शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

तू आलास!

By admin | Updated: June 19, 2016 00:24 IST

भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो.

- सुधीर महाजन भल्या पहाटे पावणेचारच्या सुमारास तुझ्या चाहुलीने जाग आली. तू येणार असा गाजावाजा चालू होता, अंदाज, आडाखे बांधले जात होते. उपग्रहाच्या सोबतीने तुझा रस्ता सारखा धुंडाळत होतो. तू निघाला; पण गोव्याजवळ पश्चिम घाटाचा चढ तू चढलाच नाहीस. पुन्हा एकदा मनात मळभ दाटलं, वाटलं, असाच चकवा देणार का? आता नक्की येणार असे हाकारे, डांगोरे पिटले गेले आणि आस लागली. काल दिवसभर तुझा कुठे मागमूसही दिसत नव्हता. सूर्यनारायण तळपत होते. रात्री तर चंद्राने खळे केले. पुन्हा शंकेच्या पालीने डोके वर काढले. तू आला नाही तर अशी भीती मनाच्या कोपऱ्यात होतीच. विजांचे ढोल-ताशे नाही की, वाऱ्याचे घुमणे नाही, भल्या पहाटे तू आला न् अलगद ओसरीवर कोणी येऊन बसावे असा सहजपणे. उन्हात तळपून कोळपलेली झाडं-झुडपं अधाशासारखी तुला अंगावर घेत होती. तापलेल्या मातीचं फूल उमललं आणि मृदगंध पसरला. तू साखर झोप चाळवली; पण तुझ्या येण्यामुळे सारखेचा गोडवा अजूनही तोंडात नव्हे तर आसमंतात पसरला त्याचे काय मोल? तू ताल धरला तो अर्धा पाऊण तास. त्यातच तुझ्याशी बोलायला आतुर झालो. कारण गेल्या तीन वर्षांत तू आमच्याशी का अबोला धरला? तू कट्टी घेतो; पण आमचा जीव जातो. तुझे रुसवे-फुगवे आम्हाला आयुष्यातून उठवतात. गेल्या सात-आठ महिन्यांत आमची काय दैना झाली. तुझ्या शोधात आकाश-पाताळ एक करताना विहिरीत पडून किती जणांना जीव गमवावा लागला. न्हात्याधुत्या बोहोल्यावर चढायची स्वप्न रंगविणाऱ्या किती लेकी-बाळींचा खोल विहिरींनी घास घेतला. कर्ती पोर गेल्याने माय-बाप हबकून गेले. पोरांप्रमाणे जपलेल्या जित्राबांना अनेकांनी बाजार दाखविला, तो खुशीने नव्हे. दावणी मोकळ्या होत गेल्या आणि शेतीचा बारदाना उजाड झाला. जनावरानं बाजाराचा रस्ता धरला की, घरावर मरणकळा उतरते हे तुला माहीत नसावं. तुझ रुसणं एवढ्यावरच थांबलं नाही. घरंच्या घरं देशोधडीला लागली. गावातून मुळासकट उपटली गेली आणि शहरात रुजायची लढाई लढू लागली. ती रुजणार नाही तर आयुष्यभर, उपऱ्याचं जिणं नशिबी आलं. या उपरेपणाचं दु:ख भोगणं म्हणजे वनवास. बैल बारदाना गेला, शेतीचा पट उधळला आणि असं वनवाशाचं जिणं अनेकांच्या नशिबी आलं, गाव सुटलं त्या सोबतीने नात्याचे बंध तुटले आणि असे अनेक सैरभैर झाले, ते आयुष्यभरासाठी. नात्याचे हे बळकट बंधच माणसाला संकटात सावरतात, ते तुटल्यानंतर वावटळीत अडकल्याची अवस्था येते. हे रडगाणं सांगू तेवढं कमीच आहे. तू ऐकणार असशील तर सांगण्यात काही अर्थ आहे, म्हणून म्हणतो, तुझा अबोला आम्हाला परवडणारा नाही. तू काय सैराटासारखा इथे नाही तर तिथे फिरतोस. आम्ही मातीशी बांधले गेलो, तू आलास तर या मातीच्या चिखलात घट्ट पाय रोवण्याची आमच्यात धमक आहे. आम्हाला तुझ्या मागे फिरता येत नाही. कोण अलेक्झांडर फे्रटर नावाचा माणूस त्याने तुझा केरळातून चेरापुंजीपर्यंत पाठलाग केला आणि तुझे राजस, तामस, नखरे पाहिले. तुझं हसवणं, रडवणं शब्दबद्ध केलं; पण तुझा लहरी स्वभाव त्यालाही कळला नाही. तो तुझ्या मागेमागेच फिरत राहिला. किती जणांनी नजरांचे गालिचे तुझ्यासाठी अंथरले होते. तू आलास तर जरा आल्यासारखा राहा. बऱ्याच दिवसांनी घरी आला. सुख-दु:खाच्या गोष्टी करता येतील. तुला काय सांगू न् काय नको असं झालंय. तुझ्या शिडकाव्याने ते जिरतील, अंगाची, मनाची आणि मातीची तलखी थांबेल. यापेक्षा आणखी काय मागू?