शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

जिल्हा परिषदेत आघाडीची सरशी!

By admin | Updated: September 22, 2014 02:15 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी झाली. मराठवाड्यात काँग्रेस वरचढ ठरली तर विदर्भात काही फेरबदल झाले. अहमदनगरसह काही जिल्हा परिषदेत आघाडीने युतीकडून सत्ता हिसकावून घेतली. औरंगाबादेत काँग्रेसचे श्रीराम नागोराव महाजन (अध्यक्ष), राष्ट्रवादीचे दिनकर नरसिंहराव पवार (उपाध्यक्ष) विजयी झाले. उस्मानाबादमध्ये काँगे्रसचे धिरज पाटील व सुधाकर गुंड अनुक्रमे अध्यक्ष, उपाध्यक्ष झाले. हिंगोलीत शिवसेनेनेच बाजी मारली. अध्यक्षपदी लक्ष्मीबाई यशवंते तर उपाध्यक्षपदी राजेश्वर पतंगे यांची निवड झाली. नांदेडमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्षपदी अनुक्रमे काँग्रेसच्या मंगला गुंडीले आणि राष्ट्रवादीचे दिलीप धोंडगे यांची निवड झाली. परभणीत राष्ट्रवादीचे राजेश विटेकर व राजेंद्र लहाने यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली़ जालना येथे अध्यक्षपदी भाजपाचे तुकाराम जाधव तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध खोतकर विजयी झाले. लातूरमध्ये काँग्रेसच्या प्रतिभाताई पाटील कव्हेकर अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांची निवड झाली़ रायगडमध्ये राष्ट्रवादी-शेकापरायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने बाजी मारली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांची तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे यांची निवड झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शेकापचे सर्वेसर्वा जयंत पाटील यांचे डावपेच यशस्वी झाल्याचेच स्पष्ट होत आहे. उत्तर महाराष्ट्रात संमिश्र चित्रअहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या मंजुषा गुंड व काँग्रेसचे अण्णासाहेब शेलार अविरोध अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले. पहिल्या अडीच वर्षांसाठी राष्ट्रवादी आणि सेना-भाजपा सत्तेत होती. नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे विजयश्री चुंबळे व प्रकाश वडजे यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपद मिळविले. शिवसेना-भाजपा अलिप्त राहिले. जळगावमध्ये भाजपाचे प्रयाग कोळी (अध्यक्ष) व शिवसेनेचे ज्ञानेश्वर आमले (उपाध्यक्ष) बिनविरोध निवडूण आले. काँग्रेस व राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेतली. अमरावती, वर्धा, यवतमाळमध्ये फेरबदलनागपूरमध्ये अध्यक्षपदी भाजपाच्या निशा सावरकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शरद डोनेकर यांची निवड झाली. अमरावतीमध्ये काँग्रेसचे सतीश उईके अध्यक्ष तर, वऱ्हाड विचार मंचचे सतीश हाडोळे उपाध्यक्षपदी अविरोध निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच सदस्यांनी बंडखोरी करुन स्वतंत्र वऱ्हाड विचार मंच स्थापन केल्याने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला. सदस्यांची पळवापळवी करून वर्धेत भाजपाने काँग्रेसकडून सत्ता हिसकाविली. अध्यक्षपदी भाजपाच्या चित्रा रणनवरे तर उपाध्यक्षपदी भाजपाच्याच विलास कांबळे यांचा विजय झाला. यवतमाळमध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. आरती फुफाटे अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर यांची निवड करण्यात आली. चंद्रपुरात भाजपाच्या संध्या गुरनुले व कल्पना बोरकर अध्यक्ष-उपाध्यक्ष झाल्या. गडचिरोलीत राष्ट्रवादीचे परशुराम कुत्तरमारे तर काँग्रेसचे जीवन पाटील अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले.बुलडाण्यात काँग्रेसच्या अलका चित्रांगण खंडारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पांडुरंग खेडेकर अध्यक्ष-उपाध्यक्ष झाले.पुण्यात राष्ट्रवादीपुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप विद्याधर कंद (लोणीकंद) यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचेच शुक्राचार्य हिरामण वांजळे (अहिरे) यांची बिनविरोध निवड झाली.दक्षिणेत आघाडीसाताऱ्यात अध्यक्षपदी माणिकराव सोनवलकर, तर उपाध्यक्षपदी प्रदीप ऊर्फ रवी साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. सांगलीत राष्ट्रवादीच्या रेश्माक्का होर्तीकर, लिंबाजी पाटील यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी विलासराव जगताप यांना शह देण्यासाठीच दुष्काळी जत तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिल्याचे म्हटले जाते. राष्ट्रवादीने आघाडीचा प्रस्ताव तूर्त नाकारल्याने काँग्रेसने या निवडणुकीत तटस्थ राहणे पसंत केले. कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या विमल पुंडलिक पाटील (आमशी) अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शशिकांत खोत (कणेरी) बिनविरोध निवडूण आल्या. रत्नागिरीत युतीरत्नागिरीत अध्यक्षपदी शिवसेनेचे जगदीश राजापकर यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपाचे सतीश शेवडे यांची अपेक्षितपणे बिनविरोध निवड झाली़ यापूर्वी अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव असल्याने राष्ट्रवादीच्या मनीषा जाधव यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली होती. रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापने बाजी मारली. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सुरेश टोकरे यांची तर उपाध्यक्षपदी शेकापचे अरविंद म्हात्रे यांची निवड झाली. सिंधुदुर्गमध्ये काँग्रेसचे संदेश सावंत, रणजित देसाई यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. सोलापूरमध्ये राष्ट्रवादीसोलापूरमध्ये जयमाला गायकवाड व शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख यांची अध्यक्ष-उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली़ खा़ विजयसिंह मोहिते-पाटील, पालकमंत्री दिलीप सोपल, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी मंत्री सुधाकर परिचारक आदी राष्ट्रवादी नेत्यांनी एकजूट दाखविली. (लोकमत न्यूज नेटवर्क)