शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

कोर्टाची तरुण पायरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 01:46 IST

आज समाजात वकिलांबद्दल तयार झालेली धारणा म्हणजे वकिली हे खोटं बोलणाऱ्यांचे क्षेत्र आहे.

अलीकडेच भास्कर मधुरम आणि लेनिन कुमार यांच्या एका याचिकेवर सुनावणी करताना मद्रास हायकोर्टाचे न्यायाधीश जे.एन. किरूबाकरन यांनी अत्यंत दु:खद मत व्यक्त केलं. 

वकिली या पेशाची वाटचाल या दिशेने होत असेल, तर नक्कीच हे चिंताजनक आहे. कित्येक लोकांना वकिलांची फी देण्यासाठी अनेक गोष्टी विकाव्या लागतात. प्रत्येक तारखेला गेल्यावर वकीलसाहेबांचा एकच प्रश्न असतो की, ‘आज किती आणलेत..?’ आणि कोर्टातून घरी जाताना एकच वाक्य असतं की, ‘पुढच्या तारखेला हे काम करायचं आहे, त्यासाठी एवढे पैसे घेऊन या. हे पैसे तर कोर्टाच्या कामकाजासाठी लागणार आहेत. काम करून घेण्यासाठी क्लार्कला पैसे द्यावे लागतात. मी तुम्हाला न्याय मिळवून देईन, त्याची काळजी करू नका’... हे सारं सुरू राहतं आणि आपल्याला न्याय मिळेल, या माफक अपेक्षेने लोकांची हयात कोर्टात जाताना दिसते. हे असं का होतंय, याचा विचार आता यापुढच्या काळात कायद्याचं शिक्षण घेणाऱ्यांनी तरी करायला हवा.

हा पेशा हे आयुष्यातील एक मोठं आव्हान असून, ते पेलण्याची ताकद नव्यानं विधीक्षेत्रात येणाºया वकिलांनी निर्माण करायला हवी. कायद्याचे शिक्षण घेत असताना प्रत्येकाने सामाजिक दृष्टिकोन समोर ठेवला, तर शिक्षण झाल्यावर स्वत:ला नेमकं काय करायचं आहे, याचं उत्तर स्पष्ट होत जातं.

आज समाजात वकिलांबद्दल तयार झालेली धारणा म्हणजे वकिली हे खोटं बोलणाऱ्यांचे क्षेत्र आहे. तर, आता प्रत्येक वकिलाची ही जबाबदारी आहे की, आपल्या कार्यातून या क्षेत्राबद्दल आणि न्यायव्यवस्थेबद्दल असलेली चुकीची धारणा दूर करायला हवी. न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून वकील हा सत्य बोलणारा आणि पारदर्शकसुद्धा असू शकतो, हेदेखील सिद्ध करून दाखवावं लागेल. यात नक्कीच अपवाद आहेत.

दुसरीकडे पैसे घेऊन खोटी बाजू लढावी का? हा मोठा प्रश्न तरुण वकिलांसमोर उभा राहू शकतो. तेव्हा याचे उत्तर वकिलांच्या विचार करण्यावर अवलंबून असते. अशावेळेस वकिलांनी आपल्या विवेकबुद्धीने विचार करावा की, आपण करत असलेलं कार्य हे कुणाला न्यायापासून वंचित तर करत नाहीत ना...? पैशासाठी जर कुणाचे हक्क हिरावले जात असतील, तर तो त्या न्यायाच्या मूल्यांचा पराभव आहे. जर वकीलचं न्यायाचं मूल्य पराभूत करत असेल, तर हा तिसरा स्तंभ सक्षम कसा होईल..? याचं चिंतन प्रत्येक नवीन तरुण वकिलानं करायला हवं. चार भिंतीच्या आॅफिसमध्ये बसून ड्राफ्टिंग करणं आणि केवळ आलेल्या केसेस कोर्टात जाऊन भांडणं इतका मर्यादित हेतू वकिलीचा नसावा.

