शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

युवाशक्तीमुळे भारत जगावर राज्य करेल

By admin | Updated: January 28, 2017 00:04 IST

जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे.

राजगुरुनगर : ‘जगामध्ये केवळ भारत हा देश तरुण असून येथील युवाशक्तीमुळे लवकरच जगावर राज्य करील, हे जगानेही मान्य केले आहे. त्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये नोकरीतील आरक्षणापेक्षा युवकांनी स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करून देण्याची मागणी करावी, असे प्रतिपादन अर्थक्रांतीचे प्रणेते अनिल बोकील यांनी राजगुरुनगर येथे व्यक्त केले.हुतात्मा राजगुरु महाविद्यालयातील साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमालेमध्ये ‘देशाला गरज एका अर्थक्रांतीची’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देवेंद्र बुट्टे-पाटील, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक शां. ल. घुमटकर, डॉ. अनिल खिंवसरा, बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, सुभाष टाकळकर, मुरलीधर खांडगे, अंकुश कोळेकर, अ‍ॅड. राजमाला बुट्टे-पाटील, प्राचार्य डॉ. एस. बी. पाटील, उपप्राचार्य एच. पी. जाधव उपस्थित होते.बोकील म्हणाले, आरक्षणाऐवजी व्यवसायासाठी भांडवलाची मागणी सरकारकडे केली पाहिजे. त्यामधून उद्योग उभे राहतील. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था बदलायला सुरुवात झाली असून लोकांकडे पडून असलेला पैसा व्यवहारात आला आहे. व्यवहार पारदर्शी होऊ लागले आहेत. देशाच्या तिजोरीत कररूपाने भर पडली आहे. देशाबाहेरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला आळा बसला आहे. बनावट नोटा, भ्रष्टाचारामुळे होणारी अर्थव्यवस्थेची हानी टळली आहे. नोटाबंदीचे परिणाम तातडीने दिसणार नसून हळूहळू त्याचा सर्वांनाच फायदा होईल.’ प्रा. व्ही. बी. दौंडकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेंद्र शिरसी यांनी प्रास्ताविक केले. कोमल गायकवाड हिने आभार मानले. (वार्ताहर)