक्स किंवा ड्रग्ज या दोन्हीच्या जवळपासही मला जाता आले नाही. आपल्याला जर आज ते करणो जमले नाही तर यापुढे कधीही जमणार नाही हे माहीत असूनही. मनाला सर्व प्रकारे ढकलूनही मी कोणतीही हिरोगिरी त्या दिवशी करू शकलो नाही आणि सूर्य मावळताना माझाच मला कंटाळा आला. राग आला. मी कोण आहे, कसा माणूस आहे याची ओळख पटल्याचा तो राग होता. मी साधा वाचणारा, चित्र बघून आनंदी होणारा, माणसांशी गप्पा मारायला आवडणारा मुलगा आहे. मी माङो आईवडील, नातेवाईक यांच्यापेक्षा फार वेगळा नाही, मी फ्रेंच कादंब:या आणि सिनेमात जगणा:या पात्रंसारखा नाही, मी रक्तामांसाने, मनाने तोच आहे, ज्याला त्याच्या घराने आणि जन्मगावाने घडवले आहे. मला मी इतरांपेक्षा खूप वेगळा, धाडसी, आक्रमक, जे हवे ते लगेच मिळवणारा यशस्वी मुलगा आहे हे सत्य हवे होते, पण ते खरे नव्हते. समोर सोपेपणाने हवे ते मिळण्याची सोय असताना मला ते उपभोगता येत नव्हते. त्या दुपारी माङयातले मोठे द्वैत संपुष्टात आले. आणि मी स्वत:शी भांडून मग शांत झालो तेव्हा मग मला अॅमस्टरडॅम शहर होते तसे समोर दिसायला लागले. किती सुंदर आहे ते शहर!
पुढचे दोन दिवस मी शहरात खूप भटकलो, उत्तम जेवणाची चव घेतली, फोटो काढले, अनोळखी माणसांकडे पाहून हसलो, होस्टेलवरच्या अमेरिकन मुलांशी गप्पा मारल्या, अॅनी फ्रॅँक या तेथील कम्पलसरी मुलीचे घर पाहून कम्पलसरी हळहळलो, कालव्यांमधून बोटींमधून फिरलो. आणि रात्री तिथल्या सुप्रसिद्ध वेश्यावस्तीत जाऊन काचेच्या खिडक्यांमध्ये उभ्या असलेल्या बायका जवळ जाऊन पाहिल्या आणि रेम्ब्राची चित्रे डोळे भरून पाहिली.  दुस:या दिवशी मी एकटा बसून होतो तेव्हा मला अचानक रडायला आले. खूप जास्त. कसले आणि  का ते कळले नाही. पण मी त्या दिवशी एकटाच रडलो हे मला अजुनी आठवते. बहुधा एकटय़ाने प्रवास केल्याबद्दलचे रडू असावे. सगळ्यांना सोबत कुणी न कुणी असताना आपण एकटय़ाने अनोळखी शहरात फिरणो हे फार पोकळी निर्माण करणारे असते. दुपारी एका पबमधून बिअर पिऊन बाहेर पडताना एक माणूस माङया मागे मागे चालत यायला लागला. मला ते जाणवू लागले की  तो आपला पाठलाग करतो आहे. मी वेग वाढवला. एका गल्लीच्या कोप:यावर त्याने मला थांबवले आणि विचारले की मला टॅबलेट्स हव्या आहेत का. मी नको म्हणालो. तो म्हणाला, तुङयाकडे काही डॉलर्स असतील तर मी त्याची चांगली किंमत देईन. मी ‘नको’ म्हणून निघून जाऊ लागतो. तेवढय़ात दोन्ही बाजूंनी कर्कश हॉर्न वाजवत पोलिसांच्या गाडय़ा आल्या आणि काही कळायच्या आत सहा पोलिसांनी आम्हाला दोघांना घेरले. 
पोलिसांनी माझी झडती घेतली, माझा पासपोर्ट पाहिला तेव्हा मी थंडीतही घामाने संपूर्ण भिजलो होतो. मला पासपोर्ट परत देऊन तो पोलीस मला ‘थॅँक्स’ आणि ‘सॉरी’ म्हणाला. त्या माणसाच्या मागे पोलीस तीन दिवस होते. त्याने ड्रग्ज विकायचा प्रयत्न केला का याची जबानी देणारा माणूस त्यांना हवा होता. मी ‘हो’ म्हणालो. एक सही केली आणि त्या माणसाला गाडीत टाकून, मला तसदी दिल्याबद्दल ‘सॉरी’ म्हणून पोलीस निघून गेले. 
 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)
kundalkar@gmail.com