ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १० - राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत. कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?अनुसूचित जाती - भंडारा, अमरावतीअनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपुरअनुसुचित जमाती महिला - नंदुरबार ,ठाणे, गोंदिया,अनुसूचित जमाती - वर्धा, पालघरनागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ) -अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणेनागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ओबीसी ) - जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ,सर्वसाधारण प्रवर्ग महिला - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम,सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगलीयापैकी धुळे, नंदुरबार, अकोला , वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील. पालघरचे जुलै 2017 पासून तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर 2017 पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे 2017 मार्च मध्ये निवडणूक झाल्यानंतर होणार आहे.