शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
2
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
4
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
5
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
6
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
7
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
8
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
10
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
11
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
12
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
13
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
14
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
15
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
16
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
17
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
18
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
19
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
20
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण

सणसर गाव ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी युवक सरसावले

By admin | Updated: May 8, 2017 02:03 IST

गावात जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेचा कायापालट केल्यानंतर सणसर गाव ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी येथील युवक

लोकमत न्यूज नेटवर्कभवानीनगर : गावात जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेचा कायापालट केल्यानंतर सणसर गाव ‘प्लॅस्टिकमुक्त’ करण्यासाठी येथील युवक सरसावले आहेत. ‘प्लॅस्टिक वापरणार नाही, वापरूदेणार नाही’, असा संकल्प येथील युवकांनी केला आहे. हा संकल्प येथील व्यापारी वर्ग, ग्रामस्थांच्या सहभागातून प्रत्यक्षात अंमलात आणण्यास शनिवार (दि. ६) पासून सुरूवात झाली आहे.सणसर येथील युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्रित आले. सुरुवातीला जिल्हा परिषद शाळा, माध्यमिक शाळेचा कायापालट केल्यानंतर आता गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला आहे. शनिवारी त्याची सुरुवात करण्यात आली. शेकडो युवक व पदाधिकाऱ्यांनी स्वत: कचऱ्यातील प्लॅस्टिक उचलला. येथील आठवडे बाजार, ग्रामदैवत यात्रा तसेच घराघरातील कचरा गोळा करण्यात आला. प्लॅस्टिक वापराच्या पार्श्वभूमीवर पंधरवड्यापूर्वीच सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर व ग्रामपंचायत सदस्यांनी प्लॅस्टिकबंदी जाहीर केली.मात्र, गावात प्लॅस्टिक कचरा ‘जैसे थे’ होता. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार व बारामती अ‍ॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांनी इंदापूरला जाताना रस्त्यावर थांबून याची पाहणी केली. तसेच ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर व सणसर विकास मंचाच्या सदस्यांना ‘प्लॅस्टिक’ कचऱ्याबाबत सूचना केली. त्यासाठी प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करू, असे सांगितले. त्यानंतर शनिवारी (ता. ६) सकाळी साडेसात वाजताच सणसर ग्रामपंचायतीपासून कामाला सुरुवात झाली. सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, छत्रपती कारखान्याचे संचालक रणजित निंबाळकर, जाचकवस्तीचे माजी उपसरपंच विक्रमसिंह निंबाळकर, राहूल काळे, सदस्य शरद कांबळे, यात्रा समितीचे अध्यक्ष रोहित निंबाळकर, बजरंग रायते, ग्राहक पंचायतीचे तालुकाध्यक्ष किशोर भोईटे, श्रीनिवास कदम, रवींद्र खवळे, धनंजय गायकवाड, युवा सेनेचे तालुकाप्रमुख सोमनाथ गुप्ते, काँग्रेसचे आबासाहेब निंबाळकर, अमोल भोईटे, वसंत जगताप, प्रकाश शिंदे, रामदास चव्हाण, शब्बीरभाई काझी, शिक्षण विभागाचे केंद्रप्रमुख दिलीप बोरकर, रायतेमळा शाळेचे मुख्याध्यापक विलास काटे, राजेंद्र पवार, आण्णा ढमे, देवानंद जमदाडे आदी शिक्षक या उपक्रमात सहभागी झाले होते.या पदाधिकाऱ्यांसक शेकडो युवकांनी रस्त्याच्या बाजूचे प्लॅस्टिक कचरा गोळा केला. आठवडे बाजारात प्लॅस्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाई सणसर ग्रामपंचायतीच्या सरपंच संध्या काळे, उपसरपंच अभयसिंह निंबाळकर यांनी सणसर गाव प्लॅस्टिकमुक्त करण्यात येईल. सर्व दुकानांमध्ये प्लॅस्टिकबंदी सक्तीची करणार आहे. आठवडे बाजारात प्लॅस्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाई करणार असल्याचे सांगितले.