शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात तरूणाने गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2017 19:12 IST

रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहे

ठळक मुद्दे रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहेकानाला हेडफोन लावून रूळावरून जात असताना सेल्फी काढणाऱ्या दोन जणांना ट्रेनने धडक दिल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत

पिंपरी, दि. 5- समुद्र किनारी किंवा रस्त्यावर सेल्फी काढणं तरूणांच्या जीवावर बेतलं असल्याच्या घटना घडताना आपण पाहतो आहे. असाच प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये घडला आहे. रेल्वे रूळावरून जात असताना सेल्फी काढण्याचा नाद दोन तरूणांच्या जीवावर बेतला आहे. कानाला हेडफोन लावून रूळावरून जात असताना सेल्फी काढणाऱ्या दोन जणांना ट्रेनने धडक दिल्याने त्यातील एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकावर उपचार सुरू आहेत.मोबाईल दुरूस्तीचे प्रशिक्षण घेण्यासाठी दोन तरूण राजस्थानहून पिंपरी चिंचवडमध्ये त्यांच्या नातेवाईकांकडे आले होते. ते दोघं फिरायला जाण्यासाठी पिंपरी रेल्वे स्थानक परिसरात गेले होते. कानाला हेडफोन लावून ते दोघं तिकीट काढण्यासाठी रूळावरून जात होते. रेल्वे रूळावरून चालत असताना ते सेल्फी  काढायला लागले. हेडफोन्स लावल्यामुळे समोरून येणाऱ्या रेल्वेचा त्यांना आवाज ऐकु आला नाही. आणि लोणावळयाहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेची त्या दोघांना धडक त्यांना बसली. ३१ जुलैला घडलेल्या या अपघातातील एकजण दगावला असून दुसऱ्यावर पुण्यातील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्या मुलाचं श्रवण मलराम घांची (वय २० , रा. थेरगाव, मूळ जोधपूर, राजस्थान) असं नाव आहे. तर त्याचा मित्र भवनसिंग बाबूसिंग राठोड (वय १९) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रवण व भवनसिंग हे दोघेही राजस्थानमध्ये एकाच भागात राहणारे आहेत. दहावीची परीक्षा दिल्यानंतर दोघेही मोबाईल दुरूस्तीचे काम शिकण्यासाठी पुण्यात आले. थेरगाव येथील नातेवाईकांकडे राहून ते सांगवी येथील नातेवाईकाच्या मोबाईल शॉपीमध्ये रोज जात असत. ३१ जुलैला त्यांनी फिरायला जाण्याचे ठरविले. दोघेही पिंपरी रेल्वेस्थानक परिसरात आले. रेल्वेमार्गावरून तिकीटघराच्या दिशेने चालत जात असताना श्रवणला सेल्फी घेण्याची इच्छा झाली. दोघेही रेल्वेमार्गावर सेल्फी घेण्यासाठी थांबले. त्यांच्या कानात हेडफोन होता. दरम्यानच्या कालावधीत लोणावळ्याहून पुण्याच्या दिशेने जाणारी लोकल त्या रूळावर आली. रेल्वेचा हॉर्न वाजत होता.परंतू हेडफोन लावल्याने त्यांना रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकु आला नाही. लोकल जवळ आली, रेल्वेची धडक बसून दोघेही बाजुला फेकले गेले. या अपघातात ते जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी श्रवणचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. भवनसिंगला उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल केले आहे. त्याचीही प्रकृती गंभीर आहे. सेल्फीच्या नादात एकाला प्राण गमवावे लागले तर दुसऱ्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे.