शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी भरतीला सतराशे विघ्न, जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंधच अजून तयार नाही

By दीपक भातुसे | Updated: June 19, 2023 05:37 IST

रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंध तयार नसल्याबाबत ग्रामविकास विभागाने व्यक्त केलेल्या नाराजीसंदर्भातील पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.

मुंबई : चार वर्षांपासून ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येणारी जिल्हा परिषदांची पदभरती रखडलेली असतानाच पदांचा सुधारित आकृतीबंध अद्याप तयार नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्य शासकीय सेवेतील ७५ हजार रिक्त पदांची भरती करण्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. यात जिल्हा परिषदेतील रिक्त जागांचाही समावेश आहे. मात्र, या पदांचा सुधारित आकृतीबंधच तयार नसल्याने या जागा १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत कशा भरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंध तयार नसल्याबाबत ग्रामविकास विभागाने व्यक्त केलेल्या नाराजीसंदर्भातील पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे. रिक्त पदांच्या आकृतीबंधाबाबत ग्रामविकास विभागाने वेळोवेळी जिल्हा परिषदांना निर्देशित केले आहे. मात्र, तरीही कार्यवाही नसल्याने ग्रामविकास विभागाने मागील महिन्यात सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. तसेच सुधारित आकृतीबंध सादर करण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार आहे? अशी विचारणाही  केली होती. त्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व विभागीय उपआयुक्त व सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची याबाबत बैठकही घेतली होती. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विभागनिहाय पदांची आवश्यकता आणि पदांचा सुधारित आकृतीबंध जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. 

या कारणांमुळे रखडली भरतीआधी परीक्षा कशी घ्यायची, यामुळे ही पदभरती रखडली. त्यानंतर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस या कंपन्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर या कंपन्यांबरोबर करार कसे करायचे यात वेळ गेला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदांमधील रिक्त जागा भरण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वीच झाला असताना रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंधही तयार नसल्याची बाब धक्कादायक आहे.

मागील चार ते पाच महिन्यांपासून ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदांबरोबर केवळ पत्रव्यवहार करत आहेत. त्यापुढे भरतीबाबत ठोस कार्यवाही होताना दिसत नाही. आम्ही संघटनेकडून पत्र लिहून थकलो, विद्यार्थी फोन करून, ट्विट करून थकले, विद्यार्थ्यांनी मंत्रालयात फोन केला तर तुम्ही या भानगडीत पडू नका, तुम्ही अभ्यास करा आम्ही आमचे काम करतो आहे. अशी उत्तरे दिली जात आहेत. - महेश बडे, स्टुडंटस् राईटस् असोसिएशन

टॅग्स :Mantralayaमंत्रालय