शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
2
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
3
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
4
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
5
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
6
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
7
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
8
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
9
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
10
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
11
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
12
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
13
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
14
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
15
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!
16
“कोणी कुणाला काढलंय तेच कळत नाही”; राज ठाकरेंचा ECवर निशाणा, मतदारयादीतील एकसमान नावंच वाचून दाखवली
17
रोकड, सोनंनाणं आणि..., निवृत्त अबकारी अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड    
18
Dhan Teras 2025: धनत्रयोदशीला धन्वंतरीची आणि लक्ष्मीची पुजा करण्यामागे आहे पौराणिक कारण!
19
बाजारात 'सुपर वेन्सडे'! सेन्सेक्स ८२,६०० पार; गुंतवणूकदारांनी एकाच दिवसात कमावले ४.२९ लाख कोटी
20
'या' कंपनीवर लागला बॅन, शेअर्स आपटले; बोनस शेअर्स देणं आणि शेअर्स स्प्लिटवरही बंदी, कोणता आहे स्टॉक?

झेडपी, पं. समितीमध्येही आता स्वीकृत सदस्य असणार! बंड टाळण्यासाठी खेळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 07:55 IST

मंत्री बावनकुळे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सत्तारूढ महायुतीकडे इच्छुक उमेदवारांची होणार असलेली प्रचंड गर्दी आणि त्यातून होणारी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आता नवीन खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वीकृत सदस्य नेमण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून प्रत्येक जिल्हा परिषदेत पाच आणि पंचायत समितीमध्ये दोन स्वीकृत (कोऑप्ट) सदस्य नेमण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या अधिनियमात सुधारणा करण्यात यावी, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. 

ग्रामविकासला दिले निर्देश 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या पत्राला सकारात्मक प्रतिसाद देत ग्रामविकास विभागाने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी, असे निर्देश दिले आहेत. 

बंडखोरीवर उतारातिकीटवाटपात संधी मिळू शकली नाही त्यांना स्वीकृत सदस्यपदाचे गाजर दाखवून शांत केले जाईल. संपूर्ण जिल्ह्यात ३ ते ४ जागी मोठ्या बंडखोरीची शक्यता असते, ती याद्वारे संपुष्टात आणली जाईल असा व्होरा आहे.महापालिकांमध्ये स्वीकृत सदस्य नेमताना निर्वाचित नगरसेवकांच्या पक्षनिहाय प्रमाणानुसार त्या-त्या पक्षाला संधी दिली जाते. सर्वच प्रमुख पक्षांना स्वीकृत सदस्य नेमण्याची संधी मिळत असल्याने विरोधाची शक्यता नाही.  एकदा हे प्रमाण ठरले की, संबंधित  पक्षाचे महापालिकेतील नेते महापौरांना पत्र देऊन कोणाला स्वीकृत सदस्य करायचे, याची नावे देतात. तशीच पद्धत जि. प. व पं. समित्यांमध्ये आणली जाण्याची शक्यता आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Co-opted members likely in ZP, Panchayat Samiti to avert rebellion.

Web Summary : Maharashtra considers appointing co-opted members to Zilla Parishads and Panchayat Samitis. This move aims to quell potential rebellion from candidates denied tickets, offering them positions and ensuring broader party representation. CM has directed action.
टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद