शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

युवक काँग्रेस अध्यक्षपद; राऊत यांना सर्वाधिक मते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 05:58 IST

अध्यक्षपदासाठीची मुलाखत लवकरच नवी दिल्लीत होईल आणि त्यानंतर अध्यक्षपदावरील निवड जाहीर करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष व इतर पदांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक मते घेत कुणाल नितीन राऊत हे आघाडीवर आहेत. त्यांना ५ लाख ४८ हजार २६७ मते मिळाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राऊत यांच्यानंतर शिवराज मोरे (३ लाख ८० हजार ३६७) आणि शरण बसवराज पाटील (२ लाख ४६ हजार ६९५) यांना मते मिळाली.

अध्यक्षपदासाठीची मुलाखत लवकरच नवी दिल्लीत होईल आणि त्यानंतर अध्यक्षपदावरील निवड जाहीर करण्यात येणार आहे. अध्यक्षपदासाठी एकूण १४ जण रिंगणात होते. अध्यक्षपदापासून वंचित राहिलेल्या काही जणांना उपाध्यक्षपद मिळेल. अध्यक्षपदाच्या शर्यतीत अव्वल असलेले कुणाल राऊत हे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे पुत्र आहेत. या आधीही ते प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी राहिले आहेत. शरण पाटील हे माजी मंत्री बसवराज पाटील यांचे पुत्र आहेत. शिवराज मोरे हे एनएसयूआयचे दोनवेळा प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. 

सरचिटणीसपदी जिंकलेले याज्ञवल्क्य जिचकार हे माजी मंत्री दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र आहेत. शिवानी वडेट्टीवार या ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आहेत.

वडेट्टीवार, जिचकार, अक्षय जैन यांची नियुक्तीसरचिटणीसपदाच्या निवडणुकीत तब्बल २४६ उमेदवार होते. त्यातील ३३ जण या पदासाठी निवडून आले आहेत. त्यांची नावे अशी - अभिजित चव्हाण, शिवानी वडेट्टीवार, याज्ञवल्क्य श्रीकांत जिचकार, परिक्षित जगताप, अनुराग भोयर, धीरज पाटील, अक्षय जैन, सुधीर जाधव, केतन ठाकरे, श्रीनिवास नीलमवार, कपिल ढोके, प्रवीण बिराजदार, जयदीप शिंदे, हर्षाली म्हात्रे, दीपाली ससाणे, अतुल पेदेवाड, आसिफ शेख, पंकज सावरकर, सुमीत भोसले, वीरेन चोरघे, अरमान बद्रु जमा, मधुकर नाईक, गौरव पानगव्हाणे, अनंत चव्हाण, डॉ. प्रवीणकुमार जांभुळे, राहुल माणिक, अमृता भट्टड.

टॅग्स :congressकाँग्रेस