शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

'फेसबुक दिंडी'च्या माध्यमातून तरुणांचा सामाजिक उपक्रम

By admin | Updated: June 24, 2016 13:43 IST

पंढरपूर वारीदरम्यान पालखी सोहळ्याची माहिती 'फेसबूक दिंडी'च्या माध्यमातून पोहोचवणारे तरुण जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देणार आहेत

शिवराज यादव - 
पुणे, दि. 24 - लाखो वारकरी दरवर्षी वाट पाहत असलेले पंढरपुरची वारी आता सुरु होणार आहे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक ऐश्वर्य या वारीतून अनुभवायला मिळतं. अनेक वारकरी आपली अनेक वर्षांची परंपरा जात वारीत सहभागी होत असतात. मात्र ही वारी हायटेक करण्याचं काम पुण्यातील तरुण करत आहेत. फेसबूक दिंडीच्या माध्यमातून सुरु केलेला हा उपक्रम या तरुणांनी इथपर्यंतच न थांबवता आता सामाजिक कार्यातही सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. 
 
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा व संत ज्ञानेश्वर  महाराज पालखी सोहळ्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून संपुर्ण जगापर्यंत पोहचवण्याचं काम हे तरुण फेसबुक दिंडीच्या माध्यमातून करत आहेत. मात्र यावेळी फेसबुक दिंडीच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचं काम हे तरुण करत आहेत. 
 
श्री क्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानाच्या सहकार्याने व सुनेत्राताई  पवार यांच्या मार्गदर्शनाखालील 'एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती' यांचे तर्फे पालखी सोहळ्याच्या काळात 'फेसबुक दिंडीला' लाईक/जॉईन करणा-या प्रत्येक ई वारक-यामागे एक रुपया अशी आर्थिक मदत केली जाणार आहे. सोबतच ऑनलाईन तसेच वारीत चालणाऱ्या वारकरी शेतकरी मित्रांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. 
 
'राज्यातील पाणी टंचाईची तीव्रता विचारात घेता यंदा पालखी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कृती संगोपन आणि जनजागृती मोहीम सोबतच काहीतरी मदत व्हावी या उद्देशाने आपण हे पाऊल उचलल्याचं', फेसबुक दिंडीचे संस्थापक स्वप्नील मोरे यांनी सांगितले आहे. 'जमा झालेली मदत जलसंधारणाचे काम करणा-या सामाजिक संस्थेस उपलब्ध करुन दिली जाणार आहे. फेसबुकच्या माध्यमातून जगभरातील भाविकांपर्यंत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर  महाराज पालखी सोहळ्याचे अपडेट पोहोचविण्याचे यंदाचे सहावे वर्ष असून दरवर्षी या व्हर्च्युअल दिंडीला भेट देणा-या भाविकांच्या संखेत लक्षणीय वाढ होत असल्याचेही', ते म्हणाले. 
 
फेसबुक दिंडी टीमचे सदस्य स्वप्नील मोरे, मंगेश मोरे, अमित कुलकर्णी, सुरज दिघे, राहुल बुलबुले, ओंकार मरकळे, सुमित चव्हाण, अमोल निंबाळकर कार्यरत आहेत.