नेरळ : कर्जत तालुक्यात रविवारी सकाळपासून मोठ्या प्रमाणात पाऊस होता. तालुक्यातील रजपे गावातील काही तरुण चिल्लार नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता त्यातील एक तरु ण वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्याने नदीमध्ये वाहून गेला. तालुक्यातील टेंबरे ग्रामपंचायत मधील रजपे गावातील सागर तानाजी पिंगळे हा आपल्या मित्रासह रविवारी गावाबाहेरून वाहणाऱ्या चिल्लार नदीमध्ये पोहण्यासाठी दुपारी अडीच वाजता घरातून बाहेर पडला. रविवारी सकाळ पासून पावसाची संततधार सुरू असल्याने चिल्लार नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. मात्र स्थानिक असल्याने रजपे गावातील ते सहा तरु ण नदीमध्ये पोहत होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास नदीच्या पात्रात पाण्याचा मोठा लोट वाहून आला आणि त्यात सागर पिंगळे हा तरु ण वाहून गेला. त्याच्या सोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरु णांनी सागरला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने सागरच्या मित्रांचा शोध अपुरा पडला. चारच्या सुमारास त्याच्या मित्रांनी रजपे गावात येऊन सागर तानाजी पिंगळे नदीमध्ये वाहून गेल्याची माहिती गावकऱ्यांना दिली. सर्व ग्रामस्थांनी वाहून गेलेल्या सागर पिंगळे याचा शोध घेण्यास सुरु वात केली. सात वाजलेतरी सागरचा शोध लागला नव्हता.ग्रामस्थांनी रजपे गावाच्या पुढे धोत्रे, शिलार त्याचप्रमाणे पुढे किकवी असा शोध सुरू केला आहे. तेथे जर सागरचा शोध लागला नाही तर पुढे सुगवे, गुडवन, अंथरट, काळेवाडी, पिंपळोली शोध घ्यावा लागणार आहे. उल्हास नदीचे पात्र चिल्लार नदीपेक्षा तीनपट मोठे असल्याने नदीमध्ये पोहत असताना वाहून गेलेल्या सागरचा शोध घेणे कठीण झाले आहे.
चिल्लार नदीत तरुण गेला वाहून
By admin | Updated: July 4, 2016 03:27 IST