शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांच्या हितासाठी ‘युवा’चा उपक्रम

By admin | Updated: March 4, 2017 01:54 IST

शहरी उपजीविका मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी रोजगार योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संस्थेने पुढाकार घेतला आहे.

मुंबई : पंडित दीनदयाळ अंत्योदय योजना आणि महाराष्ट्र राज्य शहरी उपजीविका मिशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरी रोजगार योजना गरिबांपर्यंत पोहोचविण्यासाठी युवा संस्थेने पुढाकार घेतला आहे. योजनेच्या फायद्यांसह त्यातील तरतुदी समजून सांगण्यासाठी ‘युवा’ने शनिवार, ४ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात महिला, युवक, फेरीवाले आणि बेघर समूहांसोबत शिबिराचे आयोजन केले आहे.युवाच्या समन्वयक पूजा यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शिबिराच्या दृष्टीने सदर मिशनबाबत शहरी गरिबांमध्ये जनजागृती केली जाईल. स्थानिक स्तरावर या योजनेची माहिती दिली जाईल. राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांमध्ये दुवा म्हणून युवा काम करणार आहे. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना योजनेचा उपयोग होईल; शिवाय या योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याचा प्रयत्नही युवामार्फत केला जाईल.सध्या शहरी गरिबांच्या प्रश्नांना घेऊन युवाचे काम सुरू आहे. सर्वांना मानवी अधिकाराच्या दृष्टीने संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना यशस्वी करण्याचे ध्येय युवाने हाती घेतले आहे. स्मार्ट सिटीआधी सर्वसमावेशी शहर तयार करण्याची गरजही संस्थेने व्यक्त केली आहे. त्यासाठी प्रयत्न करताना असंघटित कामगारांच्या उपजीविकांचे संरक्षण आणि प्रसार करणे, त्यांना सुरक्षा व प्रतिष्ठा प्राप्त करून देणे यावर संस्थेचे लक्ष आहे. तेव्हाच शाश्वत विकास होऊन सर्वसमावेशक शहर निर्माण होईल, असेही यादव यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. (प्रतिनिधी)