शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

‘इवल्या इवल्या गोष्टी’त तू आहेस जवळपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:39 IST

उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय.

- डॉ.अस्मिता गुरव उत्कर्षाची माझी ओळख ही तिच्या कवितेवरील प्रेमातून झालेली असल्याने ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि जवळची मैत्रीण असे होत गेल्याने, ही मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहील, हा माझा विश्वास नियतीने असा घाईने ठरवायला नको होता, हे सतत वाटतेय. तिच्या माझ्यात सूर जुळायला अनेक आवडीनिवडी तर सारख्या होेत्याच, पण मुख्य म्हणजे नुसत्या स्वरातून कुणी बोलायचं आणि कुणी ऐकायचं हे न सांगता कळायचं म्हणूनही असेल (कुठल्याही फ्री स्कीम नसताना), आमच्या तासंतास मोबाइलवर बोलणं-ऐकण्याने आम्ही मोबाइल कंपनीचं भलं करत होतो. उत्कर्षा म्हणजे उत्साहाचा खळाळता झरा... अभ्यासू-व्यासंगी, आयुर्वेद चिकित्सक म्हणून ती एमडी होतीच... नाटक, चित्रपट, गाणं, वाचणं, याबरोबरच माणूस शोधण्याची तिची जाणीव अतिशय तल्लख होती. सहजरीत्या भेटलेल्या आणि त्यातून तिला जाणवलेल्या बºया-वाईट अनुभवांबद्दल ती भरभरून बोलत असे. तिचे अनुभव कथन हे कित्येकदा कथाकथनासारखे ऐकत राहावेसे वाटायचे.‘व्हीजन’च्या वर्कशॉपमध्ये आहार-विहार दिनचर्येवर बोलत असताना, काळाच्या ओघात केव्हाच मागे पडलेली ‘फॅमेली डॉक्टर’ ही संकल्पना प्रत्यक्षात अनुभवता येत असे, पण त्याहीपेक्षा ती जेव्हा मेडिटेशनचे सेशन घेत असे, तेव्हा तिची शब्दरचना आणि आवाजातल्या जादूने संमोहित होत, स्वप्निल दुनियेत फिरून अलगद वास्तवात येताना माणूस फ्रेश व्हायचाच.उत्कर्षाला कुठलीही गोष्ट पटकन पटेल किंवा कोणतीही व्यक्ती चटकन आवडेल असे नव्हतेच. तिची आवड-निवड ही साधी-सरळ म्हणता येईल, अशी नव्हती हे जसं खरं तसच तिचं जर कुणाशी जमलच तर मात्र ते सगळ अगदी मनापासून असायचं हेही खरे... त्यात कधीही ओठावर एक आणि पोटात एक हा प्रकार नाही. तिला आवडलेलं पुस्तक असो किंवा खटकलेलं काही असो, त्या प्रत्येक गोष्टीबाबत तिच्याकडे कारणासहित स्पष्टीकरण असायचं.‘चला वाचू या’ हा ‘व्हीजन’तर्फे उपक्रम सुरू करण्याचा उद्देशच साहित्य-सांस्कृतिक वर्तुळात आपल्या परीने काही तरी करत राहण्याचा आहे. उत्कर्षा ‘व्हीजन’ची संचालिका. तिचा उत्साही सहभाग असायचा. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन हे संदर्भासहित असूनही, हलकाफुलक्या पद्धतीने किती श्रवणीय असू शकते, हे ती नेहमीच दाखवून देत असे. उत्कर्षाने कधीही कागदवर स्क्रिप्ट लिहून सूत्रसंचालन केले नाही. तिच्या हाती माईक आला की, सुरू व्हायचा वाक्गंगेचा ओघ, रसिक त्या प्रवाहात तरंगत जाऊ लागे आणि मैफल रंगून जाई... मला तर नेहमी शारदास्तुतीतल्या ओळीच आठवत..विचार कारंजावर तुषार शब्दांचे नाचवी,सुख-दु:खाचे घेऊन झोके जिव्हेला खेळवी...रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र मुक्तिबोध, बहिणाबाई, माडगूळकर, इंदिरा संत, नारायण सुर्वे, आरती प्रभू, अरुणा ढेरे हे आवडते साहित्यिक यांच्या साहित्यावर तिला बोलताना ऐकणं हा आनंदाचा अनुभव... मी हा अनुभव अनेकदा घेतलाय... एकदा सुर्वेच्या कवितेवर ती बोलत असताना, आॅफिसचा डीनर टाइम संपूनही किती तरी वेळ झालेला, पान लावायचं, म्हणून प्यून शोधत आला, तर मी कॅन्टीनच्या बरच दूर झाडाखाली उभी, साहेबांनी बोलावणं पाठवलेलं आणि मग त्यावरून लेखी मेमोसुद्धा पदरी पडला, पण सुर्वेंची कविता आणि उत्कर्षाचं त्यावरच निरुपण यापुढे मेमो ही विचार करण्यासारखी बाब आहे, असं मला मुळीच वाटलं नाही. अर्थात, उत्कर्षाला हे कळल्यानंतर तिने मी घरी असल्यावरच फोन करायचा अशी तंबी दिली.पाऊस हा अजून एक आमच्यातला आवडीचा विषय. मी तिला गमतीनं म्हणायचे माझं गाव जळगाव, पण नावातच ‘जळ’ आहे गावात नाही. आम्ही वर्षानुवर्ष आठवड्यातून दोन किंवा तीन दिवसाआड पाणी भरतो, पण मला समुद्राची प्रचंड ओढ. समुद्रावरला पाऊस, कोकणातला पाऊस यावर ती बोलायला लागली की, मला तिच्या शब्दसरीत थेंबांचा भास व्हायचा आणि मनोमनी आम्ही त्या पावसात चिंब भिजायचो.उत्कर्षाची वर्णनशैली विलक्षण चित्रमय. ऐकताना अणि वाचताना ते ठिकाण-ती माणसं आपल्या डोळ्यासमोर दिसू लागत. तिच्या ‘सदर’ लेखनातल्या काही लेखांच्या पहिल्या खर्ड्याची मी श्रोता-मेल केली तर वाचक असे. तिचे लेखन चांगले गाजले. त्याचं लवकर पुस्तक व्हावं, असा श्रीनिवास आणि आम्हा मित्रमैत्रिणींच्या हट्टाची तिने कधी फारशी दखल घेतलीच नाही. बघू करू या योग येईल, तेव्हा असं म्हणत असे. आज तो योग आलाय, पण ती नाही हा सल आहेच उरात.‘इवल्या इवल्या गोष्टी’ हे ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे आज प्रकाशन... उत्कर्षा इवल्या इवल्या गोष्टीतून तू किती आणि काय काय सांगितलंय... जगण्याच्या प्रवासात पावलोपावली माणूस शोधण्याची तुझी आस त्यातून आलेला हा लेखन प्रपंच... तुझं लेखन आवडेलच ही खात्री आहे... तुझ्या लेखांच्या अभिवाचनाने तुला स्मरणांजली वाहत असलो, तरी अजूनही होतो भास तू आहेसच आसपास...!!

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र