वकिलांचा एक गोड गैरसमज असतो की, मी सर्वात शहाणा आहे. माझ्यापेक्षा चांगलं इतरांना कळत नाही. हे खूळ डोक्यातून काढून टाकलं पाहिजे. न्याय आणि निवाडा (फैसला) या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. आॅफिसमधील चार भिंतींबाहेर असलेल्या जगाशी दोन हात करण्याची धमक उराशी बाळगायला हवी.

वेळप्रसंगी फिल्ड व्हिजिट शक्य असेल तिथे पक्षकाराला कोर्टाची पायरी चढायला न लावता सल्लामसलत करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. संविधानाच्या प्रास्ताविकेत आलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्तीच्या प्रतिष्ठा इत्यादी मूल्यांना पूरक अशा भूमिका तरुण वकिलांनी घ्यायला हव्यात. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल यासारखे अनेक महान स्वातंत्र्यसेनानी हे वकील होते.

आजदेखील देशातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात वकील अग्रेसर आहेत. या वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ न्यायालयापुरता न ठेवता सर्वसामान्यांचे प्रश्न व नैतिकमूल्य रुजवण्यासाठी केला, तर तेच समाजासाठी आदर्श ठरेल. हे नव्याने वकिली पेशात येणाºया मित्रांनी लक्षात घ्यावं.

आदिवासी, भटके, दलित, स्री व इतर घटकांचे अनेक प्रश्न आज उभे आहेत. पण, अनेक कारणांमुळे त्यांना न्याय मिळवण्यात अडचणी येतात. त्यातील सर्वात मोठी अडचण म्हणजे न्याय मिळवणं महागडं झालं आहे. तेव्हा ही बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे की, वकील आकारत असलेली फी ही दुर्बलांना अधिक दुर्बल तर करत नाही ना..? शहाण्याने कोर्टाची पायरी चढावी आणि त्यातून न्यायाचं मूल्य अधिक बळकट व्हावं, असं वाटत असेल तर समाजाभिमुख वकिलीचा पायंडा नवतरुण वकिलांनी निर्माण करावा.

सरतेशेवटी, वकील हा देखील एक माणूस आहे आणि न्यायाच्या मार्गाने चालायचं ठरवल्यानंतर येणाºया खाचखळग्यांना प्रामाणिकपणे त्याने पार करत माणूसपण जिवंत ठेवलं पाहिजे. तरच लोकशाहीतील हा तिसरा स्तंभ सर्वसामान्यांना आपलासा वाटेल. समाजाची, समाजस्वास्थ्याची अत्यंत महत्त्वाची धुरा आता नव्या तरुण वकिलांवर आहे, हे निश्चित!अ‍ॅड. दीपक चटप (निर्माण ७)अ‍ॅड. स्नेहल जाधव (निर्माण ९)अ‍ॅड. बोधी रामटेके (निर्माण ९)

तरुण वकिलांना करता येतील अशा काही गोष्टी :१. आदिवासी व गैरआदिवासींना सामूहिक अथवा वैयक्तिक वनहक्क मिळववून देण्यासाठी वनहक्क कायदा २००६च्या मदतीने काम करणं.२. तुरुंगातील कैदी ज्यांच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे; पण आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना वकील मिळत नाही. तेव्हा, अशा कैद्यांच्या ‘प्रो-बोनो’ केसेस चालवणं.३. समूहावर विपरीत परिणाम करणाºया सामाजिक प्रश्नांना जनहीत याचिकेतून वाचा फोडणं.४. आपल्या अवतीभोवतीच्या पर्यावरणाशी संबंधित समस्यांचं निराकरण व्हावं, यासाठी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात केसेस चालवणं.५. कामगारांना योग्य ते वेतन व मोबदला मिळावा, वेठबिगारीचे प्रश्न सुटावे यासाठी काम करणं.६. शेतकरी, महिला, बालक, अंध, अपंग, भिकारी इचे प्रश्न जनहीत याचिकांतून मांडणं.७. सर्वसामान्य नागरिकांना कळेल अशा सोप्या भाषेत कायद्याची माहिती देणारी पुस्तिका काढणं.

टॅग्स :Courtन्यायालयMumbaiमुंबई