शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

‘झिरो शॅडो’! आता रंगणार सावल्यांचा खेळ; ३ ते ३१ मेपर्यंत घेता येणार अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 06:44 IST

महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल.

मुंबई : कोरोना, ऊन, पाऊस, अशा अनेक घटकांनी त्रासलेल्या महाराष्ट्रात सावल्यांचा खेळ सुरू होणार आहे, कारण आता शून्य सावलीचे दिवस सुरू होणार आहेत. खगोलशास्त्रीय भाषेत यास ‘^झिरो शॅडो’ असे संबोधले जात असून, ३ मेपासून सुरू होणारा हा सावल्यांचा खेळ ३१ मेपर्यंत कायम राहील.

सूर्य डोक्यावरून असतो तेव्हा उन्हातील व्यक्ती किंवा वस्तूची सावली पुढे-मागे न पडता खाली पायातच पडते. मात्र, ज्या वेळी काही क्षण ही सावली गायब होते, त्याला शून्य सावली असे म्हणतात.सध्या उत्तरायण असल्याने कडाक्याचे ऊन पडले असून, राज्यातील विविध शहरे व ग्रामीण भागात हा अनुभव दरदिवशी घेता येईल, अशी माहिती प्रा. किरणकुमार जोहरे यांनी दिली.

महाराष्ट्रात ३ ते ३१ मेपर्यंत शून्य सावली दिवस आहेत. दुपारी १२ ते १२:३० या कालावधीत शून्य सावली ही वैज्ञानिक घटना अनुभवता येईल. भारतात शेवटी मध्य प्रदेशातील भोपाळ जवळून २३.५० अंशावरून कर्कवृत्त जाते. त्यामुळे हा प्रदेश शून्य सावलीचा शेवटचा भूभाग आहे. भारतात २३.५० अंशाच्या पुढे दिल्ली, हिमाचल, काश्मीर कुठेही शून्य सावलीचा दिवस नसतो, कारण तेथे डोक्यावर लंबरूप सूर्यकिरणे पडू शकत नाहीत. महाराष्ट्रात मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे सावली गायब झाल्याचे पाहायला मिळते. मात्र, जुलै महिन्यात ढगाळ वातावरणामुळे असे क्वचितच घडते.शून्य सावली दिवस आणि ठिकाणे -३ मे - सावंतवाडी, बेळगाव४ मे - मालवण५ मे - देवगड, राधानगरी, मुधोळ६ मे - कोल्हापूर, इचलकरंजी७ मे - रत्नागिरी, सांगली, मीरज८ मे - जयगड, कराड९ मे - चिपळूण, अक्कलकोट१० मे - सातारा, पंढरपूर, सोलापूर११ मे - महाबळेश्वर, फलटण, तुळजापूर१२ मे - माणगाव, बारामती, बार्शी, उस्मानाबाद, औसा१३ मे - मुळशी, पुणे, दौंड, लातूर१४ मे - अलिबाग, लोणावळा, तळेगाव-दाभाडे, पिंपरी-चिंचवड, जामखेड, अंबाजोगाई१५ मे - मुंबई, नवी मुंबई, कर्जत, माथेरान, राजगुरूनगर, बीड, गंगाखेड१६ मे - बोरीवली, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, खोडद, अहमदनगर, परभणी१७ मे - नालासोपारा, विरार, आसनगाव, बसमत१८ मे - पालघर, कसारा, संगमनेर, श्रीरामपूर, अंबड, हिंगोली१९ मे - डहाणू, नाशिक, कोपरगाव, वैजापूर, औरंगाबाद, जालना, पुसद२० मे - तलासरी, मेहेकर, वाशीम, वणी, चंद्रपूर, मूळ२१ मे - मनमाड, कन्नड, चिखली२२ मे - मालेगाव, चाळीसगाव, बुलढाणा, यवतमाळ, आरमोरी२३ मे - खामगाव, अकोला, वर्धा२४ मे - धुळे, जामनेर, शेगाव, निम्बोरा, उमरेड२५ मे - साक्री, अमळनेर, जळगाव, भुसावळ, अमरावती२६ मे - चोपडा, परतवाडा, नागपूर२७ मे - नंदुरबार, शिरपूर, गोंदिया२८ मे - शहादा, पांढुरणा

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवस