शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनो...कल्पकता दाखवा, मुख्यमंत्री व्हा! काँग्रेसची ऑफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 06:06 IST

युवक काँग्रेसचा उपक्रम; 'मैं भी नायक’ स्पर्धेचे आयोजन

मुंबई : तुमच्याकडे विकासाचे व्हिजन आहे, नेतृत्व करण्याची क्षमता आहे, तुम्हाला उत्तम सादरीकरण करता येते, तुमच्या डोक्यात महाराष्ट्राच्या विकासाच्या भन्नाट कल्पना आहेत, तर चला मग तुम्हीही होऊ शकता एका दिवसाचे मुख्यमंत्री! महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या 'मैं भी नायक’ या स्पर्धेद्वारे राज्यातील कल्पक युवकांना ही संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या ‘वेक अप महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत देशात प्रथमच ‘युवकांचा जाहीरनामा’ साकारत आहे. याअंतर्गत ‘मैं भी नायक...सीएम फॉर ए डे’ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्हास्तरावर होणाऱ्या या उपक्रमात स्पर्धकांना महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात विविध सूचना, कल्पना आणि विचार पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, वक्तृत्व, अभिनय, एकपात्री या माध्यमातून सादर करायचे आहे. ६ सप्टेंबरपर्यंत नोंदणी तर ८ सप्टेंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा होईल. जिल्हास्तरावरील २ विजेत्या स्पर्धकांना 'तिकीटटू विधानसभा' मिळणार असून मुंबईत फायनल राउंड होणार आहे. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या ५ विजेत्यांना ‘सीएम फॉर ए डे’ (एका दिवसाचे मुख्यमंत्री) बनून पंजाब, राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांबरोबर प्रत्यक्ष दिवसभर राहून कामकाज पाहण्याची, विकासावर चर्चा करण्याची संधी मिळणार आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील हल्लीचे तरुण अत्यंत कल्पक व चौफेर सारासार विचार करणारे आहेत. त्यांच्याकडे अनेक भन्नाट कल्पना असतात, पण सर्वांनाच त्यासाठी व्यासपीठ मिळत नाही. अशा कल्पक युवकांना ‘मैं भी नायक’ या स्पर्धेतून संधी देणार आहोत. विजेत्यांना तीन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करता येणार आहे. अशा स्पर्धेतून होतकरू तरुणांना भविष्यात राजकारणात संधी मिळू शकते.- सत्यजीत तांबे, अध्यक्ष, प्रदेश युवक काँग्रेस

टॅग्स :congressकाँग्रेस